Top Post Ad

समलैंगिक समुदायाचा हक व न्यायासाठी राज्यस्तरीय जनआंदोलन


 तृतीयपंथी हक व संरक्षण विधेयक २०१९ पारित होऊन आज चार वर्षांचे वर कालावधी झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे वतीने उपरोक्त कायद्यान्वये तृतीयपंथी, संरक्षण कल्याण मंडळ स्थापित झाले असुन, त्याअंतर्गत विविध सेवाभावी योजना व उपक्रम राबवून तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मूळ प्रवाहात अद्यापही आणले जात नाही.  तरी 
तृतीयपंथी समुदायाचे पोलीस भरतीतील अडथळे दूर करणे, आरक्षण व इतर शासकीय सेवांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करणे. आणा आदी मागण्या करीता आझाद मैदानात तृतीयपंथी हक्क अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी आनंदराज यांनी त्यांच्या मागण्यांकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

शासनाला दिलेल्या निवेदनात  तृतीयपंथीयांचे जीवनमान व सामाजिक दर्जा सुधारणे यासाठी रचनात्मक कार्यक्रम राबविणे वा सेवेच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या अश्या पद्धतीने त्याचे काम असावे असे केंद्र सरकार ब सर्वोच न्यायालायने कायदेशीररित्या ट्रान्सजेंडर समुदायाला "तृतीय लिंग म्हणून स्वीकारले आहे आणि त्यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) निकालाद्वारे (NALSA v Union of India) कायदेशीर मान्यता दिली आहे  तरीही त्यांना हमी दिलेले अधिकार कागदावरच आहेत. या निकालाद्वारे न्यायालयांनी प्रथमच ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांची लिंग ओळख पुरुष, महिला किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून स्व-ओळखण्याचा अधिकार असल्याचे मानले होते आणि है देखील ओळखले होते की त्यांच्याशी ऐतिहासिकदृष्ट्या भेदभाव करण्यात आला होता आणि त्यांना मुख्य प्रवाहातून वगळण्यात आले होते. जीवन त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना सार्वजनिक नौकरी आणि शिक्षणात: आरक्षण द्यावे, अशी शिफारस केली होती. आता 2023 हे वर्ष आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानी अद्याप अंमलबजावणी व्हायची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा तसेच या मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास आम्ही मंत्रालयासमोर भीक मागो आंदोलन करून शासनाला याचा जाव विचारल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी दिशा पिकी शेख यांनी प्रजासत्ताक जनताशी बोलतांना स्पष्ट केले. 

या आंदोलनात तृतीयपंथी हक्क अधिकारी संघर्ष समितीच्या दिशा पिंकी शेख, नामिभा पाटील, दीपक सोनावणे, चांदणी गोरे ,मयुरी बावळेकर, बिक्री शिंदे आदी कार्यकर्त्यांसह  अनेक तृतीयपंथी सहभागी झाल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com