Top Post Ad

महिला आजही पूर्वी इतक्याच सुरक्षित अथवा असुरक्षित आहेत का ?


   आपण सारेच एकविसाव्या शतकात आहोत. या काळात महिला आणि त्यांचे प्रश्न हे पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहेत, महिला सबल झाल्या आहेत असे वारंवार सांगण्यात येते. परंतु महिला आजही पूर्वी इतक्याच सुरक्षित अथवा असुरक्षित आहेत का याचा विचार करता We 4 Change ने एक सर्वेक्षण करायचे ठरवले. दोन गटात सर्वेक्षण करताना वय वर्ष १८ ते २५ आणि वय वर्ष २५ ते वरच्या वयातील महिलांचा अभ्यास करण्याचा निर्धार केला. हा निर्धार प्रामाणिकपणे महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची सद्यस्थितीच नव्हे तर मनःस्थिती समजून घेण्यासाठी होता.

वय वर्ष १८ वर्षापासून ६० वर्षाच्या वयोगटातील ६०५ महिलांनी फॉर्म भरले. याचाच अर्थ १९६० च्या दशकाच्या आसपास जन्मलेल्या महिलेपासून ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या म्हणजे साधारण २००५ पर्यंत जन्मलेल्या पिढीने पण स्त्री म्हणून आपले अनुभव नोंदवले आहे. म्हणजे या अभ्यासात नवयुवती, तरुणी, मध्यमवयीन महिला ते आता वृद्ध महिला (सिनियर सिटीझन) या कक्षेत मोडणाऱ्या स्त्री वर्गाने सहभाग नोंदविला आहे

या सर्वेक्षणात प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणाऱ्या मुली व स्त्रिया यांचा अभ्यास करण्यात आला. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून फॉर्म भरले गेले. सोलापूर, कोल्हापूर, गोंदिया, अहमदनगर, ठाणे, गडचिरोली, नाशिक, पुणे, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, मुंबई, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, पनवेल, अकोला यासह मध्यप्रदेश, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, अंदमान अशा विविध राज्यातून एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलिया, स्वीडन अशा देशातूनही अनेकींनी आपले मत नोंदवणारे सर्वेक्षण पत्रक भरले. परंतु असा दस्तावेज जमा करताना फॉर्म भरणाऱ्या महिला अथवा मुलीचे मूळ हे महाराष्ट्रात असले पाहिजे असा भौगोलिक निबंध अभ्यासकांनी घातला होता.

या संपूर्ण प्रक्रियेत कुठल्याही महिला / मुलीला स्वतःचे नाव, पत्ता, ओळख सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे या महिला अधिक मोकळेपणाने हा फॉर्म भरू शकतील असा अंदाज होता. याबाबत काही निरीक्षणे पुढच्या भागात येतीलच, परंतु घडून गेलेल्या घटनेबाबत किया छेडछाड, अपमान, धमकी, बलात्कार अशा कुठल्याही प्रकारे स्वतःवर झालेल्या अन्यायाबद्दल आजही मोकळेपणाने समाजात बोलण्याची मानसिकता अद्याप महिलांची नाही. खरेतर अन्याय करणारा व्यक्ती हा स्वतः दोषी आहे, अशी सत्यपरिस्थिती असताना महिला मात्र झालेल्या कृत्याकरिता किंवा घटनेकरिता स्वतःलाच जबाबदार मानतात. ही जबाबदारी अथवा त्यांचे जो आयुष्यभर मनावर घेऊन कुढत राहतात.

याशिवाय काही जणींनी असे अनुभव येऊनही ते फॉर्ममध्ये लिहिण्याचे टाळले. साधारणतः तीस ते ३५% महिलांनी आम्ही असे अनुभव घेतलेच नाही असे उत्तर फॉर्म मध्ये लिहिले असले तरीसुद्धा काही उपप्रश्न आहेत, ज्यात त्यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छेडछाडीचा पुसटसा उल्लेख केला आहे. याचे विवेचन आम्ही प्रश्नाच्या अनुषंगाने पुढे केले आहेच. पण या मानसिकतेला दोष देण्याचे म्हणून टाळले यामागे समाजाचे दडपण आणि असे अनुभव व्यक्त न करण्याचे संस्कार कारणीभूत आहेत, है समजून घेतले.

