Top Post Ad

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणार्या भरतीबाबतची माहीती


   'सरकारी नोकरी‘ हे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. परंतु ही नोकरी मिळते कशी ? यासाठी अर्ज कोठे करायचा ? अर्ज निघतो कधी ? यासाठी पात्रता काय असावी लागते ? यासाठी वशिला (ओळख वगैरे) लागतो का ? यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते का ? अभ्यासक्रम कोणता असतो ? अशी बरीच प्रश्न उमेदवारांच्या मनात असतात आणि या प्रश्नांची योग्य वेळी उत्तरं मिळाली नाहीत तर सरकारी नोकरी हे फक्त स्वप्नच राहते. अशाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणार्या भरतीबाबतची माहीती पाहणार आहोत.

 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील संवर्गातील एकूण 673 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023’ रविवार, दि. 4 जून 2023 रोजी 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील.

(I) सामान्य प्रशासन विभाग - राज्य सेवा गट-अ व गट-ब - एकूण 295 पदे (मुख्य परीक्षा 7, 8, 9 ऑक्टोबर 2023).

(1) उपजिल्हा अधिकारी, गट-अ - 9 पदे.

(2) राज्यकर सहायक आयुक्त, गट-अ - 12 पदे.

(3) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ - 36 पदे.

(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (कनिष्ठ) - 41 पदे.

(5) सहायक कामगार आयुक्त, गट-अ - 2 पदे.

(6) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ - 51 पदे.

शारीरिक मापदंड - पुरुष - उंची - 163 सें.मी. छाती - 79-84 सें.मी.; महिला - उंची - 155 सें.मी., दृष्टी - चष्म्याशिवाय - 6/24, चष्म्यासह - 6/6.

(7) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब - 17 पदे.

(8) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब - 1 पद.

(9) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब - 50 पदे.

(10) मुख्याधिकारी, गट-ब - 48 पदे.

(11) उप अधिक्षक, भूमि अभिलेख, गट-ब - 9 पदे.

(12) उप अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब - 4 पदे.

शारीरिक मोजमापे - पुरुष - उंची - 165 सें.मी., छाती - 79-84 सें.मी.; महिला - उंची - 155 सें.मी., दृष्टी - चष्म्याशिवाय - 6/24, चष्म्यासह - 6/6.

(13) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब - 11 पदे.

(14) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब - 4 पदे.

पात्रता - पद क्र. 4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ - वाणिज्य शाखेची पदवी किमान 55% गुणांसह/C.A./ICWA/M.Com./M.B.A. (Finance). 

पद क्र. 6) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ - मेकॅनिकल/ऑटोमोबाई इंजिनिअरींग पदवी आणि हलकी अवजड वाहने चालविण्याचे परवाने (प्रोबेशन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ही ड्रायव्हिंग लायसन्सेस प्राप्त करणे अनिवार्य आहे.)

पद क्र. 14) उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब- B.E./B.Tech. (Civil) किंवा B.Sc.

1 ते 14 पैकी वरील 3 पदे वगळता इतर पदांसाठी पात्रता - पदवी उत्तीर्ण.

(II) पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग - महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट- व गट-ब - 130 पदे (मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर 2023).

(1) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग - (अ) सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), गट-अ - 89 पदे. (ब) सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य), गट-अ - 21 पदे.

(2) जलसंपदा विभाग - सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), गट-अ - 10 पदे.

(3) मृद व जल संधारण विभाग - जल संधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब - 10 पदे.

पात्रता - B.E./B.Tech. (Civil/Civil & Water Management/Civil & Environments/Structural/Construction Enggineering). 

(III) सार्वजनिक बांधकाम विभाग सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत) - महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब - 15 पदे (मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर 2023).

पात्रता - B.E./B.Tech. (Electrical/Electrical & Power/Electronics & Power/Power System/Electrical & Electronics). 

(IV) अन्न व नागरी विभाग - निरीक्षक, वैधमापन शास्त्र गट-ब - 39 पदे (मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर 2023).

पात्रता - B.E./B.Tech. (Mechanical/Electrical/Electronics/Computer Engineering) किंवा B.Sc. (एक विषय फिजिक्स असावा.)

(V) वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग - अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब - 194 पदे. (मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2023)

पात्रता - - A degree in Food Technology/Dairy Technology/Biotechnology/Oil Technology/Agricultural Science/Veterinary Science/Bio-Chemistry/Medicine. 

एकूण पदांपैकी महिलांसाठी 30%, खेळाडू 5%, दिव्यांग 4%, अनाथ 1% पदे राखीव.

वयोमर्यादा - उप जिल्हाधिकारी, गट-अ दि. 1 एप्रिल 2023 रोजी व इतर सर्व पदांसाठी 1 जून 2023 रोजी खुला - 38 वर्षे, मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/खेळाडू/माजी सैनिक - 43 वर्षे, दिव्यांग - 45 वर्षे.

पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. (त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी नेमून दिलेल्या शेवटच्या दिवसापर्यंत पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.)

निवड प्रक्रिया - संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

सर्व संवर्गातील पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 400 गुणांसाठी (पेपर-1 - अनिवार्य आणि पेपर-2 फक्त पात्रता स्वरूपाचा. प्रत्येक पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप 200 गुणांसाठी वेळ 2 तास)

राज्य सेवा मुख्य परीक्षा - 800 गुणांसाठी मुलाखतीचे गुण - 100.

इतर संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी, मुलाखतीचे गुण - 50.

परीक्षा शुल्क - अमागास - रु. 394/-; मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग - रु. 294/- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 22 मार्च 2023 (23.59 वाजेपर्यंत).

भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलाची प्रत घेण्याचा दिनांक 24 मार्च 2023 (23.59 वाजे)पर्यंत.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2023 (बँकेच्या कार्यालयीन वेळेत).

परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संयुक्त पूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज  https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर दि. 22 मार्च 2023 (23.59 वाजे)पर्यंत करावेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com