ही त्यांना झालेली उपरती आहे की यामागे आणखी काही डाव आहे?


 सध्या बिहार, उत्तर प्रदेशातील ओबीसी राजकीय नेत्यांनी तुलसीदासाच्या रामचरित मानस वरुन जे मुद्दे उपस्थित केले त्यामुळे ब्राम्हण निर्मित ग्रंथांची एकप्रकारे पोलखोल सुरू झाली आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी  "रामचरित मानस, मनुस्मृती आणि बंच ऑफ थाॅट्स" या पुस्तकांवर बंदी घालावी अशी भूमिका घेतली. रामचरितमानस मधील 'शूद्र, पशू, नारी ये सब ताडन के अधिकारी' या अपमानास्पद वरुन आणि तशा प्रकारची अनेक विधाने त्यात आहेत. अशा अपमानकारक विधानांना धर्म समजावे का की त्यांचा निशेध करावा हे प्रश्न उपस्थित केले व त्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. बहुजनाना अधम, नीच समजले जाते आणि आजही तशी वागणूक दिली जाते याचीही उदाहरणे दिली गेली. यामुळे त्या तथाकथित धार्मिक पुस्तकांचा विरोध होत आहे.

उत्तर प्रदेशमधले समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यांनीही त्यात उडी घेतली. आणि ते त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या, साधु म्हणवणाऱ्यांनी त्यांना मारण्यासाठी लाखो रुपयांच्या सुपाऱ्या जाहीर केल्या. साधुंचा हा आतंकवाद. आणि त्याचा कुण्याही हिंदुत्ववाद्यांनी साधा निशेधही केला नाही. याचा अर्थ तथाकथित धर्म पुस्तकात असलेले अपमानही धर्म समजा असा. परंतु चंद्रशेखर आणि मौर्य यांच्या बाजूने सुद्धा खूप लोक उभे होताना दिसत आहेत. ठिकठिकाणी रामचरित मानसचे दहन करत आहेत आणि त्यात ओबीसी, दलित सहभाग घेताना दिसत आहेत. त्यामुळे उत्तर भारतात सामाजिक बाबतीत एक नवे वातावरण तयार होत आहे आणि याचे महत्त्व राजकारणापेक्षाही खूप जास्त आहे. कारण ही भूमिका ब्राम्हण विरुद्ध बहुजन, ओबीसी, दलित,आदिवासी अशी आहे. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे या प्रकाराला मुस्लिमांनी देखील पाठिंबा दिला आहे. म्हणजे अपमानकारक हिंदुत्व प्रकाराला एक प्रकारचे अलग पाडणे आहे, थप्पड आहे.

 मागील निवडणुकीत अखिलेश यादव यांनी ब्राम्हण सन्मान कार्यक्रम घेतले होते आणि मायावतींनी सुद्धा अशी समेलनेआयोजित केली होती. म्हणजे दलित ओबीसी ब्राम्हणांना किती महत्त्व देत होते? आम्हाला याचा अचंबा वाटत होता. पण आता तेच अखिलेश यादव जेव्हा, हमे संघ, भाजप के लोग शूद्र कहते है, अशी भाशा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेतला हा बदल वेगळा आहे स्वाभिमानी आहे हे लक्षात येते. म्हणजे एक प्रकारे तामिळनाडूचे वारे तिथे वाहू लागले की काय असे वाटते.हे सर्व तिथेच थांबत नाही तर हा बदल ब्राह्मणांवर उलटेल की काय या भीतीने रा.स्व. संघाच्या मोहन भागवतांना त्याची मिरची झोंबली आणि त्यांनी वक्तव्य केले की जाती निर्माण करणारे, अशा प्रकारे अपमान करणारे पंडित होत. आणि त्यामुळे हा वाद आणखी चिघळत आहे. 

• मग जाती कोणी केल्या?  देव की ब्राम्हण•?  काही जाती उच्च, पवित्र तर काही शूद्र, अधम, नीच याचे निर्माता कोण?  म्हणजे दोश कुणाचा हे प्रश्न रामचरित मानस प्रकरणा नंतर उठायला लागले आहेत आणि ते दोशारोपण आपल्यावर येणार याची भनक ब्राम्हणांना लागली आहे. आणि म्हणूनच ते अनेक प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. खरं म्हणजे जे जात व्यवस्थेसाठी जबाबदार आहेत आणि ज्या लोकांना जात विरोधकांनी व समता समर्थकांनी धारेवर धरले ते सातत्याने फक्त एकाच जातीचे लोक आहेत आणि ते म्हणजे ब्राम्हण. मोहन भागवतांनी आडवळणाने का होईना हा गुन्हा पंडितांचा अर्थात, ब्राम्हणांचा आहे हे सांगितले. आणि हे मनुस्मृती समर्थक संघटनांचा प्रमुख म्हणत आहे.

पण याच संघटनेचे माजी प्रमुख मा. स. गोळवलकर यांनी मात्र वेगळी मांडणी केली आहे. त्यांच्या सर्व लिखाणात त्यांनी ब्राम्हणांना दोशी धरले नाही तर वेद, मनुस्मृती आदींचा आधार घेऊन वर्ण व जाती ब्रम्होत्पत्पन्न आहेत म्हणजे ब्रह्माने निर्माण केल्या असे म्हटले आहे. खरं म्हणजे या संदर्भात खुद्द ब्राह्मणात एकवाक्यता नाही. १९६९ साली एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, 'जाती ईश्वराने निर्माण केल्यात.' गोळवलकर यांची ती मुलाखत १ जानेवारी १९६९ ला मुंबईच्या नवा काळ या दैनिकात प्रसिध्द झालती. तीत गोळवलकर म्हणतात, "वर्ण - जाती ईश्वराने निर्माण केल्या. म्हणून मानवाने कितीही प्रयत्न केले तरी ती ईश्वर निर्मित योजना आहे ती पुन्हा प्रस्थापित होणारच."

