Top Post Ad

नोटरी डॉक्युमेंट करणेबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?


  ग्राहक राजा आपण नोटरी डॉक्युमेंट करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना? नोटरीची नियुक्ती ही  सरकार करते जेणे करून नागरिकांना  लहान सहान करार मदार करणे साठी, साक्षांकित प्रती करणे साठी सोईस्कर होईल. नागरिकांचा तसेच सरकारी नोंदणी अधिकारी यांचा वेळ वाचेल.

नोटरी कायदा 1952 आणि नोटरी नियम 1956 मधील कलम / नियम विचारात घेऊन दस्तऐवज साक्षांकित करणे, नियम 10 नुसार फी आकारणे हे अपेक्षित आहे. परंतु काही नोटरी हे अवाजवी फी आकारात आसतात त्यामुळे शासनाने परिपत्रके काढून फी निश्चित केलेली आहे. सदर बाबत आपण खालील लिंक द्वारे दर पाहू शकता, विविध नोटरी संबंधित परिपत्रके पाहू शकता.

https://lj.maharashtra.gov.in/1253/Notary-Circulars

 नोटरी अधिनियम १९५२ मधील कलम ३ नुसार व नोटरी नियम १९५६ नुसार नोटरीची नियुक्ती करण्यात येते. नोटरीच्या नियुक्तीसाठी वकीली व्यवसायाचा १० वर्षांचा अनुभव लागतो. (महीला, मागासवर्गीय  व इतर  मागासवर्गीय साठी किमान ७ वर्षांचा अनुभव लागतो ) नोटरीची एकदा नियुक्ती झाल्यावर दर ५ वर्षांनी नोटरीना  मुदतवाढ देण्यात येते त्यासाठी नोटरी ने दर पाच वर्षांनी आपले सर्टिफिकेट रीन्यू  केले पाहिजे. नोटरीची नियुक्ती झाल्या नंतर शासन त्यांना कोणतेही मानधन देत नाही. परंतु ते शासनाने निश्चित केलेली फी नागरिकांकडून घेऊ शकतात. सामान्य जनतेला एखाद्या नोटरीच्या विरुध्द कारवाई/ तक्रार करायची असल्यास  नोटरी अधीनियम 1956 मधील नियम 13 नुसार सक्षम प्राधीकारी यांच्याकडे रीतसर तक्रार  करु शकता. 

नोटरी विरुध्द कारवाई  करावयाचे आधीकार सहसचिव तथा सक्षम प्राधीकारी, विधी आणि न्याय विभाग,  रूम नंबर 304 (मुख्य), 3 रा मजला, राजगुरू हुतात्मा चौक, मादाम कामा रोड,  मांत्रालय, मुंबई– 32. दूरध्वनी क्रमाांक.(022) 22028619  यांना आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडे रीतसर तक्रार करू शकता.

नोटरी फी ही खालील प्रमाणे अकारावी असे परिपत्रक क्रमांक  विवन्यावि-2012/नोटरी/ई-शाखा दिनांक १३/०४/२०१२ नुसार निश्चित केले आहे 

१) रुपये १०००० पर्यंतचा करार नोंदवायचे (नोटरी करणेसाठी) साठी रुपये ३५
२) दहा हजार ते २५००० साठी रुपये ७५/-
३) २५००० ते ५०००० साठी रुपये १००/-
४) ५०००० चे पुढे जास्तीत जास्त रुपये १५०/-
५) साक्षांकित प्रती साठी रुपये ५/- प्रती पान (कमीतकमी रुपये १०/-)

वरील लिंकने आपण सर्व चार्जेस बाबत माहिती घेऊ शकता. वरील प्रमाणे रुपये ३५/- ते रुपये १५०/- म्हणजेच जास्तीत जास्त रुपये १५०/- एवढाच आकार नोटरी घेऊ शकतात. कित्येक नोटरी हे काही हाई कोर्टात, सुप्रीम कोर्टात दाखल करायचे कागद पत्रे, काही करार नामे यांच्या साठी वरील पेक्षा खूप जास्त फी मागतात आणि नागरिकांना याची माहिती नसते त्यामुळे तेही नविलाजने देतात. आपणास माहीत आहे का नोटरी ने अकारलेल्या फिची  पावती द्यावी असेही शासनाने बंधन नोटरी वर घातले आहे. आपण ज्या नोटरीची सर्व्हिस घेत आहात त्या नोटरी चे सर्टिफिकेट ची मुदत संपलेली नाही ना याची नक्की खात्री करा, शिवाय सदर नोटरी हे खरे आहेत की बोगस आहेत याची माहिती घ्या .

आपण  सदर लिंक द्वारे चेक करू शकता की शासनाने नियुक्त केलेले सदर नोटरी आहेत. 

जर नोटरी बोगस आहे, सर्टिफिकेटची मुदत संपलेली आहे तर आपण त्यांची तक्रार वरील पत्यावर जरूर करा आणि आपल्या बरोबर इतर ग्राहकांना, नागरिकांना फसवणुकीपासून वाचवा.

नोटरी ने त्यांना मंजूर केलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे असेही शासनाने नमूद केले आहे. जर त्यांनी त्यांच्या कर्यक्षेत्राबाहेर काम केले तर शासनाकडे तक्रार केल्यावर त्यांचे वर कायदेशीर कारवाई होते आणि त्यांचे सर्टिफिकेट ही काढून घेतले जाऊ शकते.

तेव्हा ग्राहकांनी सजग बनले पाहिजे. सरकार सरकार म्हणजे कोण? जनता हीच सरकारची मालक आहे. बिनधास्त पुढे या, सोशल मीडिया चा वापर करा आणि लिहायला, तक्रार लेखी, ईमेल ने द्यायला शिका तरच देश बदलेल.

हे असेच चालायचे आपला देशाची व्यवस्था खूप भ्रष्ट झाली आहे असे रडगाणे गाण्या पेक्षा  आपण ती सुधारूयात. चला व्यवस्था बदलू यात.

आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा. 

आमची वेबसाईट :

www.abgpindia.com

विजय सागर

अखिल भारतीय ग्राहक पंचायत

६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

विजय सागर  9422502315

श्री विलास लेले  9823132172 

सौ अंजली देशमुख  9823135803

श्रीमती विजया वाघ  9075132920

श्री रवींद्र वाटवे  9422383785

श्रीमती राजश्री दीक्षित  9422318909

श्री रवींद्र सिन्हा, बाणेर  7774001188

श्री विश्वास चव्हाण,धानोरी  7769978484

श्री अरुण नायर,विश्रांतवाडी  9890652675

*ठाणे*- श्रीमती  स्मिता जामदार 9819438286,

श्री दिपक सावंत  9833398012

*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153

*नागपूर*: श्री विलास ठोसर 9766550868

*परभणी*': डॉक्टर विलास मोरे 818005250०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com