Top Post Ad

भारतातील महिलाची मुक्तिदाती सावित्रीमाई फुले

 


    भारतात आज पुरुषाच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत,हैदराबादच्या रोहित वेमुला प्रकरणाने स्मुर्ती इराणी देशभर नव्हे तर जगभरात गाजली,मनुस्मुर्ती निसार हा देश चालला असता तर सांसद भवनात या स्मुर्ती इराणीचा प्रवेश होऊन एवढा मोठा अभिनय करता आला असता काय?.ससंद भवन "सत्य मेव जयते" या ब्रीद वाक्याने चालते,पण मनुस्मुर्ती नुसार देश चालविणाऱ्यानी तो असत्ये मेव जयते नुसार चालविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात देश गुलामगिरीत जात आहे. स्मुर्ती इराणीच काय बँका,रेल्वे,सरकारी कार्यालय,शिक्षण संस्था,सर्व ठिकाणी महिलांची आज जी काय प्रगती आहे ती सावित्रीमाई फुलेंच्या त्याग,जिद्ध आणि उद्धिष्ट असलेल्या मुक्तिदातीमुळे.
First Female Teacher Of India भारतातील पहिली महिला शिक्षिका.महिलाची मुक्तिदाती सावित्रीमाई फुले हेच आजच्या सुरक्षित नोकरी करणाऱ्या महिला विसरल्यात.त्यांना विद्याची देवी सरस्वती,शारदा,धनाची देवी लक्ष्मी,संतोषीमाता,नवरात्री तील दुर्गा,अंबा,कालीमाता यांची कायम आठवण राहते.त्यांची रात्र दिवस उपासणा केली जाते पण त्यांचे नांव,आई वडिलांचे नांव,पतीचे,मुलामुलीचे नांव,गांव,तालुखा, जिल्हा,राज्य,शिक्षण आणि ऐतिहासिक कार्य शंभर शब्दात एकही सुशिक्षित पदवीधर महिलांना सांगता येत नाही,First Female Teacher Of India भारतातील पहिली महिला शिक्षिका.महिलाची मुक्तिदाती सावित्रीमाई फुले होत्या आणि दुसऱ्या कोणी ज्यांना माहित असेल त्यांनी ते जाहीरपणे सांगावे असे मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिना निमित्य त्यांना आव्हान करतो,

       महाराष्ट्र राज्यात सावित्रीबीचा जन्म ३ जानेवारी,इ.स.१८३१,सातारा जिल्ह्यातील नायगांव या गावी झाला होता.सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते ते गांवचे पाटील होते.सवित्रीमाईचा विवाह १८४० साली ज्योतिराव गोविंद फुले यांच्या बरोबर झाला.लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ,तर ज्योतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते.सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर,परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.१ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा.सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.

         १ जानेवारी,१८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. भारतातील व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा होती.(यापूर्वी मिशनर्‍यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींची शाळा सुरू केली, ती शाळा आता ही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली.शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.) सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी जीवतोड विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींना ही त्यांनी संघर्ष करून आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपनकरून कुरूप बनविले जाई. रूढी परमपराला विरोध अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या वासनाच्या शिकार बनत.गरोदर विधवा म्हणून समाज छळ करीत होता. जन्माला येणार्‍या मुलाला यातनां शिवाय काहीच मिळत नव्हते, अशा अन्याय,अत्याच्राला वैतागून विधवा आत्महत्या करीत होत. भ्रूणहत्या मोठया प्रमाणत घडविल्या जात होत्या.

          जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. ते सावित्रीबाईंनी समर्थपणे चालविले.फसलेल्या आणि बलत्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्यानी बाळंतपण करून गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करून जगातील ऐतिहासी संप त्यांनी घडवून आणला, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी जिद्दीने संघर्ष करून पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स.१८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
     १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई,गायकवाड सरकार अशा लोकांनी मोलाची मदत केली. १८९६-९७ सालां दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजाराने अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजना राबविली. यातून उद्भवणारे रोग्याचे हाल पाहून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितां साठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यात १० मार्च १८९७ रोजी त्यांचे त्यात निधन झाले.अशा त्यागी सावित्रीबाई फुले यांना आजच्या सुशिक्षित महिलानी न विसरता त्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन कार्य करावे हीच खरे त्यांना जयंती दिना निमित्य अभिवादन असेल.

        आजच्या सुशिक्षित महिला मोरावर नटून थटून बसलेली स्वता:ला सरस्वती म्हणणारी कोण कूठल्या बाईला मानतात.तिचा जन्म कुठे,कधी झाला,शिक्षण कुठे घेतले हे आजवर कोणालाच सांगता आले नाही.ना ती कूणाला दिसली,ना पावली.तरी शाळा कॉलेज मध्ये तिचा जय जयकर होत असतो.भारतीय स्ञी शुद्र म्हणून जगत होती तेव्हा कूठे गेली ती सरस्वती?ब्राम्हणाकडून इथल्या स्ञीयांवर अत्याचार केले जात होते तेव्हा कूठे गेली होती सरस्वती?.मग आता सर्व समाजाच्या महिलांनी सांगावे विद्येची देवता कोण?.मनूवादी ब्राम्हणानी लादलेली सरस्वती की,महिला सह गोरगरीबांसाठी झटलेली आपली सावित्री माई फुले.महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी कुठे कुठे शाळा त्याकाळी काढल्या यांची इतिहासात नोंद असलेली यादी आहे.म्हणूनच First Female Teacher Of India भारतातील पहिली महिला शिक्षिका. महिलाची मुक्तिदाती सावित्रीमाई फुले आहेत.यांच्या १९२ व्या जयंती निमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com