काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास
पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या 28हजारांपेक्षा जास्त होती तर इंग्रजांनी केवळ 500 महार रेजीमेंटच्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ ला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला.
महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.
१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदने नंतर दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.व शूर सैनिकांना मानवंदना देतात . प्रत्येक भीमसैनिकांने जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आले पाहिजे. ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे .
!जयभीम ! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!
0 टिप्पण्या