कोकणातील जे राजकारणी सुंदर निसर्गाची वाटोळे करू पहात आहे त्या लोकांचे राजकीय जीवन संपुष्टात आणले पाहिजे तर आणि तरच कोकणातील निसर्गाचे संरक्षण होईल. प्रश्न विस्थापित होण्याचा किंव्हा जॉबचा नाही. लोकांची दैना बघायची तर, तरपोर बोईसर, माहुलगाव, रसायनी रायगड तिथे पहा..... काश्मीर नंतर सर्वात निसर्गरम्य कोकण आहें. देवभूमी आहें. संपूर्ण आखाती देशात केवळ कोकणातील आंबा खातात.... कोकणाचा विकास करायचा तर शेतीपूरक उद्योग आणा, पर्यटन उद्योग वाढवा, हिमाचल प्रेदेश नुसार घरोघरी पर्यटन उद्योग साठी गावकर्यांना सर्व प्रकारे उद्योग मार्गदर्शन आणि कर्ज द्या. प्रत्येक गावाला पर्यटक गाव घोषित करा, काजू आंबा, फणस, करावंद ची वाईन, कोकम सरबत, या उद्योगाला सरकारने भरभरून पैसे दिले पाहिजेत.
रामोजी स्टुडिओ सारखे अनेक स्टुडिओ उभारा, सिनेमा शुटिंग, या उद्योगाला सरकारने उभे केले पाहिजे, जगात सर्वांधिक बुद्ध लेणी कोकणात आहें. सर्वात मोठी समुद्र किनारपट्टी कोकणात आहें, तिचा उपयोग उद्योग साठी करा. सरकारने कोकणातील घराघरात पर्यटन उभे केले पाहिजे. कोकणातील संस्कृती, निसर्ग वैभव, जपले पाहिजे, गड, किल्ले, लेणी यांचे पर्यटन वाढवले पाहिजे, शिक्षण हब्ब कोकणात केला पाहिजे. मोठ्या संख्येने शाळा, कॉलेज, रिसर्च सेंटर, गुरुकुल शिक्षण पद्धती, अशा अनेक गोष्टी करायचा सोडून केमिकल कंपनी उभ्या करणे म्हणजे कोकणाचा आणि माणसांचा ऱ्हास होय. हिमाचल प्रदेशाचा डोंगर दर्यात वीज, पाणी, आणि वाहतूक सेवा सरकारने दिली आहें. पर्यटन त्यांचा मुख्य उद्योग आहें. मात्र कोकणातील आमदार, खासदार, मंत्री यांनी 1984 पासून आजतगायत सादा मुंबई गोवा राष्ट्रीय मार्ग नीट बांधला नाही.
गुजरात मध्ये रीफायनरी आहे आणि तिथेच बाजूला लागून असणार्या आंब्याच्या बागेतून रिलायन्स आंब्याची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार आहे...
किती हास्यास्पद आहे हे....
१ गुजरातची लोक आंब्यासाठी आम्हाला संपर्क करतात किंवा ते कोकणातीलच आंबे घेतात. कोकणच्या आंब्याला GI मार्क मिळालेला आहे. जो ईतर कोणत्याही भागातल्या आंब्याला लागू होत नाही.बर आंब्यातही प्रकार आहे तो रिलायन्स निर्यात करत असलेला आंबा आणि त्याची क्वालिटी एकदा जाहीर करा रिफायनरी समर्थकांनो.
२ गुजरातला किनारे आहेतच तरी पर्यटनासाठी महाराष्ट्र गोव्याचे किनारे का निवडले जातात?
३ गुजरातच्या किनार्यावरुन समुद्रात सोडले जाणारे केमिकल युक्त पाणी दुषित नसल्यास ते रिफायनरी समर्थक पिणार का?
४ रिफायनरी जर प्रदुषण करणार नसेल तर ती red कॆटॅगरी मध्ये मोडते कशी?५ कोकणच्या भौगोलिक परिस्थिती कोणत्याही मोठ्या उद्योग, प्रकल्प आणि मोठ्या जलसाठ्यासाठी योग्य नाही असे शात्रज्ञ सांगतात तेही योग्य निरिक्षण आणि वैज्ञानिक कारणासह.
