भीम के लगते जिगर! आधे इधर और आधे उधर

      मानवी जीवनाला विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारे माणुसकीचे जिने जगण्यासाठी एकूणच सर्व दालनांसमोर भक्कम अशी तटबंदी अर्थात मनु ने तिथे आमचा शिरकाव होऊ नये म्हणून केलेला तो कडेकोट बंदोबस्त होता. आमच्या नावाची मुंगी जाण्यालाही प्रवेश नाही कारण आम्ही गुलाम होतो ना! सूर्य चंद्र तारे आकाश आणि ही पृथ्वी त्यांनी सर्व बाजूंनी व्यापलेली अशा या भयानक अवस्थेत ज्यांना जगण्यासाठी अन्न नाही, ना वस्त्र,ना निवारा! वाटेल त्याने आमच्या माथ्यावर लाथ घालावी आणि आम्ही मात्र त्यांच्या चरणावर माथा टेकवावा?.कसा असेल तो दिवस? कशी असेल ती रात्र? व कसा असेल तो क्षण न क्षण अशा या निगर गट्ट काळाच्या घनघोर अंधारात जगायचे कसे आणि मरायचे तरी कसे? 

तेव्हा मानव देहातील एक महासुर्य गाव कुसा खाली उदयास येतो आणि सर्व मुर्दाड देहाच्या अस्पृश्य समूहातील मानवी तारांगणात स्वाभिमानी बाण्याचा असा प्राण फुंकतो इथून मग तेव्हा संघर्ष सुरू होतो महाडच्या चवदार तळ्याचा,काळाराम मंदिराचा,विषमतावादी समाजव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा,माणसाला माणुसकीने माणूस म्हणून जगू देण्यासाठीचे हे आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यासाठी आमच्या आदली पिढी किती संघर्षमय व कष्टकारक जीवन जगत असेल? याची वेळ असेल तर किंचित तरी कल्पना करून बघा! अशा या भयंकर विपरीत परिस्थितीत त्यांनी आमच्या आजच्या पिढीसाठी खरे आंबेडकरी अनुयायी म्हणून जो त्रास सोसला जी पीडा अनुभवली आणि तीळतीळ झिजून जी नवी समानता व स्वातंत्र्याची धम्म पहाट आमच्या हितासाठी व सुखासाठी आम्हास ती संविधानाच्या स्वरूपात बहाल केली असा तो आमच्या पूर्वजांनी आमच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही जतन करावा म्हणून आमच्या स्वाधीन केलेला दस्ताऐवज आहे. 

     हा संघर्षातुन आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी ठेवून दिलेला हा ठेवा आज संकटात असताना आम्ही काय करतोय? इथे आज कोणी अनैतिक मार्गाने मिळविल्या धनावर स्वतःला धनवान म्हणून मिरवतो तर कोणी भिकेत मिळालेल्या सत्तेमुळे स्वतःला भिकारचोट सत्ताधीश म्हणून मिरवतो तर कोणी कोणी प्रसिद्धीसाठी वाटेल त्या प्रकाशकाचे पाय चाटून स्वतःला मोठा करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे या ठिकाणी मला लहानपणात गड आला पण सिंह गेला या धड्यातील एक प्रसंग आठवते तानाजी मालुसरे हा लढवय्या धारातीर्थी पडलेला असताना शूरवीर म्हनविणारे मावळे जेव्हा सिंहगडावरून जीव वाचवण्यासाठी पळापळ करतात तेव्हा शेलार मामा त्यांना उद्देशून म्हणतो अरे! तुमचा बाप इथे मरून पडला असताना तुम्ही काय असे भागुबाई सारखे पळता! चला परत फिरा! मी गडावरला दोर कापून टाकला आहे! आता गडावरून उड्या टाकून मरा अथवा शत्रूशी झुंज देण्यासाठी दोन हात करा! 

अर्थात झुंज देऊन वीरमरण मरण्यातच खरा पुरुषार्थ असतो व तोच खरा योद्धा ठरतो आणि आज तीच आठवण ताजी करण्यासाठी मी असे म्हणेल आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान धोक्यात असताना आम्ही भीम के लगते जिगर! आधे इधर और आधे उधर ! या गाण्याच्या धरतीवर अर्ध्यांचा चाललेला हा पळपुटेपणा थांबवा? नाहीतर! असा हा निळ्या पाखरांचा बेईमान थवा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी होऊच शकत नाही! किंवा खरा वारसदार पण ठरू शकत नाही? तेव्हा आजच्या या परिस्थितीत मला म्हणावेसे वाटते की 2024 च्या लोकसभेत आपले लढाऊ प्रतिनिधी निवडून द्या! तरच संविधानाचे संरक्षण होईल अन्यथा मनुच्या अवलादीच्या लाथा परत खाण्यास सज्ज व्हा!  असे माझे हे आर्त उद्गार हे बेभान झालेले आमचे काही बांधव लक्षात घेतील एवढी आशा करतो आणि इथेच थांबतो

जय भीम जय भारत
जीवन बोदडे.9689268620,
भांबेरी,तालुका तेल्हारा,जिल्हा अकोला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1