Top Post Ad

अदानीच्या मागे कोणती शक्ती ठामपणे उभी आहे

 संसदेत गौतम अदानी प्रकरणावर नरेंद्र मोदींना चर्चा नको आहे. परंतु देशाला समजलं पाहिजे की, अदानीच्या मागे कोणती शक्ती ठामपणे उभी आहे. आम्ही दोन-तीन वर्षांपासून अदानीचा मुद्दा उपस्थित करत आहेत, परंतु सरकारने त्यांचं काही ऐकलं नाही. संसदेत अदानी मुद्द्यावर चर्चा होऊ नये यासाठी हे सरकार जोरदार प्रयत्न करत आहे असा आरोप करीत काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी  थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. 

मी या सरकारबद्दल सातत्याने बोलत आहे. संसदेत अदानी मुद्द्यावर चर्चा होईल याची या सरकारला भीती आहे. परंतु सरकारने यावर चर्चा होऊ दिली पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे की, सरकार यावर चर्चा का होऊ देत नाहीये. मी गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करत आहे. हे सरकार चर्चेपासून दूर का पळतंय असा सवालही यावेळी राहूल गांधी यांनी उपस्थित केला. 

दरम्यान RBIने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ला दिलेल्या कर्जाबाबत सर्व बँकांकडून माहिती मागवली आहे. हे वृत्त देणाऱ्या रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितले की, RBIच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, नावे न घेता ही माहिती देण्यात आली आहे. 

 गौतम अदानी प्रकरणावरून काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक होऊ लागले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, सपा, द्रमुक, जनता दल आणि डाव्यांसह तेरा विरोधी पक्षांनी अदानी समूहावरील हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमधून झालेल्या आरोपांवर बैठक घेतली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात ही बैठक झाली. यापैकी 9 पक्षांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.  . “अदानी-मोदी में यारी है, पैसे की लूट जारी है”, “एलआईसी बचाओ”  “नहीं चलेगी और बेईमानी, बस करो मोदी-अदानी” अशा घोषणां देत.अदानी प्रकरणावर सरकारने उत्तर द्यावं यासाठी  संसदेच्या परिसरात निषेध नोंदवण्यात आला.  युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज देशभर आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकांच्या कष्टाचा पैसा वाया जात आहे. लोकांचा बँक आणि एलआयसीवरील विश्वास उडेल. काही कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून देशात घडणाऱ्या घटनांवर सभागृहात आवाज उठवायचा आहे, असा निर्णय सर्व पक्षांच्या नेत्यांनी मिळून घेतला आहे, म्हणून आम्ही नोटीस दिली होती. आम्हाला या नोटीसवर चर्चा हवी होती, पण आम्ही जेव्हा जेव्हा नोटीस देतो, तेव्हा ती फेटाळली जाते.

 पूर्णपणे सबस्क्राइब्ड झालेला FPO रद्द केल्यानंतर गुरुवारी समूहाचे शेअर्स 10% पर्यंत घसरताना दिसत आहेत. बुधवारी रात्री उशिरा अदानी समूहाने 20 हजार कोटी रुपयांचा पूर्ण सबस्क्राइब झालेला FPO रद्द केला होता. गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील, असे कंपनीने सांगितले होते. याआधी बुधवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 26.70% घसरून 2179.75 वर बंद झाले. यामुळेच अदानी समूहाने FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने बुधवारी रात्री उशीरा 20 हजार कोटींचा पूर्णपणे सबस्क्राईब्ड एफपीओ रद्द केला आहे. गुंतवणुकदारांचा पैसा परत केला जाईल. या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू एक रुपया आहे.


 पठाण आणि BBC नंतर जागतिक श्रीमंत अदानीची कथा.... 

आतापर्यंत. ७ पब्लिक लिस्टेड कंपन्या आणि ५७८ सबसिडीरीज मिळून अदानीची मार्केट व्हॅल्यू अंदाजे २००बिलीयन डॉलर्स होती.  १६ जानेवारी २०२३ ला साब या स्वीडिश कंपनीने फायटर विमाने बनवण्याचा २०१७ मध्ये अदानी सोबत केलेला करार तोडला.  २६ जानेवारीला हिंडेनबर्गने अदानीची पोलखोल करत ८८ प्रश्न विचारले. मात्र सेबी, आरबीआय, सरकार, ईडी, किरीट.......वगैरे सगळे चूप. 

अदानीने रिपोर्टवर टिका केली आणि कोर्टात खेचण्याची धमकी दिली. मागे धान्य साठवण्याचे गोडावून प्रसिद्ध केल्याप्रकरणी पत्रकाराला न्यायालयात खेचले होते. त्याचप्रमाणे आताही न्यायालयाची धमकी देण्यात आली मात्र  हिंडेनबर्गने चॅलेंज स्वीकारले व म्हटले कि अमेरिकन कोर्टात जरूर या.... अजून प्रश्न विचारू आणि कागदपत्र मागू. मात्र तोपर्यंत शेअर बाजारात अदानीच्या शेअर्स ची पडझड सुरु झाली. इतकेच नाही तर जगातील 'सर्वात श्रीमंत' यादीमध्ये देखील घसरण सुरू. झाली  तरीही सेबी, आरबीआय, सरकार, ईडी, किरीट.......वगैरे अजूनही चूप.  

