Top Post Ad

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकरणी अँट्रासिटी कलमासह नोटीस ईशु


 अखेर महाराष्ट्र शासनाचे पर्यटन कँबीनेट मंत्री,.मंगल प्रभात लोढासह अनेक IAS अधिकारी, मंत्रालयातील सचिवासह, विभागीय आयुक्त नागपूर सह,जिल्हाधिकारी नागपूर सह,अनेक अधिकारी व गरुड कंपनी व त्यांचे चालक, मालकावर विरुद्ध अँट्रासिटीचा कलमासह नोटीस ईशु झाली. माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय वरोरा यांनी विनोद खोब्रागडे यानी दाखल केलेल्या फौजदारी खटला क्रंमाक 3/2023 मध्ये  दिनांक 13/2/2023 ला नोटीस ईशु केले आहे. 

आरोपींना उतर सादर करण्यासाठी दिनांक 9/3/2023 पुढील तारीख देण्यात आली आहे, एक दबंग तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा यांनीच दाखल केली फौजदारी पीटीशन, कालच केस नंबर 3/2023 नुसार खटला रजिस्टर झाला,  सुनावणी झाली, तात्काळ नोटीस ईशु झाले. यामुळे  शासन, प्रशासनात प्रचंड खडबळ उडाली आहे. मात्र याबाबत नागपुरातील सुज्ञ मंडळी मागील एक महीन्यापासुन धरणे आंदोलन करीत आहे, समाजाकडून पैसे जमा करण्याचा उपद्व्याप करीत आहेत. मोर्चे काढून या प्रकरणात आरोपी असलेले शासन, प्रशासन, यांच्याकडेच न्याय मागत आहेत, न्याय व हक्क झगडुन न्यायालयातुन घ्यावे लागतात हे माहिती असूनही ही मंडळी वेळकाढू भूमिका करीत आहेत. मागितल्याने भीक मिळते, न्याय व हक्क मिळत नाही हा ईतिहास आहे,  

 महाराष्ट्र शासनच पक्षपात व भेदभाव करीत असल्याचे दिसून येत आहे. एका बाजुने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावुन पाडले जाते तर त्याच जागेत दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंद यांचे भव्य दिव्य स्मारक बनवण्याचा मनसुबा रचला जात आहे.  हा पक्षपात, भेदभाव, शासन करत आहे. न्याय व हक्काच्या या प्रकरणात तेच आरोपी असलेले शासन, प्रशासन न्याय कसा देणार. इथले शासन प्रशासन व्यवस्था या षडयंत्रात सामिल आहे आणि त्यांचेच काही कार्यकर्ते  आंदोलने करीत आहेत.  मागील 28 दिवसापासून नागपूर आंबाझरी येथे महिला वर्गाचे धरणे आंदोलन  मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण शासन लक्ष देत नाही आहे, कारण शासन, प्रशासन, फक्त न्यायालयाच्या फौजदारी कारवाईलाच भिते, म्हणून तात्काळ न्यायालयात फौजदारी खटले दाखल करावे.असे आव्हान तलाठी विनोद खोब्रागडे यांनी समस्त आंबेडकरी समाजाला केले आहे. 

 मौजा आंबाझरी -नागपूर येथील सर्वे नंबर 1 एकुण क्षेत्र  350 एकर सरकारी जमीनी पैकी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 20 एकरातील स्मारक,बुलडोझर लावून बेकायदेशीर पाडल्यामुळे,विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश वरोरा येथे फौजदारी खटला दाखल.दिनांक 13/2/2023 ला सुनावणी झाली आहे.व नोटीसही ईशु झाले.पुढील सुनावणी 9/3/2023 आहे. वरोरा येथील जबाबदार व जागृत नागरिक विनोद खोब्रागडे यानीच दाखल केला फौजदारी खटला.आरोपी 1) मे. गरुडा कंपनी अँम्युझमेंट पार्क आंबाझरी तर्फे प्रविनकुमार ब्रिजेशकुमार अग्रवाल, विजय काशीनाथ शिंदे,  प्रविण रतनलाल जैन,श्री.नरेंद्र पुरुषोत्तम जिचकर 2) श्री.मंगल प्रभात लोढा, पर्यटन मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई. 3) वालसा नायर सिंग,सचिव मंत्रालय मुंबई, 4) विजयलक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर, 5) अजय अण्णासाहेब गुल्हाने उप आयुक्त महानगरपालिका नागपूर, 6) रवींद्र ठाकरे तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर, 7) शेखर घडगे उपविभागीय अधिकारी नागपूर, शहर  8) सुर्यकांत पाटील तहसीलदार नागपूर शहर 9) आंनदराव देठे मंडळ अधिकारी नागपूर शहर, 10) उज्वल भोयर तलाठी आंबाझरी, अशी आरोपींची नावे आहेत.  विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांचा न्यायालयात CRPC कलम 156(3) नुसार कलम 190 नुसार अन्वेषण करन्याचे आदेश पोलिसांना देण्याकरिता फौजदारी पीटीशन दाखल करण्यात आली होती. 

