Top Post Ad

 साहित्यातील कोणत्या वादापेक्षा संविधान संस्कृतीतील मानवता वादावर लक्ष केंद्रित करा

ज्येष्ठ साहित्यिका आशालाता कांबळे यांचे साहित्यिकांना आवाहन

साहित्यामधील सौंदर्य वाद आदर्शवाद देशीवाद यावर चर्चा करत बसण्यापेक्षा आता मानवता वादावर चर्चा करण्याची गरज आहे भावी पिढी नीतिमान करण्याचा व भारताला महासत्ता बनवायचा हा एकच मार्ग आहे त्यामुळे देशातील साहित्यिकांनी कोणत्याही वादाला विचारात न घेता संविधान संस्कृतीतील मानवता वादावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन जेष्ठ साहित्यिका आशालता कांबळे यांनी आज मुंबईत केलं

विकास प्रबोधिनी मुंबई आयोजित आठव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणातून त्या बोलत होत्या. भांडुप येथील शिवाई मंदिर शाळेमध्ये आठवे आंबेडकरी साहित्य संमेलन भरवण्यात आले होते यावेळी शैक्षणिक धोरण तसेच भारतीय लोकशाही काल आज आणि उद्या आधी विषयावर परिसमादाच्या आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनाचे अध्यक्ष भाषणामध्ये अशा लता कांबळे म्हणाल्या की

 देशा मध्ये जबाबदारी असून जबाबदारी त्यांनी ओळखावी असेही त्या म्हणाल्या

आज आपल्यासमोर संपूर्ण भारताचा इतिहास लिहिला गेलेला नाही शाळा महाविद्यालयातून चुकीचा इतिहास शिकवला जातोय म्हणूनच भारताचे आजचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत मुस्लिम देश पसरवणारा इतिहास सांगितला जातो त्यामुळे सामूहिक द्वेष भावनेतून धर्माधर्मातील जाती जातीतील उद्देश भावना ही वाढीस लागले आहे गुंतागुंतीचे होऊ नये म्हणून पुढच्या पिढीने विविध वादात न उतरता संविधान संस्कृतीतील मानवता वादावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज देशामध्ये एकूणच परिस्थिती लक्षात घेता अज्ञानी माणसाला जागी करण्याची जबाबदारी आंबेडकरी साहित्यिकांवर जास्त आहे बाबासाहेबांनी आपल्याला सत्यापर्यंत जाण्याचा सामर्थ्य दिलं बुद्धाने सम्यक दृष्टीचा वारसा दिला तो वारसा घेऊन या देशात अनेक महापुरुषांनी कामे केली सर्वसामान्यांना स्वप्न दिली असेही त्या म्हणाल्या.

नवीन शैक्षणिक धोरणावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादास धोरणामुळे देशातील वंचित बहुजन घटका हा दुर्लक्षित राहण्याची भीती भीती व्यक्त केली तसेच देशातील विद्यापीठे उच्च शिक्षण संस्थांमधील होत असलेल्या खाजगीकरणावर चिंता व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com