Top Post Ad

।। अदानीच्या मदतीला धावले शरद पवार!।।

राष्ट्रीवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कधी काय विधान करतील आणि कधी कोणती भूमिका घेतली याचा अंदाज भल्याभल्यांना घेता येता नाही. म्हणून सध्या त्यांनी उद्योगपती अदानी यांचे समर्थन करणारे जे विधानं केले त्याबद्दल खूप आश्चर्य करण्याचे काहीच कारण नाही.
शरद पवार यांनी हिंडेनबर्ग यांच्या रिपोर्टवर सुध्दा अविश्वास दाखविला. गौतम अदानीला तर क्लिन चीट द्यावे अशीच त्यांची भाषा होती. ते म्हणाले आम्ही टाटा- बिर्लाचा असाच पूर्वी विरोध करत होतो. नंतर आम्हाला कळाले की हे उद्योगपती देशासाठी काम करत आहेत. यातून शरद पवारांनी सुचवायचे आहे की गौतम अदानी - अनिल अंबानी हेसुद्धा देशासाठी काम करत आहेत. आज इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात असे स्पष्ट लिहून आले.
विशेष म्हणजे शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जेपीसीची काही गरज नाही. देशातले सर्व विरोधीपक्ष अदानी यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसीची मागणी करत असताना एकटे शरद पवार जेपीसीची गरज नाही म्हणत आहेत. या गोष्टीचा फार मोठा अर्थ आहे. शहाण्यांनी तो समजून घ्यावा.
शरद पवार हे संधीसाधू राजकारणी आहेत. संविधानविषयीची त्यांची आस्था तकलादू आहे. त्यांच्या राजकारणाच्या करिअरमध्ये ते सतत तोडाफोडीचे राजकारण करत आले. दलित - आदिवासींचे राजकीय संघटन होऊ नये यासाठी ते सतत षडयंत्र करत आले. पॅन्थरच्या अनेक कार्यकर्त्यावर त्यांनी पोलीस केसेस लावल्या होत्या. "धनगरांना आदिवासींच्या सवलती द्या" या संकल्पनेचे जनक शरद पवारच आहेत.तसे लेखी पुरावे आहेत.
थोडक्यात, राजकीय नेतृत्व म्हणून शरद पवार हे अत्यंत अविश्वासार्ह आहेत. मा बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की शरद पवारांची बीजेपीसोबत छुपी युती आहे ते खरे वाटते. म्हणून आंबेडकरी-आदिवासी जनतेनी शरद पवारांपासून दूर राहावे. त्यांच्या छद्मी राजकारणाला अजिबात बळी पडू नये. धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com