Top Post Ad

अनाधिकृत हातगाडी व फेरीवाले यांची कंबर तुटली

मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे' अभियानातंर्गत हाती घेतलेली सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून ठाणे शहर सुशोभिकरणाचे काम यु्द्धपातळीवर सुरु आहे.  ठाणे महानगरपालिकेच्या माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत अनाधिकृत रित्या फेरीवाल्यांच्या प्रमाण वाढल्याने यापूर्वी या समितीकडून हात गाड्या उचलून जप्त करण्यात येत होत्या या हातगाड्या परत रीतसर शुल्क भरून संबंधित फेरीवाला घेऊन जात असे व पुन्हा तीच समस्या निर्माण करून तो रस्त्यावर अनधिकृत धंदा करीत होता यामुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना रस्त्यावरून जाण्यायेण्याची फार अडचण येत होती 

यावर उपाय म्हणून माननीय सहाय्यक आयुक्त अतिक्रमण सनियंत्रण व समन्वय अधिकारी मुख्यालय यांनी दिलेल्या आदेशानुसार माननीय सहा. आयुक्त प्रीतम पाटील व त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून अशा प्रकारच्या अनाधिकृत हातगाडी लावणाऱ्या इसमांच्या हात गाड्या जेसीबी मशीनच्या साह्याने जागेवर तोडण्याची कारवाई सुरू केलेली आहे गेल्या पाच दिवसापासून या कारवाईने अनाधिकृत हात गाडी लावणाऱ्या इसमाने प्रचंड धसका घेतला असून काही हात गाड्या या फेरीवाल्याने आपल्या घरातच घराच्या बाजूला लावून प्रत्यक्ष रस्त्यावर आता खाली व बसून टोपलीने धंदा सुरू केलेला आहे ही अशी धडक मोहीम  सर्व समित्यांमध्ये अनाधिकृत फेरीवाल्यांवर राहिल्यास ठाणे शहर फेरीवाला मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. 


त्याचप्रमाणे ठाणे स्टेशन परिसरही मोकळा करण्याचे काम वेगात सुरु आहे. फेरीवाल्यांवर कारवाईचा अंकूश सातत्याने उगारण्यात येत आहे. मात्र स्टेशनजवळच असलेल्या बाजारपेठ रोडवर नागरिक स्टोअरने अडवलेली पदपाथची जागा मात्र नौपाडा प्रभाग समितीला दिसत नाही का असा प्रश्न येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. मागील अनेक वर्षापासून या छोट्याशा जागेतून ये जा करण्यास प्रवाशांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील साडी खरेदीसाठी उभ्या असणाऱ्या ग्राहकांशी अनेकवेळा ये जा करणाऱ्या प्रवांशांसोबत सातत्याने तू-तू मै मै होत असते. याबाबत नौपाडा प्रभाग समिती लक्ष कधी देणार असा प्रश्न येथील नागरीक करीत आहेत. 

'मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे' अभियानातंर्गत हाती घेतलेली सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून शहराचे नवे रुप नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. शहरातील भिंतीवरील आकर्षक व बोलकी चित्रे लक्ष वेधून घेत असून सौंदयीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून पुलाच्या खालच्या जागेचा वापर होत नसल्यामुळे ती पडून राहते किंवा काही वेळा बेघर लोक तसेच सिग्नलवरील विक्रेते त्याचा वापर करतात. हे टाळण्यासाठी पुलाखालच्या जागांचे सुद्धा सौंदर्यीकरण करुन ते वापरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या  कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नितिन कंपनी जंक्शन येथे प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

  शहरातील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी नागरिकांना उपयोगी पडतील अशा पध्दतीने या जागा विकसित करणे किंवा तरुण मुलांना खेळण्यासाठी त्या जागा विकसित करणे, काही ठिकाणी रॉक क्लायबिंग सारख्या काही नाविन्यपूर्ण बाबी करणे शक्य आहे का, याची पडताळणी करुन नाविन्यपूर्ण कल्पनाचा विचार करावा अशा सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या. उड्डाणपुलाखाली सुरू असलेली कामे ही नियोजित वेळेत पूर्ण होतील या दृष्टीने कामाला गती द्यावी तसेच संपूर्ण शहरातील सर्व रस्त्यांवर थर्मोप्लास्ट पेंट करण्याची कामेही पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधितांना दिले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com