Top Post Ad

कोकणी माणसाच्या उत्कर्षासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार- प्रविण दरेकर


  •  ठाण्याच्या मालवणी महोत्सवात 'कोकण' अवतरले
  • रविवारी अस्सल मालवणी सामिष मेजवानीचा आनंद लुटा
  • कोकणी माणसाच्या उत्कर्षासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार
  • भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन


कोकणात मच्छी असो, फलोत्पादन, टुरिझम असो यावर मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभे राहायला पाहिजेत. या सगळ्या व्यवसायासाठी जी आर्थिक मदत लागेल ती मुंबई जिल्हा बँकेचे नेतृत्व करत असताना आपण कोकणवासियांसाठी करू याचा पुनरुच्चारही दरेकर यांनी केला. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिन महाराष्ट्र येथे मोठ्या प्रमाणात प्रकल्प, उद्योगधंदे उभे राहताहेत. परंतु आमचा प्रामाणिक असणारा कोकणी माणूस अजूनही उद्योग धंद्यामध्ये ज्या पद्धतीने भरारी घ्यायला पाहिजे ती घेत नाही. परंतु आता शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही कोकणातील सर्व आमदार येणाऱ्या काळात कोकणी माणसाच्या उत्कर्षासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करू व कोकणच्या विकासात मुंबई-ठाण्याचे मोठे योगदान देऊ, असा विश्वासही भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार आणि मुंबई जिल्हा बँक अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

कोकण ग्राम विकास मंडळ, ठाणेतर्फे 'मालवणी महोत्सव २०२३' चे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या या महोत्सवाचे  उदघाटन  प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, संदीप लेले, आयोजक सीताराम राणे, विकास पाटील, सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 आपल्या भाषणात दरेकर पुढे म्हणाले,  कोकणातील आम्ही सर्व आमदार कोकणी माणसाच्या उत्कर्षासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू,  मुंबई आणि ठाण्याला कोकणच्या मालासाठी एक कायमस्वरूपी बाजारपेठेची आवश्यकता आहे. कायमस्वरूपी अशा प्रकारचा महोत्सव गरजेचा आहे. हा विचार शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे करू  आपल्या गावाकडील लोकांचे स्टॉल, आपली माणसं भेटणार व एक आपुलकी, जिव्हाळ्यापोटी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. सलग २३ वर्ष सातत्याने सीताराम राणे हा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करत आहेत. २३ वर्ष अशा प्रकारचा उत्सव करणे यासाठी कोकणच्या विषयी, मातीविषयी आत्मीयता असावी लागते, असे महोत्सव ठिकठिकाणी झाले पाहिजेत. या महोत्सवाच्या निमित्ताने गावाकडील छोट्या व्यावसायिकाला बाजारपेठ मिळते. तसेच आर्थिकही चांगल्या प्रकारची मदत या उत्सवाच्या निमित्ताने होत असते. परंतु मुंबई, ठाण्यातील कोकणी माणसाने ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या हातात सरकार दिले. त्यांनी कधीही कोकणी माणसाचा विचार केला नाही. सातत्याने २५ ते ३० वर्ष मुंबई महापालिका, ठाणे महापालिकेत सत्ता उपभोगली. मात्र कोकणच्या तरुणाच्या, तरुणीच्या, व्यावसायिकाच्या हाताला काम देऊ शकले नाहीत आणि आता मुंबईच्या, कंत्राटदाराच्या गोष्टी करताहेत. 

  कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने पोखरण रोड नं.१, शिवाई नगर उन्नती गार्डनमध्ये शुक्रवार १३ जानेवारी पासून मालवणी महोत्सवाला सुरूवात झाली. हा महोत्सव २२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्र शासनाचे सुक्ष्म,मध्यम लघुउद्योग मंत्रालय तसेच, रेड एफ एम रेडीओ हे मालवणी महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत. 
  कोकणचा निसर्ग, तेथील संस्कृती,लज्जतदार खाद्यपदार्थ, कोकणी संगीत, तेथील कला... असे सारे काही, अनुभवयाचे असेल तर ठाण्यातील शिवाईनगर येथे आयोजित मालवणी महोत्सवात या.अशी कोकणी साद आयोजक सीताराम राणे यांनी ठाणेकरांना घातली आहे.


 या महोत्सवात कोकण संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थाची विक्री करणारे महिला बचत गटाचे स्टॉल, तसेच खास मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे, चिकन - वडे, सागुती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल आहेत. रविवारी १५ जानेवारी रोजी लेखक, संशोधक महात्मा सुरेजी राहेरकर यांचे "वारसा हिन्दु संस्कृतीचा व परंपरेचा " यावर व्याख्यान,१६ जानेवारी रोजी स्थानिक मुलांच्या नृत्यस्पर्धा, १७ जानेवारीला "संगीत स्वर मंदार” मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवारी १८ जाने.ला स्थानिक मुलांच्या नृत्यस्पर्धा, गुरुवारी १९ जाने.रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि दिनेश चव्हाण - रामकृष्ण परब यांच्यातील डबलबारी भजनाची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. २० आणि २१ जाने. रोजी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगणार असुन २२ जानेवारीला मालवणी महोत्सवाची सांगता होईल. पैठणी व नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे मालवणी महोत्सवातील ठाणे हौसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावी.अशी माहिती महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com