साऱ्या विश्वावर आपल्या आवाजाची किमया आजतागायत पसरवलेल्या भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर ह्यांना त्यांच्या पहिल्या स्मृति दिनाच्या दिवशी सूर सुदान शौर्या स्वर संस्थेच्या ७० हून अधिक गायक व गायिका सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते रात्रौ १० वाजेपर्यंत सलग १२ तास लतादीदींनी गायलेली सर्व भाषेतील गाणी निवडून १११ हून अधिक गाणी गाऊन मानवंदना देण्यात येईल. ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्राहलय, पहिला मजला, मार्केट रोड, ठाणे पश्चिम येथे होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य ठेवण्यात आला आहे त्याचा लाभ सर्व लतादीदींच्या चाहत्यांनी घ्यावा अशी विनंती व माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी ह्यांनी दिली.
----------------------------------------
लता दीदी संपूर्ण विश्वाची गाणं सम्राज्ञी.
स्वर्गीय लता मंगेशकर यांनी गाण्याच्या ताकदीवर संपूर्ण विश्वाला जिंकले व भारताची मान उंचावली.वयाच्या 5 व्या वर्षांपासून गाणे गाण्याला सुरूवात केली व 13 व्या वर्षी लता दीदीने पहिले गाणे गाइले होते.दु:खाची बातमी म्हणजे लतादीदींच्या वयाच्या 13 व्या वर्षी वडिलांचे निधन झाले या संपूर्ण दु:खात राहुन त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही व गाणं सम्राज्ञी बनली आणि त्यांच्या गाण्याने विश्वाचे संपूर्ण रेकॉर्ड तोडले.लता दीदीने आपल्या कारकीर्दीत तब्बल 30 हजार गाणे गाइले तेही 36 वेगवेगळ्या भाषांमध्ये.त्यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून जनजागृती, समाजहित, मनोरंजनात्मक, संस्कृतीक, देशहित,भावनीक, देशभक्ती,धार्मिक अशा अनेक मिश्रणाने 30 हजार गाणे गाइले त्यामुळेच त्यांना आपण गाणं सम्राज्ञी म्हणतो.
1962 मध्ये चीन सोबत युद्ध संपल्यानंतर काही दिवसांतच 26 जानेवारी आली.26 जानेवारी 1963 ला "हे मेरे वतन के लोगो" या गाण्याने संपूर्ण भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आले व संपूर्ण भारत देशाला एकसुत्रीत ठेवण्यासाठी मोलाची भूमिका लता दीदीने बजावली. यावरून आपण समजू शकतो की त्यांच्या गाण्यात व आवाजात मोठी ताकद व दैवी शक्ती होती.त्याचप्रमाणे त्या साक्षात सरस्वतीचे रूप सुध्दा होत्या.परंतु 6 फेब्रुवारी 2022 ला 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.हा दिवस फिल्म जगत,कला, साहित्य,संगीतजगत व सर्वांसाठी दु:खद ठरला व जनुकाय संगीत दुनियाचा अंत झाला की काय असे वाटले.लता दिदी कुटुंबात मोठी होती व संपूर्ण जीवन संघर्षमय रहाले.परंतु त्यांच्या गाण्याने संपूर्ण विश्व जिंकून गाणं सम्राज्ञी झाली. संघर्षमय जिवनात संगीताच्या फुलांनी नेहमीच त्यांचे स्वागत केले.
आपण गाण्यातील चमकता तारा गमविला आहे.जोपर्यंत सुर्य-चंद्र, आकाश-पाताळ आहे तोपर्यंत त्यांचे नाव अमर राहील.आवाजाचे दुसरे नावच लता दीदी आहे.लता दीदींच्या गाण्यानेच फिल्म जगत शिखरावर पोहोचले.लता दीदींची संगीताची व गाण्याची प्रेरणा अनेक युगापर्यंत जीवीत राहिल
लेखक- रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर
0 टिप्पण्या