Top Post Ad

शिंदे गटातील आमदाराला मंत्रीपद मिळू नये म्हणून भाजपाचीच रणनिती


 महाराष्ट्र राज्य खनी कर्म महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी  पदाचा गैरवापर करीत गौण खनिज वाळू घोटाळा प्रकरणात करोड़ो  रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप  भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे  यांनी केला आहे. आज मुंबईत पत्रकारभवन येथे माध्यमांशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल हे महाराष्ट्रातील सत्तांतरात एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले.  येणाऱ्या काळात आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी ते धडपडत आहेत. मात्र त्यांच्यावर होत असलेल्या आरोपामुळे त्यांना मंत्रीपदापासून दूर फेकले जात असल्याची चर्चा आता नागपूरात रंगली आहे. . मागील काळात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर ३०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता, या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली असताना चौकशीस सुरुवात झाली होती, परंतु, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती चौकशी बंद केल्याचा आरोप यावेळी डॉ. ठाकरे यांनी केला. तर आता भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी त्यांच्यावर मातीमिश्रित वाळूच्या व्यवहारात घोटाळ्याचा आरोप केला आहे.

आमदार जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी मातीमिश्रित वाळूच्या व्यवहारात १५० कोटींचा घोटाळा केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी डॉ. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आमदार जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आ. जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

आमदार जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे. खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल १५० कोटींचा गैरव्यवहार जयस्वाल यांनी केला आहे. खनिज विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेचा दुरुपयोग केला आहे. खिंडसी ते वैनगंगा वाहत असलेल्या सूर नदीतील रेती उपसता यावी, यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरांसाठी मातीमिश्रित वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली होती. 

मॅक्सवर्थ कंपनीशी साटेलोटे करून जयस्वाल यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या नावावर कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकल्या आहेत. ५० पेक्षा जास्त कंपन्या आमदार जयस्वाल यांनी नातेवाइकांच्या नावावर स्थापन केल्या आहेत. लोहकरे हत्याकांड आणि साठवणे हत्याकांडाचेही धागेदोरे त्यांच्यापर्यंत जाऊ पोहोचत असल्याचा आरोप डॉ. ठाकरे यांनी केला. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जयस्वाल यांच्या मर्जीतील लोकांनी धान खरेदी केंद्र उघडून राज्यातील नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांकडून आयात केलेले धान खरेदी केले. त्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार जयस्वाल यांनी केला. एका शेतकऱ्यांचे धानविक्रीचे १४ लाख ५२ हजार रुपये जयस्वाल यांनी हडपले असून अजूनही शेतकऱ्याला पैसे देण्यात आलेले नाहीत. आमदार आशिष जयस्वाल यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केला आहे. त्यांनी कोट्यवधींची जमीन विकत घेतली आहे. त्यांनी नातेवाइकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांची ईडी चौकशी करण्यात यावी. तसेच सीबीआयनेही आमदार जयस्वाल यांची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. राजेश ठाकरे यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकार द्वारा वैनगंगा नदी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे खनीकर्म महामंडळाला शासकीय प्रकल्पास वाळू उपलब्ध करून देण्याकरिता या नदीवरील चार घाट आरक्षित करण्यात आलेले होते चंद्रपूर जिल्हयातील व ब्रह्मपुरी तालुक्यातील खालील प्रमाणे अरहर- नवरगाव, बोडदा चिचगाव आणि हळदा या नावाने वैनगंगा नदीवरचे चार घाट खणीकर्म महामंडळा ला शासकीय प्रकल्पास तसेच शासकीय योजनेअंतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामांना वाळू पुरवण्याकरिता दिलेले होते.

शासकीय प्रकल्पाचे नाव पुढे करून अवैधरित्या थेट नदीमधून वाळू उत्खनन करून खाजगी बांधकामाच्या ठिकाणी करोड़ो रुपयांची वाळू परस्पर विकण्यात आली. नियमानुसार वाळू उत्खनन स्थानिक मजुराच्या माध्यमातून करायचे असते आणि नदीतून स्टॉक यार्ड पर्यंत ट्रॅक्टर द्वारे ट्रान्सपोर्टिंग करायची असते परंतु या ठिकाणी सर्व नियम कायदा बाजूला ठेवत थेट नदीमधून ट्रक द्वारे पोकलेन द्वारे हजारों ट्रक वाढू बाहेर विकण्यात आले  या संदर्भातील एक पुरावा म्हणजेच नागपूर जिल्हयातील भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत खणीकर्म महामंडळाच्या रेती वाहतूक करीत असणारा ट्रक व ट्रक चालक यांच्यावर झालेली कारवाई तसेच थेट नदी मधून पोकलेन द्वारे रेती उत्खनन करीत असतानाचे विविध वृत्तपत्रात फोटो सहित वृत्त प्रकाशित झाले आहेत. तसेच अनेक संशयास्पद कागदपत्रे द्वारे झालेला व्यवहारही उघडकीस आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली..

