Top Post Ad

धर्मांध लोक कितीही तुझ्यापाठी लागोत पण डार्विन आम्ही तुझ्यासोबत आहोत


   चार्ल्स डार्विन एक झुंजार वैज्ञानिक आहे !
त्याने अनेक धार्मिक कल्पना उखडून भिरकावून दिल्या आहेत!! 
डार्विनने एक पुस्तक लिहिले आहे. 
"द एक्सप्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड एनिमल्स". 
साध्या सोप्या मराठी भाषेत हे लांबलचक नाव असे वाचता येईल, 'माणूस आणि प्राणी यांच्यातील भावना व्यक्त कशा होतात?' 

डार्विन तसा हरहुन्नरी माणूस. जो सतत फिरत असायचा. जीवाचा उगम कसा झाला असेल याचे काही आडाखे त्याने जे बांधले होते ते थक्क करणारे आहेत. पृथ्वीवर जीव कसा अवतरला हे शोधणे आणि मांडणे हे इसवीसन १८५९ मध्ये डार्विनने केले जेव्हा विज्ञानाची प्रगती संथ होती. साधनं अपुरी होती. डार्विन त्यावेळी असे म्हणतो की... भावनांमधील मूलभूत भावना जन्मजात आपल्याबरोबर येतात. या मूळच्या भावना शिकाव्या लागत नाहीत. लहान मुल एखाद्या अनोळखी आवाजाने दचकते. ही दचकण्याची भीती त्या बाळाला शिकावी लागलेली नसते. ती मेंदूतून येते. हे सर्व प्राण्यांतील बाळांमध्ये घडते. 

डार्विनने आणखी एक विशेष गोष्ट मांडली. माणूस जेव्हा भावना व्यक्त करतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. त्याचे एक्सप्रेशन जसे चेहऱ्यातून होते तसेच शरीरातूनही होते. पण चेहऱ्याकडेच आपले लक्ष जास्त असते. हा जो आपला चेहरा बोलतो तो भारतात वेगळा आणि आफ्रिकेत वेगळा नसतो. सेम असतो! म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जा. सर्व माणसात राग चेहऱ्यावर दिसतो. तो सेम असतो. जिथे जात, धर्म, वंश, वगैरे भानगड नाही, एवढेच नव्हे तर आंधळा म्हणून जन्माला येतो, तोही राग इतरांसारखाच व्यक्त करतो. 

राग व्यक्त करताना चेहऱ्यावरचे स्नायू हालतात. हे स्नायू सर्वांत सेम असतात. अगदी लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत. हे झाले माणसा-माणसांबाबतीत. पण माणूस आणि प्राण्यांच्या बाबतीत काय? 

डार्विनची तीक्ष्ण नजर इथेही आपणास काहीतरी सांगते. तो म्हणतो की, माणूस आणि प्राणी यांची भावना व्यक्त करण्याची शारीरिक पद्धती खूप प्रमाणात सारखी सारखी आहे. ज्याला आपण सोपा शब्द वापरूया.. 

'देहबोली'. 

वेगवेगळ्या प्राण्यांत ही देहबोली मानवात जशी आहे तशीच अनेक बाबतीत आढळते. आपल्याला अगदी जवळचे प्राणी म्हणजे माकड, बबून्स, ओरांगउटान, चिंपांझी. जेव्हा प्रचंड भीती निर्माण होते तेव्हा या सर्व प्राण्यात एक गोष्ट दिसते, लघवी होणे किंवा शौचास होणे. जेव्हा टोकाची भीती अवतरते तेव्हा अनेक प्राण्यांत केस ताठ होऊन उभे राहतात. कुत्रे, सिंह, कोल्हे, गाई, डुक्करं, हरीण, घोडे, मांजर, उंदीर, वटवाघळं, अशी अनेक प्राण्यांची नावे सांगता येतील. 'रोंगटे खडे हो गये' ही स्थिती आपल्यात वारंवार येते. राग, भीती या भावना या रोंगटेना खडे करतात. 

रागात गुरगुरणे किंवा बोलणे हे आपल्यात आहे. ते प्राण्यात कितीतरी मोठ्या प्रमाणावर आहे. हे गुरगुरणे नुसतेच नसते. हे रागाबरोबर वाढते आणि एखाद्या क्षणी चावा घेते. लहान मुलं चावतात तेव्हा आपण म्हणतो, 'हे काय? जनावरासारखं वागतोस..' मगरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडल्या पडल्या चावत सुटतात. शिकावं लागत नाही त्यांना. 