अदानी च्या मूळच्या भारतीय पण ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेतलेल्या CFO ने भारतीय झेंड्याच्या बाजूला उभे राहून हा भारतावर हल्ला आहे असे म्हटले. अदानी शेअर्स ना जालियनवाला बाग अशी उपमा दिली गेली. मात्र इथे  मीडिया चॅनेल मधली गुंतवणूक कामी आली. मीडिया अदानीची बाजू मांडू लागली. पेपरात फुल पेज जाहिराती येऊ लागल्या. शेठजींचे उजवे हात अडचणीत म्हटल्यावर आयटी सेल आणि अंधभक्त सुद्धा कामाला लागले. मेसेजेसची ढकलाढकली सुरु झाली. 

यावर हिंडेनबर्ग ने उत्तर दिले कि राष्ट्रभक्तीच्या आडून झोल करणे हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच.  अदानीच्या भावाचे परदेशी नागरिकत्व, अदानी चे चँग चुंग लिंग या चिनी नागरिकाबरोबरचे संबंध (जे नाव याआधी ऑगस्ता वेस्टलँड प्रकरणात समोरआले होते ) यावर प्रश्न विचारले जाऊ लागले.  तरीपण लोकांच्या नाकावर टिच्चून FPO यशस्वी करून दाखवण्याची वार्ता अंधभक्तांसकट सगळेच करू लागले.  क्रेडिट स्विस या स्विस इन्व्हेस्टमेंट कंपनीने अदानी च्या बॉण्ड्स ना कर्जासाठी तारण म्हणून घेण्यास नकार दिला.  शेअर बाजारात आणि सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पडझड चालूच राहिली. तरीही  सेबी, आरबीआय, सरकार, ईडी, किरीट.......वगैरे अजूनही चूप.

 रिटेल इन्वेस्टर्स, कंपनी स्टाफ ने पाठ फिरवून देखील FPO पूर्ण सबस्क्राईब झाला.  आयटीसेल व अंधभक्तांचे चेकाळलेले मेसेज फिरू लागले.  हिंदुराष्ट्रातील आदर्श व्यावसायिकाच्या प्रगतीसाठी गुंतवणूक करणारी अबुधाबी या मुस्लिम राष्ट्रातील कंपनी हे समोर आले तरी त्याचे दुःख बाजूला ठेवले गेले.  भारतातील काही संस्थांनी बाजारात अतिशय कमी किमतीत उपलब्ध असलेला माल, चढ्या दराने विकत घेऊन कोणाला व का मदत केली हे प्रश्न उपस्थित झाले.  सिटीग्रुप्स ने सुद्धा अदानी सिक्युरिटी तारण ठेवून कर्ज देणे स्थगित केले.  अदानीच्या हस्तकांनीच FPO यशस्वी करण्यासाठी भलत्याच मार्गाने गुंतवणूक केली असल्याचे आरोप होऊन तथ्य समोर येऊ लागले.  FPO पूर्ण विक्री झाली परंतु त्याची व इतर शेअर्स ची पडझड सुरूच राहिली.  

संघराज्य सरकारचे बजेट मांडले गेले.... त्यात नवीन एअरपोर्ट, रेल्वेत गुंतवणूक अशा अदानी खुश होऊ शकेल अशा बातम्या होत्या पण तरीही, शेअर बाजारात आणि सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी ची घसरण सुरु राहिली. एल आय सी ने पहिल्यांदा तोटा बघितला. अदानी ने FPO मागे घेऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत देणार अशी घोषणा केली. भारतातील शेअर्स पाठोपाठ, आंतरराष्ट्रीय बाजारात अदानी चे बॉण्ड्स आपटायला लागले. अदानी, आयटीसेल, अंधभक्त व मीडिया त्याला विवेकबुद्धी , मास्टरस्ट्रोक वगैरे सिद्ध करण्यासाठी एकत्र आले. 

 ऑस्ट्रेलिया सुद्धा हिंडेनबर्ग रिपोर्ट ची तपासणी करणार असे म्हणाले. बांगलादेश अदानी पॉवर कडून वीज खरेदीच्या कंत्राटाचा फेरविचार / नवीन करार...करायला हवा म्हणतोय.  अदानी ची व्हॅल्यू १०० बिलीयन डॉलर्स ने कमी झाली. तरीही सेबी, आरबीआय, सरकार, ईडी, किरीट.......वगैरे नीलबटे सन्नाटा.

हे आतापर्यंत. 
आता  टिच्चून अदानी पुन्हा उभा राहील, श्रीमंतीमध्ये पहिल्या नंबरवर जाईल..... काहीही होऊ शकते. 
ज्या प्रजेला क्रोनी कॅपिटलिजम मध्ये देखील राष्ट्रवाद दिसतो...... त्या अडाणिस्तानात काहीही होऊ शकते. 
आपण ते बघण्याबरोबर ..... बोलायचं, लिहायचं!
(टाइमलाईनमध्ये काही राहिलं असेल तर कमेंट मध्ये ऍड करा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com