Top Post Ad

मनुस्मृती लागू होताच कामगार आंदोलने शांत झालीत का?..

 


     भारतीय संविधानाने दिलेले 
कामगार कायदे बदल करून मनुवादी मनुस्मृती उद्योजक धार्जिणे ४ कायदे बनवले.त्यामुळेच राष्ट्रीय बारा ट्रेड युनियनचे कामगार आंदोलन करून शांत झाले.आणि हळूहळू खाजगीकरण सुरू झाले.कामगार आंदोलन करून शांत का झाला?.कारण कामगार व कामगारांच्या संघटना,युनियन चे नेतृत्व करणारे कट्टरपंथीय मनुवादी असल्यामुळे तिव्र आंदोलने झाली नाहीत.हे सत्य आता उघड झाले.केंद्रातून सुरवात झाल्यामुळे आता तर प्रत्येक राज्यशासनाच्या विविध विभागात खाजगीकरण होणार आहे.कामगार आंदोलन करून शांत होणार,युनियन ही थोडे दिवस विरोध करून औद्योगिक कोर्टात जाणार व‌ निकाल येईपर्यंत शांत होणार कामगारांच्या हिताचा विचार करणाऱ्या युनियन आता मुकाट्याने सहन का करत आहे?.या मागे त्यांचे अंतिम ध्येय उदिष्ट हिंदुराष्ट्र आहे.हे कामगार विसरला असेल.पण नेतृत्व विसरले नाही.म्हणूनच सर्व घडामोडी घडत आहेत आणि सर्वीकडे शांत शांत आहे.शेतकरी,अंगनवाडी सेविका,सर्व क्षेत्रातील असंघटीत कंत्राटी कामगार यांची आंदोलने होतात.पण ही आंदोलने कोणाच्या नेतृत्वाखाली होतात.ज्यांनी संघटीत कामगारांचे नेतृत्व केले त्यांनी असंघटीत कंत्राटी कामगार आणि मानधनावर काम करणारे कर्मचारी निर्माण केले त्यांच्या नेतृत्वाखाली?.म्हणजेच त्यांना हेच दाखवायचे असते की आम्ही तुमच्यासाठी लक्षवेधी आंदोलने करतो.आणि दुसरीकडे मनुस्मृती लागू होताच संघटीत कामगार आंदोलने शांत झाले.

      महात्मा फुले नारायण मेघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून कामगार चळवळीला एक नवीन दिशा देण्याचे काम केले होते. भारत इंग्रजाच्या पारतंत्र्यात होता.तेव्हा देखील कामगार गुलामा सारखा राबत होता.तेव्हा रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी इंग्रजांकडे कामगारांच्या हितासाठी अनेक निर्णय ठराव त्या ठिकाणी संघर्ष करून त्यांनी मंजूर करून घेतले होते .रविवारची सुट्टी ही सुद्धा त्याच काळात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संघर्षाच्या माध्यमातून मिळाली आहे.आज आपल्या भारतातील जनतेला कामगाराला कष्टकऱ्यांना मजूरांना मिळालेली आहे हे सर्व राष्ट्रीय ट्रेड युनियन वाले विसरतात. तद्नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताचे प्रथम कायदेमंत्री मजूरमंत्री असताना त्यांनी देखील या देशातील तमाम गरीब कष्टकरी मजूर यांच्या हिताचे कायदे बनवून आणि ते संविधानामध्ये मांडून त्या कायद्याचं सर्व कामगार कष्टकऱ्यांना सुरक्षा कवच निर्माण करून दिले होते.काल पर्यंत त्याचा फायदा आपल्याला कामगारांनी कर्मचाऱ्यांनी 70 वर्षापर्यंत घेतला आहे. व ह्यापुढे ही घेणार कि नाही हे त्यांच्या हाती आहे.मनुवादी विचारांच्या बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन ते होऊ देणार नाहीत.त्यासाठी आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी युनियनच्या स्वतंत्र मजदूर युनियन सोबत कामगार,कर्मचारी संघटीत होऊन लढलो तर!.
    
  पूर्वीच्या काळामध्ये कामगारांना कष्टकऱ्यांना कोणत्याही सुख सुविधा नसताना देखील ऊन वारा पाऊस याची तमा न मानता अन्नपाण्या विना हजारोमैल आंदोलनाला पायी जाऊन त्या ठिकाणी बसत असत आणि असे असताना देखील त्या ठिकाणी त्या लढाया जिंकल्या होत्या परंतु आज 70 वर्षानंतर त्याच कायद्याच्या माध्यमातून मिळालेल्या सर्व सुख सुविधांचा उपभोग घेऊन सुद्धा आजचा कामगार कष्टकरी हा आंदोलनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे. आंदोलनाला आपली गरज नाही असं समजून हे काही लोकांचेच  विषय आहेत म्हणून पुढे येत नाही किंवा बोलत नाहीत परंतु प्रत्येक कामगार हा कोणत्याही जाती,धर्माचा,प्रांताचा आणि वर्गाचा असो,तो कामगार कोण आहेत कामगारांची लढाई आपलीच लढाई आहे असे समजून त्यांनी त्या लढाईत आले पाहिजे सरकारला धारेवर धरले पाहिजे. प्रशासनाकडून त्या सगळ्या मागण्या पदरात पाडून घेतल्या पाहिजे त्यासाठी कामगार विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन संघटित झाला पाहिजे. कामगारांच्या हितासाठी काम करणाऱ्या युनियन यांनी हे कार्य नेटाने केलेले पुढे नेले पाहिजे.
    
 कोणत्याही प्रकारची माघार त्यांनी न घेता त्या लढ्याला यश मिळवून दिले पाहिजे आज भारत देशामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 12 राष्ट्रीय अशा ट्रेड युनियन आहेत त्या युनियन कामगारांचे प्रश्न केंद्रामध्ये मांडू शकतात. परंतु त्या सुद्धा केंद्रामध्ये प्रश्न व्यवस्थितपणे मांडताना दिसत नाहीत. अनेक वेळा कच खाऊ भूमिका त्या योग्य ठिकाणी घेतांना उघड दिसतात. कारण काय आहे?.मनुवादी हिंदुत्व हे सांगता ये नाही, मात्र एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास येते की नुकसान हे सर्वात जास्त देशातील बहुजन समाजातील कामगार कर्मचारी लोकांचेच होत आहे आणि मग ते बहुजन समाजाच्या लोकांचे निर्णय घेण्यासाठी जर बहुजन समाजाच्या लोकांची युनियन जी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू फुले आंबेडकर विचारांची युनियन काम करत असेल, तर अशा युनियनच्या पाठीशी सर्व बहुजन समाजातील कामगारांनी उभे राहिले पाहिजे तरच आपण हे जुलमी कायदे या देशातून हद्दपार करू शकतो.आणि शासन कर्ती जमात बनून शासन यंत्रणेवर दबाव निर्माण करू शकतो.या बळावर आज केंद्रात आर एस एस प्रणित भारतीय मजदूर संघांच्या मध्यमातून शासन यंत्रणेवर पूर्णपणे वर्चस्व निर्माण झाले आहे. म्हणजेच मनुस्मृती लागू होताच कामगार आंदोलने शांत झाली का?..हा प्रश्न उभा राहतो,

रणधीर आल्हाट- ९७८२९८७८१९,
कार्याध्यक्ष- स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन
महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com