तरी राजकारण्याकडून हजारो लोकांना बेघर आणि आयुष्यातून उठवून काय साध्य होणार आहे?आज जरी पैसे घेवून paid सपोर्ट करणारे अाता श्रीमंत होतील पण भावी पिढी तुमच्या नावाने पिंड देखिल ठेवणार नाही हे लक्षात घ्या. एका २५ कलमांच्या बागेतील आंबा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे १०जणांच्या हाताला काम देतो.हा फक्त आंब्याचा विषय बाकी काजू, कोकम,फणस, नारळ , याबद्दल आणि त्यावरील चालणार्या प्रकिया करणार्या पर्यावरणपूरक उद्योगांनी अख्खा कोकण आर्थिक समृद्ध होवू शकतो.
बाकी काल, आज आणि उदया फक्त चाकरी करा आणि आम्ही तुम्हाला नोकरी, चाकरी देवू हीच आमिषे नेत्यांनी दिलीतपण एकही नेता कार्यकर्ता नोकरीच्या मागे न लागता मोठा बिजनेसमन( व्यवसायिक ), उद्योजक म्हणूनच पहायला मिळतो. यांच्याकडून का नाही सांगितल जात व्यवसायीक बना म्हणून? आमिष आणि सत्य यामध्ये फरक शोधा म्हणजे म्हणजे जगणे सोपे होईल.बाकी यापुढेही रिफायनरी किंवा रेड कॅटेगरीला विरोधाला विरोध म्हणून नाही तर विरोधात का आहोत हे कारणासह कायम मांडत राहीनच...
बाकी सिंधुदुर्गातील बाजूचा रेडी गाव उध्वस्त होताना मुग गिळून शांत बसणारे आजगाव गावातील लोक आनंदी जिवन जगत होते पण आजगाव गावाच नाव खनिज उत्खनन पट्ट्यातउत्खनन पट्ट्यात आल्यावर विरोध करायला जागे झाले. हीच परिस्थिती कोकण महाराष्ट्रासह प्रत्येक गावात आहे. उपभोगाची वाळवी आहे ही जी एक गाव पोखरून झाल्यावर दुसर्या गावावर घाला घालणारच हे ध्यानात घ्या. कोकणातील प्रत्येक गाव उध्वस्त होण्याच्या धोक्याच्या छायेखाली आहे.सौंदर्य हाच खर्या अर्थाने शाप ठरतोय आणि त्याला आम्ही शांत बसणारी जनता कारणीभूत आहोत. लक्षात ठेवा संघर्ष हा जिवंत पणाचे लक्षण आहे कारण पाणी कितीही गरम असलं तरी प्रेताला चटका लागत नसतो.
नितिन गोलतकर, झाराप.
््््््््
आपल्या देशात सर्वात जास्त लांब समुद्र किनारा कोणत्या राज्याकडे आहे माहीत आहे ? गुजरात 1600 किमी !!!!
1600 किमी चा समुद्रकिनारा हा गुजरात राज्याकडे आहे आणि महाराष्ट्र कडे किती आहे माहीत आहे ? फक्त 700 किमी म्हणजे गुजरातच्या अर्ध्याने पण कमी तरीदेखील तुम्ही एकतरी गुजरात मधील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा असलेले ठिकाणाचा नाव ऐकले आहे काय ? आणि महाराष्ट्रात किती आहेत ? नाव घेऊन थकाल इतकी आहेत !!
एक रिफायनरी तीन समुद्र किनारे उध्वस्त करते... कोणी ऐकलं का सुरतच्या / जामनगरच्या समुद्र किनारी मस्त रिलॅक्स कोणी करतय, एखाद्या जाहिराती मध्ये गुजरातचा समुद्रकिनारा दाखवलेला बघितला आहे काय?
समुद्र किनारे तर आहेत ना मग का दाखवत नाहीत... गीर दाखवता, कच्छ दाखवतात, जुनागड दाखवता पण समुद्र किनारे का नाही दाखवत ?
कारण वाढलेल्या औद्योगीकरणामुळे, जामनगर रिफायनरी
मुळे समुद्र गटारापेक्षा वेगळा नाही..... पच्छिम घाटाची संपन्नता - वैभव, स्वच्छ सुंदर विस्तृत समुद्र
किनारे कोकणला लाभले आहेत..... अलिबाग पासून ते तळकोकणात देवगड पर्यंत सुन्दर अगदी सुंदर असे समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळ !!
तेव्हा हा 700 किमी च्या समुद्रकिनाऱ्याला गटार बनवायचे की तसेच सुंदर ठेवायचे ते कोकणातील जनतेने ठरवायचे आहे !!!
0 टिप्पण्या