Top Post Ad

याने तर स्वतःला पॅंथरचा संस्थापक म्हणवून घेत खोटेपणाची हद्द ओलांडली...


 खरं तर राजा ढालेंच्या निग्रोच्या अभ्यासातून आणि अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या टाईम मॅगेझीनच्या, दरमहा राजा ढाले मागवगत वाचनाने ब्लॅक पँथरच्या ,यु.व्ही.न्युटन,  माल्कम एक्स आणि अंजेला डेव्हीस या नेत्यांची ओळख पहिल्यांदा राजा ढाले यांनी कवि नामदेव ढसाळ,कवि ज.वि.पवार या साहित्य वर्तुळातील मित्रांना करून दिली  होती. त्याच  काळात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शंकरराव पाटील या मंत्र्याचा भाऊ धनदांडगा आणि जात दांडगा शहाजी पाटलाने, आंबेडकरी समाजावर गावबंदी करणारा बहिष्कार टाकला होता.तो बहिष्कार निपटून काढण्यासाठी दि.१२मे१९७२ आणि २९मे दिवशी त्यांच्या लिटिल मॅगेझीन चळवळीतील मित्र आणि समाज युवजन सभेततीव मित्रांना घेऊन बावड्याला गेले होत;त्यात हुसेन दलवाई, शांताराम पंदेरे हे युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.त्याचवेळी राजा ढालेंच्या चर्चेतल्या झडत असलेल्या आणि आंबेडकरी समाजावर अन्यायाविरुद्ध ब्लॅक पँथर सारखी लढावू संघटना उभारली पाहिजे!या राजा ढाले यांनी सुचविलेल्या धोरणानुसार आणि चर्चेतून नामदेव ढसाळ  आणि ज.वि.पवार यांनी निकडीची गरज म्हणून, राजा ढालेंच्या अपरोक्ष, गिरगावच्या नाक्यावर "दलित पँथरची" घोषणा केली आणि ती बातमी जवळच्या नवाकाळ वर्तमान पत्रात छापवून आणवली. हा झाला दलित पँथरचा स्थापनैचा इतिहास!

९ जुलै रोजी १९७२ रोजी पहिला मेळावा बाप्टीरोडला राजा ढालेंच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दुसरा मेळावा, आयु.अविनाश शरद महातेकर आणि गोविंद सोनवणे, व  एस आर जाधव यांच्या पुढाकाराने लवलेन माजगाव येथे पार पडला.

पत्रकार राहूल कुलकर्णी यांनी वारंवार विचारले की पॅंथरमध्ये फूट पडली तर लालभाई अर्जून डांगळे फक्त वैयक्तिक मोठेपणामुळे येवढे उत्तर देत होते म्हणजे जयंत प्रधान, अनिल बर्वे, नक्षलवादी सुनिल दिघे हे कम्युनिस्ट पॅंथर चळवळ नामदेव ढसाळ यांच्या माध्यमाच्या द्वारे बळकावून पाहात होते हे मात्र सांगत नव्हते!  डांगळे जन्मान कम्युनिस्ट होते.७मार्च 1973  शिवाजी पार्कवर 

चातुर्वर्ण्याची र्पुरस्कार करणारी गीता राजा ढालेंच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्कवर बाळ ठाकरे यांना आव्हान देऊन जाळण्यात आली त्यावेळी नामदेव ढसाळ हे पुण्याला होते त्यांना पॅंथरच्यावतीने चार तारा केल्या तरी सुद्धा ते गीता जाळण्याच्या कार्यक्रमाला आले नाहीत आणि अर्जुन डांगळे मुंबईत असूनही ते शिवाजी पार्कवर आले नाहीत म्हणजे गीतेचा चातुरवर्ण्य दोघांनाही मान्य होता की काय? दुसरा असं की अर्जुन डांगळे स्वतःला पॅंथरचे संस्थापक म्हणवतात पण 1973 च्या सऱ्याच्या अगोदरच्या दिवशी मलबार हिलवर संस्कृत पंडितांचा सरकारतर्फे सत्कार करू पाहत होते त्या सत्काराला पॅंथर राजा ढालेनी आणि ज वी पवारांच्या नेतृत्वाखाली विरोध म्हणून बँड स्टँडवर आम्ही सगळे पॅंथर जमले होतो त्यावेळी समाजवादी मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर, कमलताई देसाई हे सगळे संस्कृत पंडितांच्या सत्कार विरोधी मलबार हिलवर जमले होते. त्यावेळेस सुद्धा अर्जुन डांगळे हे आले नाहीत.