आणि आज मोहन भागवत म्हणतात जाती पंडितांनी अर्थात ब्राम्हणांनी निर्माण केल्या. म्हणजे एक प्रकारे गोळवलकरांच्या उलट भूमिका घेतात. हे आणखी एक 'रिडल' आहे.  डॉ. आंबेडकरांनी 'रिडल्स इन हिंदुइझम' या पुस्तकात हिंदुत्ववाद्यांचे असे उलटपुलट  भूमिका असणारे रिडल्स उघड केले आहेत. त्यांनी त्या पुस्तकात हे दाखवून दिले की ब्राह्मण आपल्या स्वार्थासाठी आपल्याच भूमिका बदलत असतात आणि म्हणून त्यांचा धर्म सनातन नाही तर स्वार्थ सनातन आहे असे ठरते.   खरं म्हणजे संघाला मोठे करण्यासाठी भागवतांच्या तुलनेत गोळवलकरांचे काम खूप जास्त आहे हे भागवतही जाणतात. आणि तरीही गोळवलकरांच्या उलट मांडणी का करतात? ही त्यांना झालेली उपरती आहे की यामागे आणखी काही डाव आहे? आणि यात कोण खरं बोलत असेल गोळवलकर की भागवत? 

 जाती कुणीही तयार करो. पण मग त्या भारतातच का आहेत? देवाने केल्या असत्या तर त्या सर्व देशांत असायला हव्या होत्या. कारण देव सर्व देशातले लोक मानतात.  ब्राम्हण फक्त भारतातच आहे. हे कारण तर नाही?

  -वर्ण जात निर्मार्ते- ऋग्वेदात म्हटले आहे की ब्रह्माने आपल्या तोंडातून ब्राह्मण, भुजातून क्षत्रिय, मांड्यातून वैश्य आणि पायातून शूद्राला जन्म दिला. गीतेमधे कृष्णाच्या तोंडी घातले आहे, चातुर्वर्ण्य मया सृष्टम्.  म्हणजे मी, कृष्णाने चातुर्वर्ण्य निर्माण केले. आश्चर्य म्हणजे वाल्मिकी रामायणात रामाने असे कधीही म्हटले नाही मी जात,चातुर्वर्ण्य निर्माण केले. उलट रामाला ब्राह्मण पूजक म्हटले आहे. (ब्राह्मण प्रतिपूजक:). म्हणजे कृष्णाला देव ठरवले आणि रामाला...?  • ब्राह्मण देवाचे निर्माण कर्ते?  असेही एका स्मृतीत म्हटले आहे की, ब्राम्हण मंत्र तयार करतात आणि ईश्वर मंत्राधीन, मंत्रांच्या अधीन असतो म्हणजे ईश्वर ब्राम्हण जातीच्या नियंत्रणात असतो. 

• मनुस्मृती काय म्हणते? 
- ब्रम्हाची निर्मिती ब्राम्हणा पासून झाली (मनु. ११.८३). 
-  यानुसार ब्राह्मण देव, ईश्वर निर्माते ठरतात.
- ब्राम्हण हे देवाचे देव होत. (मनु. ११.२३४). 
• जातीचेही निर्माते तेच. 
ब्राम्हण चातुर्वर्ण्यानुसार सर्वात वरचे होत. (मनु.१०.२)
- ब्राम्हण क्षत्रियांचे उत्पन्नकर्ते होत.(मनु.९.३१९) 
- ब्राम्हण वैश्य आणि शूद्र यांचे मालक होत. (मनु.९.३२६) 

- यावरून ब्राह्मण देव आणि जात यांचे निर्माते ठरतात. पंडित दीनदयाल उपाध्याय हे संघ विचारक आणखी पुढे जाऊन म्हणतात, 'God descends in human body to destroy Adharma and re-establish Dharma,not to act on passing whims and fancies. Hence even God can do everything but cannot act contrary to Dharma. ...One can say, Dharma is even greater than God. (Hindu Nationalism-Christophe Jaffrelot, Pub. Permanent Black, Delhi-110092, 2007). 

- अर्थात, उपाध्याय  देवाला दुय्यम ठरवतात आणि धर्माला श्रेष्ठ ठरवतात. आणि धर्माचे निर्माते अर्थातच ब्राम्हण म्हणजे देव ब्राम्हणांच्या हुकुमात.

हा जो गोंधळ आहे तो कुणी निर्माण केला? त्यातून हे दिसते की ब्राह्मण देवालाही आपल्या खाली समजतात. त्यांच्या तथाकथित धर्म ग्रंथाचीही ते उलटापालट करतात. ते खरंच देव मानतात की देव प्रकाराचा उपयोग आपल्या वर्चस्वासाठी, स्वार्थ साधण्यासाठी करतात? यातून हेही दिसते की ते जर देवाचे निर्माते आहेत तर त्यांना देवाची भिती वाटणे, देव पावणे हे प्रकारच राहत नाही. देव त्यांच्या हातचे खेळणे ठरते. याचा अर्थ ते नास्तिकता जपतात असाही होतो.

त्यांचे हे वेळोवेळी बदलणारे स्वार्थी डाव.

- नागेश चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1