Top Post Ad

त्यामुळे घोटाळेबाज अदानींची अवस्था ‘सहारा’च्या सुब्रत रॉयसारखी होईल


 केंद्रात आरएसएसप्रणित भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून मुकेश अंबांनी आणि गौतम अदानी यांचा उद्योग प्रचंड विस्तारत गेला.  यांच्या मालमत्तेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. आज गौतम अदानी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जात आहेत. मात्र या मागचे काळेबेरे आता  हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने शोधून काढले आहे.  आपला एक अहवाल प्रसिध्द करत अदानी उद्योगावर खोट्या आकड्यांचा आधार घेत किंमत वाढविल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.  

न्यूयॉर्कमधील संशोधन संस्था Hindevburg Research संस्थेने गौतम अदानींच्या कंपन्यांवर बुधवारी गंभीर आरोप केले. अदाणींच्या कंपन्यांकडून शेअर मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्यात येत असून गेल्या काही दशकांपासून त्यांच्याकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोप हिंडनबर्ककडून अदानींवर करण्यात आला आहे. या अहवालानंतर एकाच दिवसात अदानींना जागतिक श्रीमंतांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मागे टाकलं आहे. याआधी अदानी ११९ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या संपत्तीनिशी तिसऱ्या स्थानी होते. मात्र, १२० बिलियन डॉलर्स संपत्तीसह आता बेझोस तिसऱ्या स्थानी असून अदाणींची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत अदानींच्या संपत्तीमध्ये तब्बल ८१९ टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं जातं.

या अहवालानंतर एका दिवसात अदानी उद्योग समुहाचा बाजारातील भांडवलाचा आकडा ८० हजार ०७८ कोटींचा फटका बसून १८ लाख ३७ हजार ९७८ कोटींवर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २७ जानेवारी रोजी अदाणी उद्योग समूहाचे FPO बाजारात लाँच होत असतानाच हा अहवाल बाहेर आल्याने अदानी ग्रुपची मोठी अडचण झाली आहे. २७ जानेवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी अदाणी एंटरप्रायजेसकडून तब्बल २० हजार कोटींचे एफपीओ खुल्या बाजारात खरेदीसाठी लाँच करण्यात आले. हा भारतातील सर्वात मोठा FPO असल्याचा दावा केला गेला. मात्र, हिंडनबर्गने केलेल्या आरोपामुळे या एफपीओला प्रचंड  फटका बसला आहे.

हिंडेनबर्गकडून अहवाल जारी होताच अदानी ग्रीन एनर्जी : १८५५.४५ ५८.१० (-३.०४ टक्के), अदानी टोटल गॅस ३७४५ -१४०.४५ (-३.६१ टक्के), अदानी विल्मर ५४४.५० -२८.५० (-५.०० टक्के), अदानी ट्रान्समिशन २५३४.१० -२२२.१० (-८.०६ टक्के), अदानी पोर्ट्स ७१२.९० -४७.९५ (-६.३० टक्के), अदानी इंटरप्रायझेस ३३८९.९५ -५२.९० (-१.५४ टक्के), अदानी पॉवर २६१.१० -१३.७० (-४.९९ टक्के) अशा तऱ्हेने अदानी समुहाच्या शेअर किंमतीत घट झाली असल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व प्रकरणानंतर राजकीय चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी एसआयटीमार्फत करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे  घोटाळेबाज उद्योगपती अदानींची अवस्था ‘सहारा’च्या सुब्रत रॉयसारखी होईल. असेही ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध सर्व जगाला माहित आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये डुबण्याची भिती निर्माण झाली असून या गैरव्यवहाराची संपूर्ण चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी यांनी केली.

केंद्रात सत्तेवर येण्याआधीपासून उद्योपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचे संबंध जगजाहीर आहेत. केंद्रात सत्तेत आल्यानंतर या संबंधामुळे मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांवर विशेष मर्जी दाखवत स्टेट बँक इंडियाकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. देशातील सर्वात मोठी व सामान्य गुंतवणुकदारांची विमा कंपनी LIC मधील ७४ हजार कोटी रुपये अदानीच्या कंपनीत गुंतवले. अदानी हे जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहचले ते केवळ मोदी सरकारच्या आशिर्वादामुळेच. फायद्याच्या सरकारी कंपन्याही मोदी सरकारने अदानीच्या घशातच घातल्या आहेत. अदानी कंपनीत मोठे गौडबंगाल आहे हे उघड होताच या कंपन्यातील शेअर कोसळले व एसबीआय, एलआयसी सह सरकारी कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. अदानीचा फुगा आज फुटला आहे. सहारा कंपनीच्या सुब्रत रॉयचा सुद्धा असाच बोलबाला होता पण सहाराचा फुगा फुटला आणि सुब्रत रॉयला जेलची हवा खावी लागली. करोडो लोकांचे पैसेही बुडाले. अदानीची अवस्थाही सहाराच्या सुब्रत रॉय सारखीच होईल.

देशातील अत्यंत महत्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाची ओळख आहे. मुंबईचा हा विमानतळ अदानीच्या घशात घालण्यासाठी मोदी सरकारने सरकारी तपास यंत्रणांचा कसा गैरवापर केला हे सर्वांना माहित आहे. मुंबईतील वीज वितरणही अदानीला देण्याचा घाट राज्यातील फडणवीस सरकारने घेतला होता पण महावितरणचे कर्मचारी व जनतेच्या विरोधामुळे तूर्तास वीज वितरण अदानीकडे जाऊ शकले नाही. दुबईच्या कंपनीने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जास्त पैशांची बोली लावून करार केला असतानाही तो करार रद्द करुन मोदी सरकारच्या हट्टापायी धारावीचा प्रकल्प अदानी कंपनीला कमी पैशात देण्यात आला. अदानीचा गैरकारभार पाहता धारावीतील लाखो गरिब लोकांची घरे व छोट्या उद्योगांसमोर संकट उभे राहिले आहे. अदानीचा गैरकारभार आता उघड झाला असून सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडून काढून घ्यावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध पाहता सेबी व रिझर्व्ह बँकेने या हेराफेरीची गंभीरपणे चौकशी केली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अदानी समुहाला खाजगी बँकांपेक्षा दुप्पट कर्ज दिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानी कंपनीला ४०% कर्ज दिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी एलआयसी ने ८ टक्के शेअर्स म्हणजेच तब्बल ७४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केली आहे. अदानी समुहात मोदी सरकारने केलेल्या या अंधाधुंद व बेजबाबदार गुंतवणुकीमुळे LIC आणि SBI मध्ये बचत केलेल्या करोडो सामान्य गुंतवणुकदारांसमोर गंभीर आर्थिक धोका निर्माण झाला आहे.

अदानी समुहावर आर्थिक गैरव्यवहाराचे अतिशय गंभीर आरोप आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज अदानी समुहावर असल्याचा ठपकाही हिंडेबनर्गच्या अहवालात ठेवलेला आहे. प्रधानमंत्री मोदी यांचे लाडके उद्योगपती असलेल्या अदानींच्या विविध कंपन्यात मोदी सरकारने एलआयसी, एसबीआय आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थांद्वारे अविचाराने गुंतवणुक करुन आर्थिक व्यवस्थेचे प्रचंड नुकसान केले आहे. सामान्य गुंतवणुकदारांचे हित लक्षात घेता या आर्थिक घोटाळ्याचा गंभीर तपास होणे गरजेचे आहे, असेही लोंढे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com