त्याचबरोबर १९७३ दुष्काळाच्या परिस्थितीवर सरकारने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली होती त्या बैठकीला पॅंथरच्या वतीने ज वी पवारांनी एक ठराव मांडला की अन्याय अत्याचार आणि विरुद्ध सरकार ठोस पावलं उचलत नाहीत म्हणून शासनाचा धिक्काराचा ठराव या बैठकीत मांडला पाहिजे. परंतु त्यावेळी त्या ठराव विरुद्ध गवयी आणि डांगळे हे सरकारच्या बाजूने उभे राहिले आणि ज वी पवार, भाई संगारे आणि आम्ही जमलेले पॅंथचे कार्यकर्ते बैठकीवर बहिष्कार घालून वॉकाऊट करते झालो परंतु अर्जुन डांगळे मात्र त्यांचा म्हणून बाजू घेणारे त्यानंतरच्या सोबत वाकावूट, बैठक सोडून बाहेर आले नाहीत आणि उलट दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये राजा ढाले नामदेव ढसाळ ज वी पवार अविनाश  महातेकर आणि भाई संगारे या पॅंथर नेत्यांना मी म्हणजे अर्जुन डांगळे, पॅंथर मधून अर्धा चंद्र देत आहे असे पत्रक प्रसिद्ध केले त्यावेळी राजा ढाले यांनी त्यांच्याविरुद्ध एक पत्र लिहिले की अर्जुन डांगळे यांनी आम्हा पॅंथर नेत्यांना जरी अर्धचंद्र दिला असला तरी आम्ही पॅंथरचे पाचही नेते व त्यांना, पूर्ण चंद्र देत आहोत त्या पत्रकामुळे अर्जुन डांगळे हे चौताळले पण खजील झाले आणि चुपचाप बसले जर ते पॅंथरचे संस्थापक होते तर नाईक सरकारच्या विरुद्ध वॉक आऊट करून बाहेर का गेले नाहीत हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

तसेच 30 डिसेंबर 1973 रोजी त्यानंतरची कार्यकारणी निवडली गेली त्यावेळी राजा ढाले आणि ज वी पवार हे वडाळा येथील कोणी एक कार्यकर्ता निकम नावाचा निधन पावला होता त्याच्या अंत्यविधीला गेले होते म्हणून नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली नायगावच्या बीडीडी चाळ तेवीस नंबर नंबरच्या चाळीत ती कार्यकारणी निवडली गेली त्यावेळी राजा झाले अध्यक्ष नामदेव ढसाळ संरक्षण मंत्री ज वि पवार जनरल सेक्रेटरी अविनाश महातेकर उप संरक्षण मंत्री आणि भाई सांगारे हे सहचिटणीस निवडले गेले त्याचबरोबर मुंबईचे संपर्क मंत्री म्हणून रामदास आठवले, साराभाई वेळुंजकर , शिवडीचे भीमनाथ जाधव लवलेनचे सुहास सोनवणे खारचे मारुती सोनवणे आणि पवई मिलिंद नगरचे मोहन कांबळे हे संपर्क मंत्री म्हणून निवडले गेले त्याही वेळी त्या बैठकीत पॅंथरचे संस्थापक म्हणून घेणारे अर्जुन डांगळे गैरहजर का होते?