जेव्हा माणसांना वेड लागतं तेव्हा ती अशीच जनावर बनतात. ते गुरगुरतात. ते विध्वंसक कृत्य करतात.  शिवराळ भाषा वापरतात. घाणेरडे हावभाव करतात. रानटी, हिंस्र व आक्रमक होतात. 

हे सारे मानवात असणे म्हणजे ते प्राणी जातीशी नाळ जोडून आहे हेच सांगते. भावना या तिथूनच इकडे आपल्यात ट्रान्सफर झाल्या. आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा भावनांची देवाण घेवाण अखंड चालू असते. त्यावेळी त्याची भावनिक स्थिती कशी आहे हे आपण सांगू शकतो आणि त्याच बरोबर आपणास कोणता मूड आहे हे समोरचा सांगतो. 

हे एकमेकांच्या भावना ओळखण्याचे काम प्राण्यांतही चालते. आपल्या पंखांची उघडझाप.. आपले कल्ले ताणणे.. कमरेचे मणके ताठ करणे.. शरीर फुगविणे.. अशा अनेक प्रकारे प्राण्यांत संवाद घडत असतो. हे जास्त केव्हा घडते? जेव्हा आपणावर हल्ला होणार आहे असे दिसते तेव्हा ते पटकन दिसते. 

जर लैंगिक आकर्षण निर्माण झाले तर आपले मुडस् भराभर बदलतात. आवाज, वास, देहबोली, शरीराचा एखादा अवयव दाखवणे, रंग दाखविणे, यातून लैंगिक इच्छा व्यक्त केली जाते. जर धोका आहे असे समजले तर प्रत्येक प्राण्यांत विविध आवाज काढले जातात आणि आपल्या सहकार्यांना सावध केले जाते. 

हे सारे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी असते. म्हणजे भावना या आपल्या जगण्याशी... जगत राहण्याशी..  निगडित असतात. 

आई आणि बाळातील पहिले संवाद भावनांमधून घडत जातात. आईचे 'हसू' बाळाला एक प्रकारे शक्ती देते. आईचा 'राग' बाळाला इशारा देतो. दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती आपणास लगेच जाणवते. 

आपण जे बोलतो त्यातूनही आपल्या भावना घडत आणि बिघडत जातात. चेहरा आणि शरीर यातून व्यक्त होणाऱ्या भावना हा निसर्गाने प्रदान केलेला एक अमोल ठेवा आहे.

... आणि डार्विनने तो निसर्गातून खणून काढला आहे! 

धार्मिक लोक कितीही तुझ्या पाठी लागोत पण डार्विन आम्ही तुझ्यासोबत आहोत. 

तुझेच म्हणणे आम्ही या पृथ्वीवर पेरत राहू!! 

हॅट्स ऑफ डार्विन.

- डाॅ. प्रदीप पाटील 

.............


केंद्रीय अभ्यासक्रमात बाबासाहेबांचा उल्लेखच नाही !

आय सी एस ई च्या दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा साधा उल्लेखही नाही . पुस्तकाचे नाव " Total History & Civics " असे आहे . मॉर्निंग स्टार पब्लिकेशन नवी दिल्ली यांनी हे पुस्तक पब्लिश केलेले आहे . वाराणशीच्या डॉली एलन नावाच्या बाईने हे पुस्तक लिहिलेले असून बंगळूर च्या एस . इरुदया राज यांनी हे पुस्तक संपादित केले आहे . भारतीय इतिहासात बाबासाहेबांचे योगदान काय आहे ? हे सर्व देशाला माहित असले तरी सरकारला ही माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक वाटू नये ही संतापजनक बाब आहे . विशेष म्हणजे या पुस्तकात काल पर्वाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचेही फोटो आहेत . पुस्तकात गांधी , नेहरू यांच्यासह देश - विदेशातील सगळे विद्वान आहेत . पण बाबासाहेबांचा फोटो सोडा … देशाच्या या संपूर्ण इतिहास नावाच्या पुस्तकात घटनाकार बाबासाहेबांचा साधा नामोल्लेखही नाही . सरकारला याचा जाब विचारला पाहिजे आणि हे पुस्तक मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे . 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com