प्राप्त दस्तावेजानुसार खलीकर्म महामंडळाद्वारे रेती उत्खनन प्रक्रिया रेतीसाठा प्रक्रिया आणि विक्री प्रक्रिया या तीनही प्रक्रिया संपूर्णपणे संशयास्पद आहेत. उत्खननाची सुरुवात कागदपत्रानुसार 16 जून 2019 आहे. परंतु प्रत्यक्षात उत्खनन एक महिने आधीच सुरु केला गेला तो सुद्धा थेट नदीतून वाळू विक्रीच्या परस्पर मोठा व्यवहार झालेला आहे.. गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूरयांना एमडीओ मायनिंग डेव्हलपमेंट ऑपरेटर म्हणून नेमण्यात आले त्यांच्याकडे मायनिंग ट्रान्सपोर्ट स्टॉकिंग आणि लोडिंग अशा चार जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या परंतु दस्तावेज नुसार त्यांनी केलेल्या कामकाज आणि सादर केलेला बिला मधील मेजरमेंट याच्यामध्ये तफावत आहे म्हणजेच गुप्ता कन्स्ट्रक्शन ला कुठल्या आधारावर खनिक्रमा महामंडळाद्वारे जास्त पेमेंट करण्यात आला. टैंडर प्रक्रिया संशयास्पद असून ऑनलाइन झाले की ऑफलाइन झाले आणि केव्हा झाले या संदर्भात माहिती दिसून येत नाही. 

प्रत्यक्षात केलेला साठा व विक्री केलेला साठा या दोघांच्याही मोजमापांमध्ये तफावत दिसून येत आहे.  जेवढी वाळू साठा रेकॉर्डवर दाखवण्यात आला किंवा विक्री द्वारे दाखवण्यात आला त्यापेक्षा शेकडो पट बाहेर खुलेआम विक्री करण्यात आला. या ठिकाणी चंद्रपूर जिल्हाधिकारी खनि कर्म विभागा चे निरीक्षण अधिकारी यांची सुद्धा भूमिका दिसत आहे.  . महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळाच्या वतीने विक्रेता लायसन्स ऑथॉरिटी म्हणून एका खाजगी व्यक्तीची असिस्टंट सुप्रिटेंडन्ट म्हणून एका अधिकाऱ्याची तात्पुरती नेमणूक करण्यात आली व खणीकर्म महामंडळाच्या वतीने त्यांचे नाव समोर करून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर खनिज विभाग याद्वारे विक्रेता लायसन्स मिळवण्यात आला त्या कर्मचारी लगेच काही दिवसातच सुट्टीवर गेल्यानंतर त्यांच्या नावाच्या सहया कोणी मारल्या रॉयल्टी कोणी प्रोडूस केल्या या संदर्भात संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे अर्थातच खनिक्रम महामंडळाच्या कामकाज पूर्ण भ्रष्टाचारात मलिन झालेला आहे.

सर्व घाटावरील इन्व्हाईस डिटेल्स रिपोर्ट द्वारे असे निदर्शनास येत आहे की एकच ट्रॅक्टरचा गाडी नंबर एकाच वेळेस वेगवेगळ्या घाटावर आढळून येत आहे तसेच एकाच घाटावर सुद्धा एकच गाडी एकाच वेळेस वेगवेगळ्या इन्व्हाईस नंबर वर दाखवण्यात आलेले आहे त्याचा हा ऑनलाइन रिपोर्ट आहे यात शंभर टक्के भ्रष्टाचार झाल्याचं निदर्शनास येतं असे प्रत्येक घाटावर शेकडो एन्ट्रीज भ्रष्टाचार दाखवणारे आहेत.. तेव्हा उत्खनन पहिले सुरुवात करण्यात आले व एग्रीमेंट बँक गॅरंटी स्टॅम्प पेपर वरची तारीख सर्व दोन महिने उशिराचे आहेत. बरेच दस्तावेज स्टॉकयर्ड संदर्भातीलशेतकऱ्याच्या एग्रीमेंट बनावट असून स्टॉकर्ड वर वाळू कधीच साठवण्यात आला नाही कारण सरळ नदी मधून पोकलेन द्वारे ट्रक मध्ये लोड करून सरळ खाजगी प्रकल्पा खुलेआम देण्यात येत होतं 

वरील सर्व उत्खनन व्यवहाराची व झालेल्या अनियमित आर्थिक व्यवहाराची सुद्धा निष्पक्षपणे उच्चस्तरीय चौकशी व्हावी सबब चौकशी करिता केंद्र सरकारच्या एजन्सीकडे सदर प्रकरण दयावे अशा प्रकारची मागणी  डॉ राजेश ठाकरे यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com