Top Post Ad

म्हणूनच संघटनेशी एकनिष्ठ असतील त्यांना पुरस्कार देणे गरजेचे आहे


     आपल्या हिंदू धर्मग्रंथात ब्राह्मणांना गोदान, भोजनदान, वस्त्रदान करावे व त्यामुळे पुण्य मिळते असे लिहिलेले आहे. याच ग्रंथांचे पारायण आपला हिंदू ( बूद्धू ) श्रावण महिन्यात पुण्य मिळावे म्हणून करत असतो व त्याची समाप्ती ब्राम्हणाच्या हातून करून घेऊन त्याला दान करत असतो. या प्रकारचे मुद्रादान मोठ्या प्रमाणात पेशवाईच्या काळात पुण्यात होत होते. यासाठी महाराष्ट्रा बाहेरून भट मंडळी हे दान घेण्यासाठी येत होती. असे इंग्रज लेखकांनी   लिहून ठेवलेले आहे. पेशवाईच्या काळात हे दान स्वीकारण्यासाठी मोठी पर्वणीच भरत असे. या पर्वणीत मात्र मूळभारतीय बहुजन माणसास दान स्वीकारण्याचा व घेण्याचा मुळीच अधिकार नव्हता. जर चूकून एखादा बहुजन माणूस त्या रांगेत शिरला तर त्याला चाबकाचे फटके दिले जायचे अथवा दानासाठी जमलेले ब्राह्मण आपल्या हातातील काठीने त्याच्या डोक्याचा चेंडू समजून फटके देत असत व असे मारणे किंवा मारून टाकणे हा ब्राम्हणांचा मूलभूत अधिकार समजला जायचा. उलट यात जर कोणाला मरण आले तर तो स्वर्गाला गेला व त्याला सदगती मिळाली असे समजले जायचे. 

      पण स्वातंत्र्यानंतर व लोकशाही आल्याने ब्राम्हणांची मोठी कुचंबना झाली. बहुजनांच्या आयत्या मलिद्यावर स्वाभिमानाने जगणे ब्राम्हणांना अवघड जाऊ लागले. मग याला पर्याय काय? तर पुरस्कार नावाची योजना पुढे आली. आता हि योजना इंग्रजांनीच त्यांच्या राजवटीत  आणली व स्वाभिमानाने राबवली सुद्धा. या योजनेतून इंग्रजांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा पुण्याच्या सारसबाग येथे उचित सत्कार व उंची वस्त्रे देऊन सत्कार केला व ते महात्मा म्हणून नावारूपास आले. आता यावेळी धेडांचा महात्मा म्हणून पुण्याच्या ब्राम्हणांनी त्यांची हेटाळणी केली हा भाग वेगळा. 

     पूढे स्वातंत्र्यानंतर हिच योजना ब्राम्हणांनी आपल्या ब्राम्हण माणसांसाठी वापरून कोणाला चाचा तर कोणाला स्वातंत्र्यवीर ( माफीवीर) केले. स्वातंत्र्यानंतरही लोकशाहीचे दान व भरघोस वाटा आपल्याच ब्राह्मण समाजाला मिळाला पाहिजे हा समज ब्राह्मण वर्गाचा तसाच राहिला. याची मूहर्तमेढ मात्र पं जवाहरलाल नेहरू यांनी रोवली. त्यांनी १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ६०% ब्राम्हणांना खासदारकीची तिकीटे देऊन त्यांना निवडून आणले व आपले आणि या देशाचे पहिले कॅबिनेट सरकार हे ९०% ब्राम्हणांचे बनवून ते त्याचे पंतप्रधान झाले. म्हणजे स्वातंत्र्याच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकी पासून  ब्राह्मण जे मूळभारतीयांच्या डोक्यावर बसले ते आजपर्यंत. कारण आजही सरकारी नोकरदार वर्गात प्रथम वर्ग पदावर काम करणारे हे ब्राह्मणच आहे. आजही उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वात जास्त पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, विद्यापीठांचे कुलगुरू हे सर्व ब्राह्मणच आहेत. तसेच साहित्य, कला, क्रिडा, समाजसेवक, शास्त्रज्ञ, तिन्ही सेवादलाचे सेनापती, पोलिस आयुक्त यातही ब्राह्मणांनी हेतूपूर्वक व काळजीपूर्वक भरणा त्यांचाच करून घेतलेला आहे. हे ब्राम्हणी कृत्य म्हणजे लोकशाहीचे आयते दान आपल्या ब्राम्हण समाजाला वाटण्याचा हा प्रकार आहे. 

     आता पुरस्कार हा नेहमीच ब्रम्हणांनाच का दिला जातो याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संविधानाला विरोध करून ब्राम्हणांच्या आरएसएस या संघटनेने जे ब्राम्हण धार्जिणे संविधान बनवलेले आहे व ते त्यांना २०२४ नतंर भारताला लागू करून जे भारताचे हिंदूराष्ट्र बनवायचे आहे, त्यासाठी त्यांना पुरस्कारकर्त्या व्यक्तिंची अत्यंत गरज आहे. कारण आरएसएसने बनवलेल्या राज्यघटनेत मतदानाची विभागणी केलेली आहे. तर या राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या एका व्यक्तीस  १०,००० (दहाहजार ) मतांचा अधिकार असेल व राहणार आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांना १०००, राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांना ५००,तसेच कुलगुरू, न्यायधिश, राज्यपाल यांच्यासह प्रथम श्रेणी नौकरांनाही ५०० मतांचा अधिकार रहाणार आहे. तसेच प्राध्यापक, शिक्षक यांना ३०० मतांचा अधिकार रहाणार आहे. तर शेतकरी, कामगार, फेरीवाले, शेतमजूर यांना फक्त एक मताचा अधिकार रहाणार आहे. 

      यामुळे आजच जेवढे पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यांना बनवता येतील व तेही आरएसएस संघटनेशी एकनिष्ठ असतील त्यांना पुरस्कार देणे त्यांना गरजेचे आहे. यामुळे त्यांचा मतदानाचा टक्का तर वाढेलच, पण बहुजन, मूळभारतीय माणसाने त्यांना मतदान नाही केले तरी ते व त्यांचा पक्ष हा नेहमीच त्यांच्या माणसांच्या मतावर व जीवावर सत्तेत कसा राहिल याची ही आजच चाललेली मोर्चे बांधणी आहे. यामुळे बहुजनांनी महाराष्ट्र भुषण पुरस्काराला ब्राम्हण पुरस्कार म्हटले काय किंवा न म्हटले काय याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. मुळात ते त्यांच्या समाजाच्या दृष्टीने लांबचा विचार करून सत्ता हस्तगत करतात. तर आपला बहुजन माणूस जय श्रीराम, हिंदुत्वाच्या नावाने घोषणा देऊन मरतो.  त्याच प्रकारची समाज व्यवस्था ते त्यांच्या फायद्याची तयार करत आहेत. आपण काय करायचे ते ठरवा. ब्राम्हणी गुलाम म्हणून जगायचे की या देशाचे मालक म्हणून जगायचे कि देवदेवतांचे भक्त, श्रद्धावान म्हणून जगायचे. एवढेच ठरवणे आपल्या हातात आहे. बाकी काही नाही.

दिपक गायकवाड 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com