Top Post Ad

२०२१ पासून ८६१ पात्र विद्यार्थ्यांना अद्याप कोणतीही शिष्यवृती नाही

 मागासवर्गिय विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी सरकारने १००० कोटी निधीची तरदुत करावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते समाजभूषण  उत्तमराव गायकवाड  यांची मागणी


  गेले २६ दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पात्र  ८६१ विद्यार्थी साखळी धरणे आंदोलन आझाद मैदानावर करित आहेत. बार्टीने विशेष परीक्षा घेऊन विविध विषयावर संशोधन करण्यासाठी परिक्षा घेतली त्यात ८६१ विद्यार्थी पात्र झाले परंतु २०२१ पासून या विद्यार्थ्यांना आद्याप कोणतीही शिष्यवृती मिळाली नाही तीन वेळा पूणे बार्टी कार्यालया समोर विविध प्रकारे आंदोलन केले आहे आणि चवथे आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे करित आहेत, काल विद्यार्थ्यांच्या शिष्ठमंडळाने राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते उत्तमराव गायकवाड यांच्यासह प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची भेट घेतली तेव्हा विद्यार्थ्यांना पात्र झालेल्याना फेलोशिप मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले आहे या कालखंडात अनेक राजकीय पक्षाचे नेते आमदार खासदार वरिष्ठ नेते यांनी सदर विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे शिवाय विधानसभा विधान परिषेदेत आमदारांनी लक्षवेधी टाकली आहे परंतु या मागणीचा कोणताही निर्णय लागलेला नाही जो पर्यत आमची रास्त मागणी पूरी होत नाही तो पर्यत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. 

बार्टीकडे निधी नाही म्हणून फेलोशिप देता येत नाही असे कारणसांगण्यात आले आहे.  म्हणून ज्या मागासलेल्या समाजातील विद्यार्थी जे मागासवर्गीय  उच्च शिक्षण घेऊन व संशोधन करु ईच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी १००० कोटी केद्रिय सामाजिक न्याय खात्यानेआपल्यावतीने निधीची तरदुत करावी अशी मागणी गायकवाड  यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना रामदास आठवले यांच्याकडे  पत्रकाद्वारे शासनाला केली आहे अन्यथा आंबेडकरी चळवळीतील समाजाला तिव्र आंदोलन करावे लागेल असा ईषाराही दिला आहे 

सुरवातीच्या काळापासून समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीस पाठिंबा देवून सहकार्य करित आहेत  मुख्यमंत्री उपमुख्यमंञी यांच्या भेटी झाल्या आहेत शिवाय सामाजिक न्याय सचिव सुमेत भांगे सहसचिव दिनेश डिगोळे बार्टीचे महाव्यवस्थापक सुनिल वारे यांचीही भेट घेतली असून अश्वासना शिवाय काहीही हाती लागले नाही  सामाजिक सचिव सांगतात ८६१ विद्यांना सरसकट फफेलोशि दिल्यास ४६१ कोटी रुपये लागतील शासन २०० विद्यार्थी यांना फेलोशि देवू शकते गरीबाचे सरकार आपले सरकार घोषणा करित असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंञी मागासवर्गीयावर अन्याय करित आहे त्यांच्या शिक्षणाशी खेळत आहे याची खंत व्यक्त करण्यात येत आहे

बार्टी बरोबर सारथी मराठा समाज विद्यार्थी महाज्योती ओ बी सी समाज विद्यार्थी यांना सरसकट फेलोशि दिली जाते मग परंतु या समाजापैक्षा पिढ्यानपिढ्या वंचित असणाऱ्या घटकावर  सरकार का अन्याय करित आहे असा खडा सवालही समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी विचारला आहे आम्हांलाच का वेगळा न्याय सारथी महाज्योती अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट मिळणाऱ्या फेलोशिपला कोणताही विरोध विद्यार्थ्यांचा नाही. बार्टी विविध कार्यक्रमावर चहापाण्यावर कोट्यावधी रुपये खर्च करित आहे हे थाबले पाहिजे  काहीही कारण काढून संबंधित आधिकारी बार्टीची लुटमार करित आहे आधिकारी वर्गाला विविध कार्यक्रम निमित्ताने विविध कार्यक्रम घेयाचे आहे शास्त्रीय निधीचा दुरोपयोग करित आहे असा खळबळजनक आरोपही केला आहे ज्या कार्यक्रमवर नहाक खर्च न केल्यास तीच कोट्यावधीची रक्कम विद्यार्थी यांना मिळू शकेल

सामाजिक खात्याच्या निगडीत बार्टी विभाग असून राज्य शासन व केंद्र शासन सामाजिक न्याय विभाग म्हणून आर्थिक खर्च करित आहे केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे मंञी म्हणून रामदास आठवले आहेत ते खास बाब म्हणूनही निधी देवू शकतात आणि विद्यार्थी यांच्याशि खेळला जाणारा आधिकारी महाराष्ट्र शासन यांचा  लपंनडाव उद्धस्त होऊ शकतो अशीही मागणी समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी केली आहे 

रामदास आठवले मुख्यमंत्री उपमुख्यमंञी यांना पञ पाठवितो म्हणून सांगतात परंतु केद्रिय सामाजिक खातेच त्यांच्या हातात आहे एका चुटकी सरशि विषय संपवू शकतात. विद्यार्थी यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आठवले कवाडे आंबेडकर गवई यांच्या कानावर घातली आहे रिप सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या सहकारीसह एक दिवसाचे बोब मारो आंदोलन विद्यार्थ्यांच्या बरोबरीने करुन पाठिंबा दिला आहे. तर आंबेडकरी चळवळीतील सर्व घटकांनी प्रत्येक्ष अप्रत्यक्षपणे पाठिबा दिला आहे हे आंदोलन आंबेडकरी समाज सामुदायिक केल्या शिवाय रहाणार नाही असाही ईषारा समाजाभूषण उत्तमराव गायकवाड यांनी दिला आहे

दररोज विविध क्षेत्रातील संघटनेतील सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सहकार मधील प्रमुख कार्यकर्ते भेटी देवून पाठिंबा देत आहेत. विद्यार्थी यांच्या न्याय मागणीच्या आंदोलनात सुरवातीपासून तेआज तगायत  विद्यार्थी यांना दरोज आपण सहकार्य करित असून आंदोलन यशस्वी करणे पर्यंत त्यांच्या बरोबर राहिन. असेही उत्तमराव गायकवाड म्हणाले आता आंबेडकरी समाजानेच हे आंदोलन हातात घेतले पाहिजे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com