Top Post Ad

स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर

 सुमारे 1850 चा काळ जर भारतावर राज्य करायचेच असेल, तर मुंबई ही भारताशी जोडली गेली पाहिजे. हे चाणाक्ष इंग्रजांनी ओळखले होते. यासाठी त्यांना रेल्वे मार्ग सुरू करायचे होते. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू केली पण पुढे ती भारताच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचे पण त्यामध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा मार्ग इंग्रजांना बरीच वर्ष सापडत नव्हता. एके दिवशी त्यांना बोरघाटामध्ये मेंढ्याचा कळप घेऊन जाताना एक धनगर दिसला. त्याने इंग्रजांना विचारलं तुम्ही काय शोधत आहात मी तुमची मदत करू शकतो का ? तेव्हा इंग्रज त्याच्याकडे पाहून कुत्सितपणे हसले. काही दिवसानंतर हतबल होऊन इंग्रजांनी त्या धनगराला आपली अडचण सांगितली. तेव्हा त्यांने अगदी सहजपाने त्या इंग्रज अधिकाऱ्यांना मार्ग दाखवला. इंग्रजांनी त्या धनगराला बोलावून सांग तुला काय पाहिजे? अशी विचारणा केली असता त्यांनी मला जर काही द्यायचं असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या! असे म्हंटले. पण हे ऐकताच इंग्रज अधिकाऱ्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या धनगरावर थेट गोळ्या झाडल्या. ही कहाणी आहे देशासाठी स्वातंत्र्य मागणाऱ्या स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांची…

स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर ज्यांचे आजही बोरघाटामध्ये एक छोटेसे मंदिर आहे.  २१ जानेवारी रोजी हे मंदिर प्रकाशमान झाले त्यासोबतच आता इतकी वर्षे उपेक्षित असलेला शिंग्रोबा धनगर यांचा इतिहासही उजेडात येणार आहे.  इंग्रजांना सापडत नसलेली वाट हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांनी एका चुटकी सरशी दाखवली. पण त्या मोबदल्यात कृतघ्न इंग्रजांनी त्यांना गोळ्या झाडल्या. पण आपला देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे झाली तरी सुद्धा या वीर हुतात्म्याच्या कार्याची दखल कोणीच घेतली नव्हती. मात्र, भाजपचे विमुक्त भटके आघाडी, कोकण सहसंयोजक भास्कर यमगर यांनी शिंग्रोबा धनगर यांच्या कार्याला न्याय मिळवून दिला. या मंदिरात विजेचा पुरवठा मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे मंदिरासोबतच स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचा इतिहासही आता उजळून निघणार आहे, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com