कुसुमाग्रज जन्मदिन तथा मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल ट्रस्टच्याच्या वतीने 'मराठी विचारधारा प्रतिष्ठान' पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती 'मराठी सुविचार आणि म्हणी' या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी, कलाशिक्षक, चित्रकार, हौशी चित्रकार या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. पहिल्या क्रमांकाला सन्मानचिन्हासह रोख इतर तिघांना रोख पारितोषिक तर इतरांना सहभाग प्रमाणपत्र २६ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मराठी भाषा दिवस कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी आहे. स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे ९८२१५७४८९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, ऍड देवदत्त लाड यांनी केले आहे.
कुसुमाग्रज जन्मदिन तथा मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मराठी सुविचार आणि म्हणी या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द रेखाटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
-: या स्पर्धेचे नियम :-
(१) कला व कलेची आवड असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, कलाशिक्षक, चित्रकार, हौशी चित्रकार या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
(२) स्पर्धा विनामूल्य आहे
(३) चित्राचा आकार A3 असावा आणि हे चित्र जलरंग, पोस्टर कलर, कलर पेन्सिल, ऑईल कलर, आक्रेलीक कलर अशा कोणत्याही माध्यमातून करू शकता. यासाठी आपण कार्ड बोर्ड पेपर वापरू शकता.
(४) चित्र ही केवळ स्वतःची निर्मिती असावी. नक्कल वा चौर्यकर्म नसावे अशी अपेक्षा, तसे आढळल्यास तो स्पर्धक स्पर्धेतून आपोआप बाद होतो. याबाबत कुठल्याही तक्रारीचा विचार केला जाणार नाही.
(५) एका स्पर्धकास केवळ एक चित्र पाठविता येईल. चित्रावर संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर लिहावा लागेल.
(६) परिक्षक समितीचा निर्णय अंतिम राहील, याबाबत कोणाचीही तक्रार वा हरकत ग्राह्य धरली जाणार नाही.
(७) या सर्व कलाकृतींवर स्पर्धा आयोजक संस्था मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच हा स्वामित्व अधिकार राहील. सर्व कलाकृती ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनांच्या रुपात मांडणार आहोत.
(८) स्पर्धेचा निकाल संपर्क मोबाईलवर आणि महाराष्ट्रातील वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल.
(९) चित्र टपाल अथवा क्युरिअर्सने पाठविण्याचा पत्ता -
- रमेश भिकाजी सांगळे
- २४३/१२, अमीर हाऊस, ॲक्सिस बँक लॕमिंग्टन रोड शाखेच्या बाजूला.
- डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग, ग्रँट रोड (पूर्व), मुंबई - ४०० ००७
- भ्रमणध्वनी ९८२१५७४८९१
चित्र अगोदर या क्रमांकावर व्हाट्सएप करावे
0 टिप्पण्या