या फॉर्मचा दुसरा भाग महिलांना कायदयाची माहिती आहे का यावर होता. या अभ्यासाच्या निष्कर्षातून समाजात कायदे, प्रशासन आणि सुव्यवस्था याबाबत मोठ्‌या प्रमाणात अज्ञान असल्याचे लक्षात आले. कायदा बनतो, योजनाही येतात पण ज्यांच्यासाठी त्या बनल्या आहेत, त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. कारण त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्याचा पूर्णार्थाने प्रचार-प्रसार, जनजागरण करायला हवे हे या अभ्यासाच्या अनुषंगाने लक्षात आले आणि यातून महिला अत्याचार प्रतिबंधाबद्दल बोलणारा आणि त्यांच्या स्वजाणिवा विकसित करणारा असा हा अत्यंत महत्वाचा अभ्यास ठरेल, हे जाणविले.

कायदा-सुव्यवस्था याबाबत जाणीव जागृती करण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थाचीही आहे. त्यासाठी त्यांनी अधिक कार्य केले पाहिजे हे लक्षात आले. या दस्तावेजाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा म्हणून WE 4 CHANGE या संस्थेने पुढाकार घेवून बदलाचे वारकरी होण्याकरिता पाऊल उचलले आहे.

 सहसंवेदना सर्वेक्षण माहिती संकलन व निष्कर्ष......या अभ्यासातून खालीलप्रमाणे निष्कर्ष निदर्शनास आले.

प्रश्न क्र. 5- आपण आपल्या जीवनात एक मुलगी म्हणून अपमान / अन्याय अनुभवला आहे का?) स्त्री म्हणून असुरक्षितता ही नव्या काळातील महिलांना अधिक वाटते. हे प्रमाण 12.1 टक्के पासून वाढून विद्यार्थी गटात 20.1 टक्के झाले आहे.

प्रश्न क्र. 6. पुरुषाद्वारे झालेला नकोसा स्पर्श (बँड टच) पहिल्यांदा वयाच्या कोणत्या वर्षी प्रथम अनुभवला?)

60 टक्के मुलींना दंडचा सामना कधी ना कधी करावा लागला आहे ही एक चिंताजनक बाब आहे.

प्रश्न क्रमांक 7. आपणास नकोसा स्पर्श करणाऱ्या व्यक्तीचा वयोगट काय असावा?)

67.5 टक्के महिलांनी विविध वयोगटातील पुरुषांकडून नकोसा स्पर्श अनुभवला आहे.

प्रश्न क्र. 8- आपण अनुभवलेला नकोसा स्पर्श (बैंड टच) कुणाकडून होता?)

सार्वजनिक स्थळी मुली सगळ्यात जास्त असुरक्षित असल्याचे सर्वत्र लक्षात येते. 

प्रश्न क्र. 9. नकोसा स्पर्श / छेडखानी अनुभवल्यावर आपल्या मनात कोणत्या भावना उत्पन्न झाल्या.)

छेडखानी अनुभवल्यानंतर मनात अस्वस्थता असण्याचे प्रमाण विद्यार्थी गटात कमी झाले असले तरी अबोल होणे व कुणाशी बोलावेसे न वाटणे ही भावनिक स्थिती वाढते. 

प्रश्न क्र.10- पुरुषाकडून नकोसा स्पर्श आपण आजवर कितीदा अनुभवला?)

नकोसा स्पर्शाचा अनुभव 25 वर्षापर्यंतच्या 57.2 टक्के विदयार्थिनीना अशा अनुभवाना सामोरे जावे लागले आहे ही चिंतेची बाब आहे. ज्येष्ठ वयोगटातील महिला ज्यांची संख्या 67.5 टक्के आहे अशांनी नकोसा स्पर्श अनुभवला आहे.

प्रश्न क्र.11- तुम्हाला नकोसा स्पर्श (अँड टच) करणाऱ्या व्यक्तीचा हेतू काम असावा?)

अपमान, बदला घेणे यातून झालेला नकोसा स्पर्श नव्या पिढीत अनुक्रमे 8 टक्के वाढल्याचे लक्षात आले. '' 

प्रश्न क्र.12- आपण खालील पैकी कोणत्या अत्याचाराचा सामना केला आहे?)

बलात्काराचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. केवळ वयाच्या 25 व्या वर्षापर्यंतच मुलींनी विविध प्रकारचे अत्याचार अनुभवले आहेत.

प्रश्न क्र.13- तुम्हाला कुठे सुरक्षित वाटत नाही?) 

रस्त्याने एका कामाच्या ठिकाणी व सहीत दोन्ही पिठी समान पातळीवर सर्वात जास्त असुरक्षित दोन्ही पिढी स्वतःला असुरक्षित समजतात 

प्रश्न क्र. 14- तुमची छेडखानी झाली / कुणी नकोसा स्पर्श किंवा शोषण केले तर तुम्ही तुमच्या भावना कुणाला मोकळेपणाने मन मोकळे करण्यास महिलांनाही जागा आहे कारण समजून घ्या तरुणी तर 10.5 टक्के महिला आपले कुणासोबत नाही.