अर्जुन डांगळे आपल्या मुलाखतीत माटुंगा लेबर कॅप्सचा आवर्जून उल्लेख करतात आणि त्यांच्या आईचे मामा शंकर नारायण पगारे हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते त्याचबरोबर कोणीतरी गांगुर्डे हे सुद्धा माटुग्याचे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते वावरत होते त्यांचाही ते आदराने आणि आवर्जून उल्लेख करतात  बाबासाहेबांच्या चळवळीमधले अनेक कार्यकर्ते मुंबईत राहत होते त्यांचा उल्लेख करत नाहीत. परंतु करंजगावचे श्रीपाद अमृत डांगे यांचा गौरव आणि उल्लेख करतात म्हणजे डांगळे हे जन्मापासून कम्युनिस्ट चळवळीत वावरणारे होते हे उघड होते. म्हणून ते दलित साहित्याबद्दल बाबुराव बागुल, दया पवार आणि कम्युनिस्ट रावसाहेब कसबे यांचाही आवर्जून उल्लेख करतात. परंतु संघटना निर्माण केली त्या राजा ढाले यांचा उल्लेख करत नाहीत. तर नामदेव ढसाळ हे त्यांचे कम्युनिस्ट विचारसरणीचे सहकारी म्हणून कौतुकाने उल्लेख करतात.

१९७३ साली आसखेड आणि गोनिवडे ह्या राजगुरुनगरच्या तालुक्यातील गावच्या धनदांडगे यांनी जमिनी जबरदस्तीने कसल्या होत्या त्या सोडवणूक करण्यासाठी राजा ढाले ज वी पवार नामदेव ढसाळ भाई सांगारे, महातेकर आणि आम्ही सगळे साडेतीनशे चारशे कार्यकर्ते त्या गावाला जाऊन त्या दलितांच्या जमिनी पिकासह आंबेडकरी समाजाच्या हवाली केल्या त्याही वेळी अर्जुन डांगळे परागगंदा राहिले हे कसे काय? ते जर पॅंथरचे संस्थापक होते तर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या संघटनेत पुढाकार घ्यायला पाहिजे होता परंतु चामडी बचाव धोरण स्वीकारून ते चळवळीपासून फटकून राहिले.

मुलाखतीत राजा ढाले हे अतिशय सुबक आणि सुंदर अक्षरात लिहीत असत हे त्यांनी आवर्जून सांगितले पण राजा ढाले यांचे विचार त्या अक्षरांसारखेच स्वच्छ आणि नीतळ होते आणि ते सतत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भारलेले असलेले आंबेडकरी विचार आणि बाबासाहेबांचा बुद्धाचा वैचारिक मागोवा घेत असत हे मात्र अर्जुन डांगळे यांनी जाणीवपूर्वक मुलाखतीत सांगण्याचे टाळले हा बाबासाहेबांच्या विचाराशी विद्रोह आणि गद्दारी होती तर कम्युनिस्ट विचाराची जवळीक होती हे यातून डांगळे बद्दल समजून येते.

1974 साली, बुलढाणा जिल्ह्यातील धाकली गावी धंनदांडगे यांनी कुरापत काढून गोपाळ गवयी आणि त्यांचा भाऊ यांचे डोळे फोडले होते त्यावेळी ही बातमी कळताच राजा ढाले हे त्या गावाला धावून गेले आणि त्या गवयी बंधूंना मुंबईला सिद्धार्थ विहार होस्टेलवर घेऊन आले आंणि एक फेब्रुवारी 1975 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी या जोगेश्वरी येथे झालेल्या दंगलीच्या वेळी त्या वस्तीला भेट द्यायला आल्या होत्या त्यावेळी राजा ढाले आणि ज वी पवार यांनी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची सांताक्रुज विमानतळावर भेट घेऊन गवयी बंधूंचे डोळे फोडल्याची कैफियत इंदिरा गांधी यांच्या कानी घातली आणि ज वी पवार प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्याशी बोलत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे मध्येच अडवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी राजा ढाले यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ठणकावले की अरे ज वी पवार मॅडमशी बोलत असताना तुम्ही चोंबडेपणा का म्हणून करताय? हे इंदिरा गांधींना खूप बोचलं आणि भावलं सुद्धा की एक 32 ते 3३ वर्षाचा तरुण राजा ढाले मुख्यमंत्र्यांना अन्यायाबद्दल असं खडसावतो तर तो किती खवळलेला असेल? याची जाणीव प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी करून घेतली आणि त्याच महिन्यात 12 फेब्रुवारीला वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची ऑर्डर दिली हे अर्जुन डांगळे आणि त्यांचे सहकारी कम्युनिस्ट विचारसरणीचे सगळे यांना खटकत होतं म्हणून ते राजा ढालेच्या विरुद्ध  वैरभाव कार्यकर्त्यांमध्ये पेरत होते हे उघड आहे! 

