Top Post Ad

पाणी संपूर्ण सृष्टीसाठी अमृतच...


  आज जगात पाणी अत्यंत महत्वाचा घटक आहे.कारण जल नहीं तो कुछ नहीं! पृथ्वीतलावर मानवजातीच्या अतीरेकामुळे आज निसर्गाचे संतुलन डगमगतांना दिसत आहे. अन्न, वस्त्र, निवारा याचे मुख्य स्त्रोत पाणी आहे.कारण पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्यच नाही.भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी पाण्याचा हा!हा!कार! होतांना आपण पाहतो.आजही अनेक देश पाण्यासाठी कडवी झुंज देत आहे.आकाश-पाताळ,पुर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिन म्हणजेच आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मानव, पशु-पक्षी, जिवजंतु हे पाण्याविना जगुच शकत नाही.पाण्याविना निसर्ग नाही, जीवसृष्टी नाही  व मानवही नाही.म्हणजेच आज पाण्याचा एक एक थेंब सर्वांसाठीच अनमोल आहे.त्यामुळे पाण्याचे महत्व सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे.

1992 ला पर्यावरण व विकास या विषयावर संयुक्त राष्ट्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळेस विश्र्व जल दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली व संयुक्त राष्ट्र संघाने प्रत्येक वर्षी 22 मार्चला विश्व जल दिवस साजरा करण्याचे जाहीर केले.यानंतर 1993 मध्ये 22 मार्चला संपूर्ण जगात विश्र्व जल दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला.या दिवसाला पाणी संरक्षणा विषयी  जागृगता व पाण्याचे महत्व याला जास्त महत्त्व दिले जाते.आज मानवाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे पाणी आहे.कारण पाण्याविना संपूर्ण सृष्टीअधुरी आहे.आपण जगाच्या भुभागाचा विचार केला तर या पृथ्वीतलावर 70 टक्के पाणी व 30 टक्के भुभाग आहे.तरीही जगात पीण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर व बीकट असल्याचे दिसून येते.कारण 70 टक्के समुद्राचे पाणी खारे असल्यामुळे पीण्यायोग्य नाही. त्यामुळे आज संपूर्ण जगात पीण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.याचे मुख्य कारण म्हणजे जगातील वाढती लोकसंख्या यामुळे जगातील 50 टक्के जंगलसंपदा मानवाच्या अतिरेकामुळे नस्तनाबुत झाली आहे व होत आहे.त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता ते सरळ समुद्रात जात आहे.यामुळे आज जगात पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण होऊन दिवसेंदिवस समुद्राची पातळी वाढत आहे.समुद्राची पातळी  वाढने म्हणजेच पृथ्वीतलावरील संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत धोक्याची घंटा आहे.

जगात वाढते तापमान, हवामानातील बदल,औद्योगिकीकरण, जंगलतोड, युद्धजन्य परिस्थिती,व अनेक परमाणु परिक्षण यामुळे निसर्गानचे संतुलन ढासळतांना दिसत आहे. औद्योगिकरणाच्या दुषीत वातावरणामुळे अनेक हिमकडे कोसळताना आपण पहातो.यामुळे संपूर्ण जगात महाप्रलय, सुनामी आल्याचेसुध्दा आपणासर्वांना ग्यात आहे.जगातील हिमकडे साबुत रहाले तरच पाण्याची समस्या आपोआप कमी होईल.परंतु मानव स्वत:च्या स्वार्थासाठी हिमकड्यांचा बळी घेतांना दिसत आहे. अनेकदा देवभुमित आलेला महाप्रलय हा हिमकडे कोसळल्याने आलेला महाप्रलय आहे.संपुर्ण भारतात 80 टक्के पीण्यायोग्य पाणी हिमकड्यातुन मीळत असते.परंतु मानवाच्या अतीरेकामुळे हिमकडे वेळेच्या आधी वितळायला लागले आहेत.त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी तळागाळातुन प्रयत्न व्हायलाच पाहिजे.

आज जंगलातील संपूर्ण हिंसक पशु शहरांकडे का येत आहे याचा विचार कोणीच करीत नाही. जंगलातील हिंसक पशु-पक्षी शहरात येत नसुन आपण त्यांच्या घरावर म्हणजेच जंगलावर अतिक्रमण व आक्रमक करीत आहोत.त्यामुळे जंगलातील पशु-पक्षी शहरात व गावात येतांना दिसतात.पुर्वी छोटे-छोटे तलाव असायचे.परंतु आज पुर्विचे छोटे-छोटे तलाव वस्ती व कारखाण्यामध्ये परीवर्तीत झालेले दिसुन येतात.त्यामुळे आज गावात, शहरात,वस्तीत संपूर्ण ठिकाणी पीण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतांना दिसून येते.याचे मुख्य कारण म्हणजे मानवाने निसर्गावर केलेला अत्याचार होय.सध्याच्या काळात जगामध्ये आगजनीच्या घटना व वनवेलागने या मोठ्या प्रमाणात घटना दिसून येतात.जगात अनेक मोठमोठी जंगले अजुनही जळत आहे.कारण मानवाने जमीनीच्या पोटातील पाणी संपूर्णतः निचोडुन(आटवुन)टाकले आहे.