क्र. 15-असुरक्षित वाटल्यामुळे तुम्हाला कधी एखादया ठिकाणी जाणे बंद करावेसे वाटले का?)  

बंद करावेसे वाटले पण करू शकले नाही या बाबीत नव्या पिढीत वाढ झाली आहे हे आश्चर्यकारक आहे. कदाचित असुरक्षित वाटण्याच्या ठिकाणी नाईलाजाने मुलीना जावे लागत आहे.

प्रश्न क्र. 16- तुम्ही अनुभवलेल्या अत्याचार / शोषण वा छेडखानीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर झाला का?) 25.5 टक्कै महिला अनुभवलेल्या अत्याचार/ शोषण वा छेडखानीचा परिणाम जीवनावर परिणाम झाला असे म्हणतात. त्याच्यासाठी पिअर ग्रुप तयार करून ही बोच कमी करण्याची गरज आहे. त्यांना आधार देणे, त्या अनुभवातून बाहेर काढणे, त्याबाबत संवाद साधणे याबाबी पण महत्वाच्या आहेत असे जाणविले 

प्रश्न क्र. 17- आजही आपण समाजात मुलींना अत्याचार/ शोषण यांचा सामना करताना पाहता का?) 

25 वर्षापुढील वयोगटासाठीच हा प्रश्न विचारला होता. 20 टक्के महिलांनी असे अत्याचार होताना दिसत नाहीत असे म्हटले असले तरी 79.7 टक्के महिला असे अत्याचार होत असताना पाहत आहे, त्यांना ते जाणवत सुद्धा आहे. साधारण 80 टक्के महिला मुलींना अत्याचार शोषणाचा सामना करावा लागतो हे मान्य करतात.

प्रश्न क्र. 18- जेव्हा आपण अन्य मुलींना अत्याचार/ शोषण वा छेडखानीचा सामना करताना बघता तेव्हा काय भूमिका घेता?) 

7.9 टक्के महिला संकटग्रस्त मुलींना पाहत तर असतील पण त्याविरोधात कोणतीही पावले उचलत नाहीत.

 प्रश्न क्र. 19. स्त्रीचे आयुष्यबंधनकारक/ त्रासदायक आहे व आपण पुरुष म्हणून जन्मास यायला हवे होते असे तुम्हाला कधी वाटले का?)

वय वर्षे 18 ते 25 वयोगटात स्त्रीचे आयुष्यबंधनकारक / त्रासदायक आहे व आपण पुरुष म्हणून जन्मास यायला हवे होते असे वाटण्याचे प्रमाण नव्या पिढीत 11 टक्क्यांनी वाढले आहे. याचे कारण शोधू जाता नव्या पिढीच्या मनात प्रचंड वैचारिक संघर्ष असावा असे वाटते,

प्रश्न क्र. 20- आपण सार्वजनिक शौचालय वापरता का?)

शौचालयाची गरज असताना सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नसणे ही एक मोठी समस्या आहे, नैसर्गिक गरजेच्या वेळी मलमूत्र विसर्जन न केल्यामुळे अनेक रोग उद्भवतात. तरुण पिढीला सुद्धा या समस्येचे शिकार व्हावे लागते आहे हे अतिशय चिंताजनक आहे. 

प्रश्न क्र. 21. कोणत्या कारणाने आपणास सार्वजनिक शौचालय वापरायची इच्छा होत नाही?)

सार्वजनिक शौचालय वापरण्यास लाज वाटते. तेथे स्वच्छता नसते, सुरक्षित वाटत नाही वापरायचे असते पण उपलब्ध नाही अशा अनेक कारणांनी महिला व तरुणी सार्वजनिक शौचालय वापरीत नाहीत असे लक्षात येते. * 

प्रश्न क्र. 22- कुणी मागे लागल्यास / अश्लील मेसेजेस पाठवल्यास मुलगी किंवा स्त्री कायद्याचा आधार घेऊ शकते तो कायदा कोणता?)

फक्त 22 टक्के मुलींनी 354 ही कलम माहिती असल्याचे सांगितले, म्हणजेच 78 टक्के मुलींना या कलमाबद्दल काहीच माहिती नाही. या कलमाबद्दल अज्ञान या प्रश्नाद्वारे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे त्याबद्दल जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्न क्र. 23- बलात्कारासाठी खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जातो?) 

बलात्कारासाठी कोणते कलम आहे याची माहिती नव्या व जुन्या ! पिढीत 58.7 टक्के व 58.8 टक्के महिलांना नाही दोन्ही वयोगटास महिलांबाबत कायद्याबद्दलचे अज्ञान अधोरेखित होते. 

प्रश्न क्र. 24- 498-अ हा कलम कशासाठी आहे?)

