मृत्युचे तांडव...
एका व्यक्तीच्या मृत्युची किंमत 5 लाख
कै.नानासाहेब असतील किंवा आप्पासाहेब ही दोन नावे आली की श्रीसेवकांची गर्दी ही आलीच हे कदाचित सरकारला माहित होते, कारण सरकारने केवळ वाहनांच्या पार्किंग साठी २१ मैदाने राखीव ठेवली होती तर ३२ पार्किंग स्लॉट, २० हजार बसेससाठी पार्किंग, खारघर ते सेंट्रल पार्क पर्यंत खास बस व्यवस्था, पेट्रोलिंगसाठी १० रुग्णवाहिका, १० हजार शोचालय, ४२०० मोबाईल शौचालय, ५५ मेडिकल बूथ प्रत्येक बुथवर २ डॉक्टर १० नर्स आणि १० स्वयंसेवक, शहरातील ५ हॉस्पिटल मध्ये १०० बेड राखीव, ७० रुग्णवाहिका, जागेवर एक छोटे हॉस्पिटलच तयार, ५०० छोट्या अग्निरोधक यंत्रणा, ८ क्विक रिस्पॉन्स टीम, वनविभागाचे कर्मचारी, सर्पमित्रांची एक मोठी टीम, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, सिडकोकडून पाण्याची सेप्रेट नवीन लाईन, १३ वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर, अशी एकंदर व्यवस्था सरकारने केली होती तर याचा अर्थ उष्माघाताचा त्रास श्रीसेवकांना होवू शकतो हे सरकारला माहीतच होते.
इतके सगळे नियोजन केलेच होते तर मग वेळेचे नियोजन सरकारला का करता आले नाही ? आजचा दिवस अतिउष्ण होता याचा अंदाज सरकारने का घेतला नाही ? याही पेक्षा सोपे कितीतरी कोटी रुपये या समारंभावर सरकारने खर्च केले तेच पैसे जर महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ट्रस्टला दिले असते तर कदाचित त्यांनी ते पैसे लोकोपयोगासाठी (?) खर्च केले असते आणि निदान त्या ८ निष्पाप श्रीसेवकांचा जीव ही वाचला असता. पण नक्की हि गर्दी सरकारला कोणाला दाखवायची होती ? हा एक मोठा प्रश्नच आहे. यातुन सरकारने साध्य काय केले ?
काही (अंड )भक्त आहेत ते नक्कीच बोलतील लोकांनी या कार्यक्रमाला कशाला जायाचे. लोकांचीच चुक आहे..,कारण त्याच्या बापाने केलेली चुक ते मान्य करणार नाही,, जर सरकारने या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी वेगवेगळ्या मिडीयाला लाखो रुपयाच्या जाहिराती देऊन लोकांनी कार्यक्रमासाठी यावे असे आमंत्रण दिले असेल त्यामुळे लोक या कार्यक्रमासाठी आली होती..मग जर कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना बसण्याची,पाण्याची आणि सावलीची व्यवस्था सरकारने केली पाहिजे होती, पण सरकारने ती व्यवस्था पुरेशी केली नाही. त्यामुळेच सरकार या लोकांच्या मृत्युला जबाबदार आहे.)
एखादा जयंतीचा कार्यक्रम जरी असला किंवा कोणत्याही सणाचा कार्यक्रम जर असला तर तो कार्यक्रमासाठी रितसर पोलिसाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी येणारया लोकांची संख्या किती.त्या लोकांची व्यवस्था कशी केली आणि जर काही घडले तर अँम्युलन्सची व्यवस्था आणि कार्याक्रम किती वाजेपर्यत संपणार, आणि जर त्या कार्यक्रमात जर गाणी लावणार असेल तर साऊंड लावणार असेल तर ..आणि गाणी जर दिलेल्या वेळेत बंद केला नाही तर जे आयोजक आहे त्या आयोजकांवर गुन्हा दाखल होतो...
मग महाराष्ट्र भुषण कार्यक्रम या आधीही झाले . पण इतका मोठा event कधी केला नव्हता.. भर ऊन्हात लाखो लोक जमवले नव्हते . मग आता लोकांच्या झालेल्या या मृत्युला ही हेच जबाबदार आहे.
देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, तंत्र-मंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका', देव दगडात नसून तो माणसांत आहे, मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही, असं सांगणाऱ्या संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्रभर धर्मशाळा उभारल्या. त्यांच्या ट्रस्ट मध्ये करोडोने पैसा जमा व्हायचा. त्या माध्यमातून त्यांनी जे काही सामाजिक काम केले ते आपण सर्वांनी पाहिले. गाडगेबाबा यांनी आपल्या ट्रस्ट मध्ये कोणीही आपला नातेवाईक घेऊ नये असं स्पष्ट सांगितले.
पत्रकारितेचे शिक्षण घेऊनही बाजारू व्यवस्थेमुळे पत्रकारिता करावी वाटली नाही पण शोधपत्रकार शांत बसत नाही सगळ्या श्रीसेवकांना कुटूंब मानणाऱ्या महाराष्ट्र भूषण श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मात्र आपल्या "डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" ट्रस्टमध्ये खालील फक्त चार विश्वस्त नेमले आहेत..!
१. श्री. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी पद अध्यक्ष
२. श्री. सचिन दत्तात्रय धर्माधिकारी पद सचिव
३. श्री. उमेश दत्तात्रय धर्माधिकारी पद खजिनदार
४. श्री. राहुल दत्तात्रय धर्माधिकारी पद सहखजिनदार
आणखी विशेष म्हणजे "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टमध्ये विश्वस्तांच्या किंवा व्यवस्थापकांच्या जागी दुसरा विश्वस्त किंवा व्यवस्थापक येण्याची रीत " या न्यासाचे विश्वस्त मंडळात ४ विश्वस्त राहतील. हे विश्वस्त मरेपर्यंत राहतील व त्यांचे पश्चात त्यांचे वारसाहक्काने पद भरले जाईल व तोही विश्वस्त मरेपर्यंत राहील" अशी कायदेशीर तरतूद केली आहे..!
कोट्यवधी माणसांकडून, कंपन्यांकडून आणि शासनाकडून सामाजिक सेवेच्या नावाखाली कुटूंबासाठी काढलेल्या खाजगी ट्रस्टसाठी देणग्या घेऊन घरातील चौघांच्याच मनमर्जीप्रमाणे खर्च केले जात आहेत आणि सामान्य माणसाला केवळ प्रवचनातून श्रीसदस्य कुटूंबीय असल्याचे भासवले जाते आहे पण ट्रस्टवर मात्र घराणेशाही आहे...!
सगळीकडे केवळ कालच्या कार्यक्रमावर टीका होत आहे पत्रकार केवळ पोकळ बातम्या देत आहेत पण यावर आता बोलले पाहिजेच म्हणून प्रयत्नपूर्वक "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टची घटना मिळवून हे वास्तव मांडले आहे यातून कोणी श्रीसेवक शहाणा झाला तर ठीकच आहे..! "बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि" अशी संत तुकारामांची शिकवण असल्याने ही पोस्ट केली आहे बाकी कुणाच्या भावना दुखावणे असा उद्देश नाही..!
शिवराम ठवरे 9175273528
लहान मुल बायका पाणी पाणी करून रस्त्यावर पडले असताना खारघर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हे स्वत पाणी उचलून वाहून आणत होते त्यांनी तसेच अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार हे जनतेला मदत करत होते हे पण कोणीतरी दाखवा. तीन दिवसांपासून महाराष्ट्रातून पोलीस अधिकारी अमंलदार महिला पोलीस आले होते ते पण उन्हात उभे राहून कर्तव्य बजावत होते दिवसभर थांबुन रात्री स्वत मा पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त व सर्व वरीष्ठ अधिकारी रात्री 2.30 वा बंदोबस्त करीत होते सकाळी 5.00ला पुन्हा बंदोबस्त ला सगळेच हजर होते म्हणून चेंगराचेंगरी झाली नाही यांची नोंद मिडियाने घ्यावी...अनेक माताभगिनी उणामुळे चक्कर येऊन पडले असताना अनेक पोलीस आधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल ने गर्दीतून वाट काढत त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवत होते ...आजुनही अनेक अधिकारी व अंमलदार हे अहोरात्र काम करून मयताचे नातेवाईक व आजारी लोकांना मदत करत आहेत कोणीही घरी गेलेले नाही ...
0 टिप्पण्या