मानवाला सुखाने जगायचे व आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर पृथ्वीचा समतोल राखता आला व पृथ्वीला तिच्या महाविनाशापासून वाचविता आले पाहिजे. तिचा समतोल राखण्यासाठी मानवाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि वृक्षतोड कमी करणे, प्राणी व पक्षी यांचे कमी होणारे प्रमाण वाढवणे, नद्यांचे जल स्वछ ठेवणे, आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे, शेतीत जैविक खतांचा वापर करणे, रासायनिक खते कमी वापरणे यांकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. अशी ज्ञानवर्धक माहिती वाचा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी यांच्या शब्दांतून... संपादक._
वसुंधरा किंवा पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरण संवर्धन जागृती करण्यासाठी जगभर पाळण्यात येतो. आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी- संपातबिंदू होतो, तोच पृथ्वी दिन पाळतात.
महाभारतामध्ये भारताच्या वर्णनाप्रमाणेच जगातील अन्य भौगोलिक स्थळांचे वर्णन आढळते. उदा. मंगोलियाचे गोबी वाळवंट, इजिप्तची नाईल नदी, लाल समुद्र इत्यादी इत्यादी. तसेच महाभारतातल्या भीष्म पर्वातील जम्बुखंड- विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले आहे. ते असे-
"सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन|
परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः||
यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः|
एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले||
द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशेच शशो महान्||
याचा अर्थ- हे कुरुनन्दन! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.
पृथ्वी दिनासाठी जॉन मक्डॉनेल याने बनवलेला अनधिकृत ध्वज पर्यावरण रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने फडकविला जातो. अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे पाळला गेला. तरीही त्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक असलेले डेनिस हेस यांनी स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन केले व पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सद्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो.
इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला निळाग्रह असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी. तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वीपासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ किमी एवढा आहे. सूर्यापासून तिचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० किमी एवढे आहे.
पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे. याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते, म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते. मानवाला सुखाने जगायचे असेल तर पृथ्वीचा समतोल राखता आला पाहिजे. तिचा समतोल राखण्यासाठी मानवाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि वृक्षतोड कमी करणे, प्राणी व पक्षी यांचे कमी होणारे प्रमाण वाढवणे, नद्यांचे जल स्वछ ठेवणे, आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे, शेतीत जैविक खतांचा वापर करणे, रासायनिक खते कमी वापरणे यांकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.
पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे २० सेकंद लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता, तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती. पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या धृवीय क्षेत्राकडे वळतात.
पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर भौगोलिक आणि जैविक प्रक्रियांनी तिच्यात खूप परिवर्तन झाले आहे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ती तळाच्या उंचीचा हिस्टोग्राम तिच्या तळावर पाण्याची विपुलता एक अद्भूत वैशिष्ट्य आहे, जे सौर मंडळाच्या अन्य ग्रहांपासून या निळ्या ग्रहाला वेगळे करते. पृथ्वीच्या जलमंडळात मुख्यतः महासागर आहे, परंतु तांत्रिक रूपाने दुनियेत उपस्थित इतर पाण्याचे स्रोत जसे- अंतर्देशीय समुद्र, तलाव, नदी आणि दोन हजार मीटर खोल भूमिगत पाण्यासहित यात सामावले आहे. पाण्यातील सर्वात खोल जागा १०,९११.४ मीटर खोल प्रशांत महासागरमध्ये मारियाना ट्रेंचची चैलेंजर डीप आहे.
कॅनडा मधील रॉकी पर्वत मोराइन लेकला दुर्लक्षित करतो. जीवन टिकवून ठेवणारा एक ग्रह म्हणजे जगणे अस्तित्वात नसले, तरीसुद्धा राहण्यायोग्य असे म्हटले जाते. पृथ्वी द्रव पाणी पुरवते- एक वातावरण जेथे जटिल सेंद्रिय अणू एकत्र येऊन संवाद साधू शकतात आणि चयापचय प्रक्रिया टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी ऊर्जा देऊ शकतात. माणूस चंद्रावर जाऊन तेथे वास्तव्य करण्याची भाषा- वल्गना करत आहे, मात्र त्याला या साध्या पृथ्वीवर धड चालता येत नाही. त्याच्या अशा बेजबाबदार चालण्या- वागण्यामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले, तर पृथ्वीचा महाविनाश अटळ आहे. म्हणून मानवजातीचा तळपट थांबविण्यासाठी मानवाने सावध वागलेच पाहिजे, हीच त्याची पूज्य बुद्धी ठरेल!
!! वसुंधरा दिनाच्या समस्त बुद्धिजीवी प्राण्यांना सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
- कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
- मु. पो. ता. जि. गडचिरोली.
- भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या