जगातील अनेक भागात ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतांना आपण पहातो.भुकंप, सुनामी ह्या संपूर्ण घटना पृथ्वीतलावर पाण्याची पातळी कमी होत असल्याने होत आहे.पाणी टीकुन रहाले असते तर ज्वालामुखी, सुनामी, महाप्रलय,भुकंप,वनवे लागने इत्यादी विनाशकारी घटनांचा उद्रेक झाला नसता.पुर्वी नदी,ओढे,तलाव,झिरा व विहिरीतून पाणी घ्यायचे परंतु आता नदी,तलाव व विहिरी आटुलागल्या आहेत.विहीरीची खोली 50 ते 60 फुटांपर्यंत असायची परंतु पाण्याचा दुष्काळ पहाता 50 ते 60 फुटांपर्यंतचे विहिरीचेसुध्दा पाणी आटल्याचे दिसून येते.त्यामुळे आता मानवजातीने बोरवेलचा सहारा घेऊन 500 ते 700 फुटांवर पाण्यासाठी खोलवर जावे लागत आहे.मनुष्याला पाण्याचा अधिकार फक्त 50 ते 60 फुटांपर्यंतच होता.परंतु मानवाने पाण्यासाठी संपूर्ण सीमारेषा ओलांडून पाताळात जाऊन तेथील पाण्यावर अतीक्रमन केल्याचे दिसून येते. म्हणजेच मानवाने सापाच्या बिळात हात टाकला आहे.ज्या पाण्यावर मानवजातीचा तिळमात्र अधिकार नाही तेही पाणी आपण आपली तहान भागवण्यासाठी वापरीत आहोत.हा मानवाचा निसर्गसृष्टीवर खुला अन्याय व अत्याचार नाही काय? 

आज मानवाच्या निष्काळजीपणामुळे व अतिरेकामुळे जंगले वाळुन (सुकली) गेली आहे. अनेक देशात गृहयुद्ध सुरू आहे.त्यामुळे संपूर्ण जगाने पाणी वाचवीण्याचा संकल्प करायला पाहिजे.अन्न,वस्त्र,निवारा आवश्यक आहे यात दुमत नाही.परंतु अन्न,वस्त्र, निवारा यांची उत्पत्ती ही पाण्यापासूनच होत असते.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाने 22 मार्चला विश्व जल दिवस साजरा करतांना पाण्याचे महत्व समजुन घेतले पाहिजे.जगापुढे शुद्ध पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी भारतासह संपूर्ण जगाने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.पर्यावयण व निसर्ग सुरक्षित तर पाणी सुरक्षित.पाणी सुरक्षित तर मानव, पशुपक्षी,जीव-जंतु सुरक्षित,जिव सृष्टी सुरक्षित तर पृथ्वी सुरक्षित ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. 

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जंगलातील हिंसक प्राणी (वाघ,अस्वल,सिंह,कोल्हा, बिबट्या, जहरीले साप) शहरात शिरकाव करतांना दिसतात.यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी सुध्दा झाली आहे व होत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे जंगलातील पाण्याचा तुटवडा होय. आज पाण्यासाठी मानव व प्राणी एकमेकांचे कट्टर शत्रृ बनल्याचे दिसून येते.जगात यापुढे पाण्याचे भिषन संकट येणार असून भारत या संकटाच्या केंद्रस्थानी रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नद्या, सरोवर, तलाव यामध्ये उपलब्ध असलेले पीण्याचे पाणी झपाट्याने प्रदुषित होत आहे.त्यामुळे कारखान्याचे दुषीतपाणी व सांडपाणी यांना पीण्याच्या पाण्यापासून कोसो दूर ठेवण्याची गरज आहे.दुषीत पाणी पील्यामुळे जगात दरवर्षी लाखोच्या संख्येने मानवीय व पशुपक्षांची हाणी मोठ्या प्रमाणात होतांना दिसुन येते यालाही थांबविण्याची गरज आहे.

एकावर्षात पडलेले पावसाचे पाणी अडवीता आले तर पाच वर्षे पुरेल इतका पाणी साठा आपल्याला उपलब्ध होवू शकतो.परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे अजुनही आपल्याला जमले नाही.आताही 80 टक्के पाणी प्रदूषित आहे.मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे त्यामुळे हे लक्षात ठेवले पाहिजे की पाणी संपले तर आपण संपु,आपण संपलो तर जग संपेल! त्यामुळे विश्र्व जल दिनाच्या निमित्ताने प्रत्येकांनी पाणी वाचविण्याचा "संकल्प"केला पाहिजे.तेव्हाच पाणी वाचेल.त्याचप्रमाणे "पाणी वाचवा देश वाचवा" हा निर्धार संपूर्ण जगाने अंगीकारला पाहिजे.आज जगातील वाढती पाण्याची समस्या यामुळे अनेक पशुपक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते.याकरीता जल विश्र्व दिनाच्या निमित्ताने वाढते प्रदुषण रोखण्याचा व पाणी वाचविण्याचा निर्धार सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.जागतिक जल दिनाच्या निमित्ताने प्रत्येकांनी एक तरी वृक्ष लावले पाहिजे.यामुळे जगात एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने वृक्षलागवड होईल.यामुळे जमीनीतील पाणी स्थिर रहाण्यास मोठी मदत होईल.


 रमेश कृष्णराव लांजेवार
नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com