बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीनंतर बौद्ध धम्माची वैश्विक बांधणी व्हावी, म्हणून पुन्हा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प घेऊन, आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाची ऐतिहासिक धम्म पदयात्रा निघत आहे. मानवात मैत्रीचे नाते जोडणे, बुध्द धम्माच्या महान तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे, या उदात्त हेतूने ही धम्म पदयात्रा चैत्यभूमीच्या दिशेने जाणार आहे. देशात पहिल्यांदाच थायलंड येथील ११० भिक्खूंच्या उपस्थितीत परभणी ते चैत्यभूमी दादर अशी ऐतिहासिक भव्य धम्म पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
याची सुरुवात मंगळवार दि १७ जानेवारी रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान, जिंतूर रोड, परभणी येथून झाली. या धम्म पदयात्रेचे उद्घाटन भंते लाँगफुजी (जागतिक बौद्ध धम्म गुरू, थायलंड) यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन होणार असून, भिक्खूंची धम्मदेसना देखील होणार आहे. भंते सोंगसेन फॅटफियन (थायलंड), भंते विचीयन अबोत (श्रीराजगिर) थायलंड, भंते डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा), आदी थायलँड येथील भिक्खूसंघासह भीमराव आंबेडकर, सिने अभिनेता गगन मलिक, कॅप्टन नटकिट (थायलंड), सिरीलक मैथाई (थायलंड) आदी मान्यवर या यात्रेत सहभागी झाले आहेत.
परभणी ते चैत्यभूमी (दादर, मुंबई) पर्यंत निघत असलेल्या या पदयात्रा प्रस्थान सोहळ्यानिमित्त भारतात प्रथमच तथागत बुद्धांचा पवित्र अस्थिकलश सुद्धा येत आहे. आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ व मान्यवरांच्या उपस्थिती धम्म पदयात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा, तथागत भगवान गौतम बुध्द यांचा अस्थिकलश दर्शन व बुध्द मूर्ती वाटप तसेच धम्मदेसना सोहळा होत आहे. चला बुद्धाच्या मार्गाने...चला अहिंसेच्या मार्गाने" हा विश्वशांतीचा संदेश घेवून आंतरराष्ट्रीय 110 भिक्खूंची बौद्ध धम्म पदयात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा उद्या दि.17 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वा. ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान, जिंतूर रोड, परभणी येथे आयोजित केला आहे. निमित्त बुद्धांच्या थायलंड येथे जतन केलेल्या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन, बुद्ध मूर्ती वाटप व धम्मदेसना होणार आहे. या ऐतिहासिक सोहळयाच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. तरी माझ्या आवाहानाला पत्रिका समजून या ऐतिहासिक धम्मकार्यात आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा, - डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे
0 टिप्पण्या