Top Post Ad

मोदी साहेब, देशाला वाचवा .....


  साहेब, आपण पंतप्रधानपदी विराजमान झालात. त्यानंतर तुम्ही नोटबंदी, ३७० कलम, जीएसटी, आदींबाबत ठोस भूमिका घेऊन त्याची अंमलबजावणी केली इतकेच नव्हे तर विरोधकांना ही इडी,सीबीआय, आयकर विभागाच्या धाडी टाकून त्यांच्या नांग्या ठेचून काढल्या, त्यामुळे विरोधक हवालदिल झाले आहेत. त्यांचे पोटात तुमच्यामुळे गोळा येतोय. तुम्ही विरोधकांची पाचावर धारण बसवली. परंतु साहेब, हमाम में सब नंगे है। तुम्ही एकमेकांची किती ही लक्तरे वेशीवर टांगली तर शेवटी त्या कारवाईच्या अंमलबजावणीनंतर त्या बेनामी संपत्तीचा विनीयोग देशाच्या हिताथ् येतो का? हा ही खरा प्रश्न आहे, असो। अशी ही लक्तरे वेशीवर टांगली जात असताना ज्या करबुडव्यांनी देशाला लुटले, जनतेला लुटले अशा करबुडव्यांना आडवे करून त्या संपत्तीचा विनीयोग देशहिताथ् केल्यास देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.

साहेब, आपल्या देशातील जनता मुलभूत गरजांपासुन वंचित आहेत त्या मुलभूत गरजांचा विचार केला तर डोके सुन्न होऊन जात. त्यातील

पहिली गरज--१ अन्न- या देशातील हजारो- लाखो लोकांना जेवण मिळते नाही. त्यांना अन्नधान्यापासून मुकावे लागते आहे. सरकारी शिधापत्रिकाधारकांना जो शिधा मिळतोय आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. कारण हा सरकारी शिधा लाटण्याचे काम शिधा माफियांनी खुलेआम सुरू आहे. अशा माफियांना आडवे केल्यास किती तरी माया सरकारी दरबारी जमा होऊ शकते. आणि त्यांना जरब बसून चांगला शिधा जनतेला मिळू शकतो.

दुसरी गरज-- २ वस्ञ- मुंबई सारख्या शहरात अजूनही सर्व सामान्य माणसाला अंगावर कपडे घालण्यास मिळत नाही. उघडीनागडी जनता दिसते आहे. मुंबई सारख्या शहरात ही अवस्था आहे तर खेडोपाडी, दुर्मिळ भागात काय स्थिती आहे याचा सव्ह केल्यास अंगावर शहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही. त्यासाठी येथील जनता वस्ञाविना राहता कामा नये.

 तिसरी गरज-- ३ निवारा- मुंबई शहरासह अन्य शहराचाही विचार केला तर १०० टक्के जनतेपैकी ७०/ ८० टक्के जनता अजूनही बकाल, घाणेरडे आयुष्य झोपडपट्टीत जगते आहे. मुलभूत गरजा साठी जीवाचा आटापिटा करते आहे. परंतु बकालपणा काही सुटत नाही. हा बकालपणा घालविण्यासाठी एसआरए प्रकल्पाची जेवढी युद्ध पातळीवर अंमलबजावणी झाली पाहिजे तशी काही होत दिसत नाही, याउलट हे मृगजळ अधिक गडद होताना दिसत आहे. त्यासाठी अशा अनेक प्रकल्पाचा भ्रष्टाचार खणून काढण्याची गरज आहे. ही गरज आेळखून पाठपुरावा केल्यास मोठ्या प्रमाणात रसद उभी राहून लोकांचे, जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

चौथी गरज-- २- आरोग्य- सरकारी, निमसरकारी व खाजगी रुग्णालयात चांगले आरोग्य सेवा मिळत नाही. सदर ठिकाणी एवढी गरदी असते की, जगणे महाग झाले तसे मरणेही महाग झाले आहे. अौषधोपचाराने तो रुग्ण नाही तर संपूर्ण घर आजारी होते. ते घर बेजार होऊन जाते. त्यात रूग्णालयातील सुरक्षा रक्षक तर रूग्णासह त्याचे नातेवाईकांना हैराण करून सोडतात. अथा्त रूग्णा भेटावयाच्या कालावधीत रूग्णा भेटावयास तारेवरची कसरत करावी लागते. तेव्हा याबाबीचाही विचार होणे गरजेचे आहे.

 पाचवी गरज-- २- शिक्षण हे सर्व बालशिशुपासुन ते संपूर्ण पदवी/ पीएचडी पर्यंत विनामूल्य दिले गेले पाहिजे पण ते सरसकट मिळत नाही. त्यातही विषमता दिसून येते. शिक्षणाचा नुसता बाजार झाला आहे. कलागुणांचा विकासाचा विचार केला जात नाही. व्यवसायिक शिक्षणावर भर दिला जात नाही, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. शिक्षकांनाही सर्व प्रकारच्या सुखसुविधा पुरवून विद्यार्थी अव्वल दर्जाचा घडला पाहिजे यावर भर दिला पाहिजे.

साहेब, खरं सांगा आपल्या राजकीय मंडळींनी, राज्यकर्ते मंडळींनी राजे छञपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यासारख्या दिगज्ज आदर्शाचा आदर्श घेऊन सत्ता सांभाळली का? बोधीसत्व, घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिव्य संदेशाने वाटचाल केली आहे का? आपल्या देशातील- विदेशातील महाकारूणी सिद्धाथ् गौतम बुद्धांच्या मार्गदात्याच्या मार्गाने वाटचाल केली का? आपल्या देशात अनेक संतमहंत आदर्शवत राजेमहाराजे आहेत. त्यांच्या आदर्शाचा आदर्श घेऊन वाटचाल केली तर आपला देश नक्कीच महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु साहेब, करबुडव्यांना, लुटारूना पाठिंबा दिला तर देश भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही, देश गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही गुलामी कुणालाच परवडणारी नाही. सरतेशेवटी हया मुलभूत गरजांचा नायनाट करून महागाई, बेरोजगारी यांचा बिमोड करून देशाच्या संरक्षणासाठी देशहिताथ् भरीव कामगिरी केली पाहिजे. आणि हो, ज्यांनी एवढी वर्षे सत्ता भोगली.त्यांच्या चुकीच्या पद्धतीने, धोरणाने देशातील जनतेचे काय हाल झाले आहे हे भयंकरच आहे. आणि आपण ही त्यांचा कित्ता गिरवायचा हे कितपत रास्त आहे.म्हणून म्हणतो की, देश कुणाच्या ही दावणीला बांधू नका. अन्यथा देश गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. देशाच्याहिताथं राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन केले पाहिजे. आणि बाजारबुणग्यांना,करबुडव्यांना, लुटारूना, देशद्रोह्याना, माफियांना आडवे करून काळा पैसा देशाच्या सत्कारणी लावला पाहिजे. पहा, साहेब जमत का? कारण सोन्याची संधी तुमच्या हाती आहे. त्याच सोन करायच का माती? हे तुमच्या हाती आहे.

सुरेश गायकवाड, पञकार, ९२२४२५०८७३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com