Top Post Ad

जग में बुद्ध का नाम है... यही भारत की शान है


  अडीच हजार वर्षांनंतर भारतात आलेल्या भगवान  बुद्धांच्या अस्थींचे दर्शन घेण्याचा योग तमाम भारतीयांना येत आहे. बुद्ध अस्थिसह  परभणी ते चैत्यभूमी (मुंबई) या धम्म पदयात्रेचे महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.  जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है,,, असा सूर या  धम्मयात्रेतून येऊ लागला आहे. भारतातील बौद्ध उपासक-उपासिकांच्या मार्फत होणारे स्वागत पाहून  भिक्खूसंघ भारावून गेला असल्याचे मत अनेक भिक्खूंनी व्यक्त केले.  थायलंड इथला सुमारे ११० भिक्खूंचा संघ तसेच त्यासोबत भारतातील भिक्खू संघ आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन १७ जानेवारीला परभणी इथून निघालेली ही अस्थिकलश, धम्मपदयात्रा धम्मराजिक बुद्धविहार कासणे वाशिंद या ठिकाणी दाखल होताच प्रचंड संख्येने तीचे स्वागत करण्यात आले.  

सुमारे ७च्या दरम्यान बुद्धविहारात  बुद्धांच्या अस्थी कलशाचे  आगमन होताच दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. हजारो उपासक उपासिका मनोभावे दर्शन घेऊन बुद्ध चरणी लिन झाले.   'बुद्धम् सरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि, संघम शरणम् गच्छामिच्या घोषाने वातावरण मंगलमय झाले. उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत सकाळपासून अस्थीकलश आणि पदयात्रेचे दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. जागतिक धर्मगुरू भंते तेप्रिवय यधिष्ठी, भंते लॉंगफुजी, भंते सोंगसेक फॅन्टफियन यांच्यासह त्यांच्या ११० भिक्खूंचा संघाचे मनोभावे स्वागत धम्मराजिक बुद्धविहार कमिटीचे प्रमुख भदन्त विनयबोधि महाथेरो यांनी केले. तसेच या वेळी अनेक उपासक-उपासिकांनी आपआपल्या परीने धम्मदान केले

या धम्म पदयात्रेचा समारोप मुंबई चैत्यभूमी येथे १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई-ठाण्यात कसारा मार्गे तीचे आगमन झाले असून दिनांक ९ फेब्रुवारी रोजी  कसारा. मातोश्री लॉन जवळ वाशाळा बाय पास. कसारा, या ठिकाणी थांबेल त्यानंतर  दि.१० फेब्रुवारी  आटगांव - गुरुनानक धाबा  जवळ हायवे,  दि.११ फेब्रुवारी रोजी वाशिंद - धम्म राजीक महाविहार. विपसना सेंटर कासणे. वाशिंद. वेळ  सायं. ४ वाजता. दि १२ फेब्रुवारी  एवई. पेट्रोल पंप हायवे. भिवंडी. दि. १३ फेब्रुवारी  माणकोली - नाका एम. आय. डी. सी. भिवंडी. दि १४ फेब्रुवारी  मुलुंड - टोल नाका. या ठिकाणी थांबणार आहे.  

मुंबईत  दिनांक १४/२/२०२३ रोजी मुलुंड चेक नाका १० वाजता मुलुंड सिंग्नल सकाळी १०.३० वाजता, विक्रोळी  दुपारी  १२ वाजता,  माता रमाई कॉलनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा दर्शन दुपारी ४.वाजता,  सार्वजनिक बुद्ध विहार डी .बी .पवार स्कुल मैदान, माता रमाई आंबेडकर नगर, घाटकोपर पुर्व मुंबई येथे मुक्काम. १५ फेब्रुवारी सकाळी ८ मार्गक्रमण,  सकाळी ९  वाजता कामराज नगर .अमर महाल,  सकाळी १०  सिद्धार्थ कॉलनी आणि श्रमजिवी नगर,  दुपारी ११ वाजता  सुमन नगर  सायन,  १२. वाजता  माटुंगा,  १२.३० दादर सर्कल,  १  वाजता चैत्यभुमी दादर येथे मोठ्या उत्साहात समाप्ती.

मुंबई ठाणे जिल्ह्यातील उपासक उपासिकांनी आपआपल्या परीने या बुद्धअस्थीचे दर्शन घेऊन या धम्म पदयात्रेत अधिकाधिक संंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भदन्त विनयबोधी महाथेरो 9860219910 यांनी केले आहे. 


ठाणे शहरात येणा-या धम्मपद यात्रेच्या स्वागत आणि दर्शनाविषयी नियोजन सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड बुद्ध विहार येथील सभागॄहात घेण्यात आली.ठाणे शहरातील बहुसंख्य अनुयायी या सभेस उपस्थीत होते.या सभेत खालील ठराव सहमत करण्यात आले.

१) माजीवडा फ्लाय ओव्हर या निश्चित स्थळी स्वागतासाठी सर्वांनी जमावे.
२) फुलांच्या वर्षाव करण्यात यावा.
३) पंचशीलेचे झेंडे वापरण्यात यावेत.
४) शक्यतो पांढरे शूभ्र वस्त्र परीधान करावे.
५) धम्मयात्रेच्या प्रचार प्रसारासाठी बॅनर,पोस्टर,डीजीटल,सोशल मिडीयाव्दारे जास्तीत जास्त ग्रूप वर व लोकांना पोस्ट शेअर कराव्यात.
६) ठाणे समता सैनीक दलाने शिस्त पालनासाठी लोकांना मार्गदर्शन करावे.
७) आपआपल्या वस्त्यां विभागांमधे धम्मपद यात्रेत विषयी लोकांना जनजाग्रुत करावे.फळे लीहीण्यात यावेत.
८)‌ धम्मपद यात्रेत पायी चालावे.गाड्या पार्क करून ठेवाव्यात.
९) आपआपल्या विभागातून माजीवडे चौकात रॅली आणावी.
१०) कामकाजास सुट्टी देऊन सर्वांनी धम्मपद यात्रेत सहभागी व्हावे.स्वागत ते चेक नाका येथ पर्यत पायी चालावे.
११) कोणता पक्ष,संघटना,गट हा विषय डोक्यात ठेऊ नये.धम्म पावीत्र्य, धम्म नीष्ठा,धम्म एकतेचे भान ठेवावे.

        


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com