भटांचे काही चुकत आहे असे मला वाटत नाही कारण भट त्यांच्या वागण्यातून हे सिद्ध करतात की इथले बहुजन समाज हा शूद्र अतिशूद्र असून इथल्या शूद्र व अतिशूद्र लोकांचा व ब्राह्मण धर्माचा काही संबंध नाही ब्राह्मण धर्मा व धर्माची देवळे ही फक्त पंधरा टक्के विदेशी लोकांसाठी आहेत इथला बहुजन समाज हा जरी स्वतःला हिंदू समजत असला तरी ब्राह्मण मात्र त्यांना शूद्र व अतिशूद्र समजतो व शूद्र लोकांसाठी ब्राह्मण लोकांनी पुराणोक्त मंत्र योजलेले आहेत हे त्यांनी पूर्वी पासून आपल्याला दाखवलेले आहे उदाहरणार्थ वेदोक्त प्रकरण शाहू महाराज तसेच शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणे .बहुजन समाज हे समजून घेत नाही की ब्राह्मणी देव आणि देवळे हे फक्त ब्राह्मणांसाठी आहेत आपण मूळचे लोक फक्त आपला वापर ब्राह्मणांना करून देण्यासाठी आहोत म्हणून ते असे म्हणतात सुद्रांचा धर्म वेगळा अतिसुद्रांचा धर्म वेगळा ब्राह्मणांचा धर्म वेगळा क्षत्रियांचा धर्म वेगळा आणि वैशांचा धर्म वेगळा. ब्राह्मणांना फक्त धर्माच्या नावाखाली इथल्या बहुजन समाजाचा वापर करून घ्यायचा आहे. त्यांच्याकडून दान दक्षिणा घ्यायचे आहेत. धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाची मते घ्यायचे आहेत व स्वतः सत्ताधारी व्हायचा आहे. स्वतःचे कल्याण करून घ्यायचा आहे आणि हे करताना बहुजन समाजाला दाखवायचे आहेत की तुम्ही शूद्र अति शूद्र आहात तुम्ही आमच्या धर्माच्या नाही आहात. आपला असा गैरसमज होतोय की ब्राह्मणांचा धर्म पण हिंदू आहे आणि आपला पण धर्म पण हिंदू आहे या गैरसमजापोटी व देवाविषयी व धर्माविषयी असणाऱ्या अज्ञानापोटी आपण मान ना मान मै तेरा मेहमान असे म्हणून देवळात व देवाला जायचा प्रयत्न करतो आणि ब्राह्मणांकडून आपली जागा दाखवून घेतो आपल्या जर हिम्मत असेल तर जो धर्म आपल्याला माणूस मानत नाही जो धर्म आपला फक्त देवाची भीती दाखवून तसेच मुसलमानांची भीती दाखवून आपला उपयोग करून घेतो तो सोडून द्यायची आपण हिम्मत दाखवायला पाहिजे फक्त ब्राह्मणावर टीका करणे आणि तो विषय सोडून परत ये रे माझ्या मागल्या ताक कन्या चांगले असे म्हणणे हा आपला मूर्खपणा आहे असं वाटतं आणि मग आपला अपमान हा नेहमीच चालणार आहे हे पण आपण ध्यानात घ्यायला हवे आणि मग आपला आपण अपमान मुग गिळून सहन करायला शिकले पाहिजे.
ज्यांना महामृत्युंजय मंत्र म्हणणे म्हणजे क्रांती वाटत असेल, त्यांनाच खरे शाहू महाराज तरी समजले असतील काय? त्यांना इथली धर्मशास्त्र इतिहास याची काही माहिती असावी असं वाटत नाही त्यांनी आधी हे समजून घ्यावे आणि मग व्यक्त व्हावे. आणि व्यक्त होण्यासाठी आधी मानसिक आणि धार्मिक गुलामी सोडून द्यायला पाहिजे. मगच हे लोक खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे नाव घेऊ शकतात अन्यथा रक्ताचे वारस म्हणून नाही
0 टिप्पण्या