१९७७ची लोकसभेची निवडणूक भय्यासाहेब आंबेडकर बौद्धांच्या सवलतीचा मुद्दा घेऊन राजा ढालेंच्या सल्ल्याने लढवत होते. बुध्द कॉलनी मध्ये राजा ढाले नेतृत्वाखालील पॅंथरची बळकट छावणी होती, ते कार्यकर्ते भय्यासाहेब आंबेडकर यांचा बॅनर लावून होते तसेच नामदेव ढसाळ यांचे दिलीप भालेराव एकमेव कार्यकर्ता राजा कुलकर्णी बॅनर लावून बसला होता, आणि कापडणे हा संगारे-महातेकर या गटाचं तसेच जनता पक्षाचं  बॅनर लावून बसला होता.

एकाच वसाहतीत तीन बॅनर पाहून, रिपब्लिकन गटातटांना नावे ठेवणारेच गटा गटांत विभाले हे आणि बुध्दीस्ट होऊनही दलित कसे?"दलित"शब्द खटकत असलेल्या. गट पुसून टाकण्यासाठी ७ मार्च १९७७ रोजी राजा ढाले यांनी पत्रकार परिषदेत पॅंथर बरखास्त केली आणि " मुक्तीपथिक आंबेडकरी समाज संघटन"म्हणजे "मास मुव्हमेन्ट"ही संघटना स्थापन केली.

राजा ढाले यांच्या निधनानंतर अनेक रावसाहेब कसबे, अर्जुन डांगळे  असे उंदीर त्यांची थेटरं करांडत आहेत. राजा ढाले हयात असते तर या लुंग्या  सुंग्या रावसाहेब कसबे अर्जुन डागळे यांची त्यांच्यासमोर बोलायची किंवा लिहायची हिंमत होती काय? नव्हे तर मराठ्यांचा एक लाख मोर्चा निघाला असताना त्या रावसाहेब कसबे ने त्याविरुद्ध काहीतरी बकवास केली . त्यावेळेस मराठा समाजाचे लोक त्यांच्यावर मारायला टपले असताना ते प्रज्ञा दया पवार यांच्या आडोशाला गेले आणि प्रज्ञा पवार यांनी राजां ढालेंना फोन करून काका या रावसाहेब कसबे यांना वाचवा असा टाहो फोडला होता! हे रावसाहेब कसबे विसरले काय? पण प्रज्ञा दया पवार या विसरलेल्या नाही. १९९६साली रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाले होते आणि २६ फेब्रुवारी १९९६ रोजी रिपब्लिकन जनतेने मुंबई ऐतिहासिक बंद केली.त्या्ने हुरूप वाढला आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही मार्गाने पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक, निवडणूक अधिकारी म्हणून २२मार्च १९९७ रोजी घेऊन त्यात राजा ढाले हे  आठवले यांना हरवून निवडून आले. 

पण त्याचवेळी अर्जुन डांगळे या भारिपच्या कार्यकर्त्याचा जळफळाट झाला आणि त्याने बाळासाहेब आंबेडकरांचे कान भरून ही निवडणूक ऐक्याच्या सर्व नेत्यांच्या समोर मुक्रर करून घ्यावी अशी टूम काढली आणि 27 मार्च 1997 रोजी  पुन्हा आजाद मैदान येथील इंसा हटमेंट या आठवलेंच्या कार्यालयाऐक्याच्या नेत्यांची बैठक घेऊन राजा ढाले यांची निवड रद्दबातल करून घेतले आणि पुन्हा नेते म्हणून आणि जेष्ठ म्हणून रा.सू.गवयी यांची अध्यक्ष निवड करण्यात आली हा सर्व खेळखंडोबा करता करविता आणि कान भरविता अर्जुन डांगळे होता जो डांगळे पॅंथर मध्ये कार्यकर्ता म्हणूनही तो कधीही एकरूप झाला नाही त्याच डांगळ्यांची पॅंथरच्या पन्नाशी मध्ये पत्रकारांनी मुलाखत घ्यावी हा विरोधाभास आणि एक विनोदच आहे.नाही काय?

-साराभाई वेळुंजकर.३ मार्च २०२३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com