मात्र न्यायाधीश महोदय आरोपी बघून हतबल झाले आणि दोन वेळा सुनावणी घेऊन, नंतर सात दिवसात आदेश पारीत केले,  मला अधिकार नाही, विषेश न्यायालयात जाण्याचे आदेश  7/2/2023 ला पारीत केले. लगेच प्रमाणित प्रती घेऊन, 9/2/2023 ला फौजदारी खटला दाखल करण्यात आला, मात्र न्यायाधीश सुट्टीवर होते, म्हणून दिनांक 13/2/2023 ला सुनावणी झाली व नोटीस ईशु झाले. आपणही आपल्या तालुक्यात अशा बाबींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, सर्व तालुक्यात, जिल्यात वरील आरोपी विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे मागील दोन महिन्यापासून मी सोशल मीडीया द्वारे करत होतो,व करत आहे. आंबेडकरी वकील मंडळी व जागृत समाज बांधवानी हा विषय एकत्र  येऊन, न्याय व  हक्क  न्यायानेच मिळू शकते, 

ज्याअर्थी याच आंबाझरी सर्वे नंबर 1 या 350 सरकारी नंबर मध्ये उजव्या बाजुचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 50-60 वर्षाचे दोन मजली स्मारक बुलडोझर लावून शासनाने व गरुड कंपनीने पाडले आहे.आणि डाव्या बाजुने स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक शासन,प्रशासनाने बांधलेले आहे, त्यासाठी मागील 26 दिवसापासून नागपूर येथे आंबेडकर महीला मंडळ स्मारक बचाव धरणे आंदोलन करीत आहे, त्यांना क्रांतिकारी जयभीम, भारतीय राज्य घटनेची मुल्ये जपा, अंमलबजावणी करा, अपशय कधीच येत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांनी त्याकाळी good 10,20,30 चा फार्मुला दिला होता, आज हजारो, डॉक्टर, वकील, इंजीनियर भारतात आहेत, जेव्हा नागपूर -अंबाझरी येथील सरकारी जागेतील 20 एकर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक महसूल प्रशासन, शासन,व गरुड कंपनीने कटकारस्थान व संगनमत करून, पक्षपात व भेदभाव केले आहे. 10,20,30,अपेक्षित असलेले आज हजारो वकील मंडळी, डॉक्टर, इंजीनियर व अनेक वरिष्ठ अधिकारी, जागृतपणे चुपचाप या घटनेकडे पाहात आहेत. 

जल,जंगल,जमीन,ही राष्ट्रीय संम्पती आहे,आणि ते वाचविने देशातील प्रत्येक नागरिक यांचे अधिकार व कर्तव्य आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 51क पहा, त्यामुळे आंबाझरी येथील सरकारी 350 एकर जमीन,ज्यामध्ये 20 एकरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक होते, ते बेकायदेशीर पाडून, शासन, प्रशासन, खाजगी गरुड कंपनी, यांनी मौक्यावर तलाव असतानांही आज 7/12 वर बगीचा दाखवून हडप करीत आहे. याबाबत फौजदारी खटले दाखल करत नाही, म्हणूनच हे भ्रष्टाचारी लोक अन्याय, अत्याचार करतात ,आपण लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रात बघितले आहे, पण उपयोग झाला नाही, न्याय व हक्क न्यायालयातुनच मिळतो, म्हणून तात्काळ उच्च न्यायालयात, फौजदारी पीटीशन, रिठ पीटीशन, जनहित याचिका दाखल करून या प्रकरणात स्टे मिळवून घ्यावे. 

आम्ही भारतीय लोक समाजहीतासाठी, देशहीतासाठी, राष्ट्रनिर्माणसाठी, जागृत होऊन काम करणे गरजेचे आहे, आंबाझरी नंतर आता भीमाकोरेगाव प्रकरणात फौजदारी खटले दाखल करणार आहे. याबाबत सर्व समाज बांधवांनी जागृत होऊन या प्रकरणी किंवा अशी प्रकरणे कुठल्या गाव-खेड्यात, शहरात होत असतील तर सर्व प्रथम फौजदारी खटले दाखल करावेत असे आवाहन आज याद्वारे करीत आहे. 

जबाबदार व जागृत नागरिक,भारतीय संविधानाचे अभ्यासक,

दबंग तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर,महाराष्ट्र राज्य,

मो.9850382426 .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com