कौटुंबिक हिंसाचाराचा सामना महिला सतत करत असतात गंभीर स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचार लग्नानंतर सुरुवातीचे काही वर्ष जास्त प्रमाणात होतो हे लक्षात घेऊन हा कायदा बनवण्यात आला आहे. पण जवळपास 60 टक्के महिलांमध्ये या कायद्याबद्दलचे अज्ञान आहे: Elaborate?

प्रश्न क्र. 25- अल्पवयीन मुर्तीसाठी कोणता कायदा अस्तित्वात आहे

 पोक्सो कायदा फक्त 27.3 टक्के तरुणीना माहिती आहे तर फक्त 36.4 टक्के महिलांना हा कायदा माहिती आहे. बालकांचे शोषण थांबवायचे असेल तर पोक्सो या कायद्याची माहिती सगळ्यांना असणे अत्यंत गरजेचे आहे. “

प्रश्न क्र.26- स्वतःवर अन्याय झाला म्हणून तुम्ही कधी पोलिसात तक्रार नोंदवली आहे का)

स्वतःवर अन्याय झाला म्हणून तुम्ही कधी पोलिसात तक्रार नोंदवली आहे का या उत्तरात तक्रार नोंदविली नाही चे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ वयोगटात ही आकडेवारी 47.2 टक्के होती तर नव्या पिढीत 87.2 टक्के म्हणजे जवळपास दुपटीने वाढली आहे. 

प्रश्न क्र. 27- पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवायला भीती वाटते का?)

पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवायला भीती वाटते का, याचे उत्तर विद्यार्थी गटात 30.3 टक्के तर महिला गटात 32.8 टक्के वर्गाला आजही पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवायला भीती वाटते. दोन पिढ्यांचे अंतर पाहता यात म्हणावा तसा फरक आढळत नाही. " 

प्रश्न क्र. 28- तुम्ही मिरची स्प्रे वापरला आहे का?)

94 टक्के मुली व 97.7 टक्के महिला मिरची स्प्रेचा वापर करीत नाहीत असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे ही, गंभीर बाब आहे. एकदा मिरची स्प्रे चा वापर केला तर आजूबाजूच्या अनेक व्यक्ती काही काळासाठी इतके दुबळे होतात की ते कोणावर हल्ला करू शकत नाही. मिरची स्प्रेचा इफेक्ट अर्धा तास ????तरी असतो, मिरची स्प्रेचा वापर करून मुलगी धोक्याच्या ठिकाणाहून पळून जाऊ शकतात. मिरची स्प्रे तिला सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी देतो. मिरची स्प्रे फार महाग नाही आणि तो घरी सुद्धा बनवता येतो. या. अत्यंत महत्त्वाच्या मिरची स्पेबद्दल मुलींना माहिती नाही.

प्रश्न क्र. 29. स्त्री म्हणून तुम्ही अनेक गोष्टी करू शकत नाही आणि सुरक्षित नाही हे तुम्हाला कोण सारख सांगत?) 

18 ते 25 या वयोगटातील 16.8 टक्के मुली असे सांगतात की स्त्री म्हणून त्या अनेक गोष्टी करू शकत नाही आणि सुरक्षित नाही, असं त्यांना कोणीही कधी सांगितलं नाही. याचाच अर्थ असा की, 83.2 टक्के मुलींना कोणीतरी सतत सांगत असतं की, त्या स्त्री म्हणून अनेक गोष्टी करू शकत नाही आणि सुरक्षित नाही. कुटुंन (34.8 टक्के) समाज (62.2 टक्के), शिक्षण पद्धती दुवारे 10.8. टक्के मुलींना सांगितले जाते की, त्या स्त्री म्हणून अक्षम आणि असुरक्षित आहेत. हे प्रमाण लक्षणीय आहे.


ही अशी अनेक तथ्य संकलने या अभ्यासात पुढे आली आहेत. मुळातून सोबत दिलेला अभ्यास वाचल्यास अशा अनेक महत्वाच्या बाब निदर्शनास आल्या आहेत. ज्यातून समाजाचे खरे चित्र उभे राहते. या अभ्यासाचा अधिकाधिक उपयोग समाजाला व्हावा, या करीता वुई 4 चेंज कटीबद्ध आहे. 


  • अधिक माहिती करीता आपण खालील ठिकाणी संपर्क साधू शकता.
  •  प्रा. डॉ. रश्मी पारस्कर- सोवनी.
  • समन्वयक, दुई 4 चेंज
  • संपर्क +91 95187 13660, 9552229292 
  • पत्ता - 67, जास्वंद, कलोडे कॉलेजसमोर, ऑकार नगर, नागपूर 440027 
  • इमेल - wetchange20@gmail.com वेबसाईट - https://www.we4change.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com