Top Post Ad

पुण्यातील देहू रोड येथील बुद्धमूर्ती स्थापना दिन


पुणे  पिंपरी-चिंचवड परिसरातील देहूरोड येथे १९५४  साली  २५ डिसेंबर रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून येथे जागतिक परिषदेत भेट म्हणून मिळालेली, भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली. या  हा बुद्धभूमी दिन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार येणार असल्याने अनेक संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी देहू रोड येथील  बुद्धभूमीवर लाखोंचा भीमसागर एकवटतो. या ही वर्षी भव्य प्रमाणात उत्साहात हा दिवस साजरी करणार असल्याचे बुद्ध विहार ट्रस्ट आणि भीम अनुयायांनी  सांगितले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणनंतर त्यांच्या अस्थी देहूरोडमधील बुद्धभूमी येथील अस्थी स्तूप  बोधीवृक्षात ठेवण्यात आल्या आहेत. देशाच्या विविध भागांतून आलेले बौद्ध अनुयायी दर्शनासाठी येत असतात.  बुद्धवंदना, धम्म रॅली, पंचशील ध्वजारोहण, पुरस्कार वितरण, अन्नदान आदी कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.   भीमगीतांनी अवघा परिसर दुमदुमून जातो.  बुद्धविहार कृती समिती, बुद्धविहार ट्रस्ट, समन्वय समिती धम्मभूमी देहूरोड, रिपाई, सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बहुजन समाज पक्ष, भीमशक्ती संघटना, भारतीय बौद्ध महासभा,  विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रतिष्ठाण सर्वजण एकत्र मिळून हा वर्धापन दिन साजरा करतात.  खेळणी, अल्पोपहार, पुस्तके, मूर्तींचे फोटो, कॅलेंडर, विविध अन्य साहित्यांच्या दुकानांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप येत असते.  

 या कार्यक्रमास जिल्ह्यातून व राज्यातून लाखो बौद्ध अनुयायी येतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने 25 डिसेंबर रोजी तात्पुरते बदल केलेले आहेत. 

देहूरोड/ निगडी वाहतूक विभाग अंतर्गत  1) जुना मुंबई पुणे हायवे सोमाटणे वरून निगडी (पुणे) कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सेंट्रल चौकातून पुढे जाण्यास मनाई केली आहे. पर्यायी मार्ग – सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून मुंबई बेंगलोर हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील. 
2) पिंपरीकडून देहू रोड मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक भक्ती शक्ती चौकातून पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग – पिंपरी कडून देहू रोड मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व वाहने भक्ती शक्ती चौकातून डावीकडे वळून रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील. वरील प्रमाणे देहूरोड निगडी वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सकाळी 4 ते मध्यरात्रीपर्यंत (रात्री 12 ) हे वाहतुकीत बदल लागू असतील
--------------------------------------

२५ डिसेंबर १९५४ देहूरोड पुणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली .
८ मे १९५४ रोजी देहूरोड पुणे चोखोबा मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब म्हणाले " तुम्ही बांधलेल्या देवळात भगवान बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करा . मंदिर समितीने मुर्तीची प्रतिष्ठापना तुमच्याच हस्ते व्हावी अशी इच्छा बाबासाहेबांकडे व्यक्त केली . बाबासाहेबांनी मंदिरसमीतीच्या निमंत्रणास होकार देऊन बुध्दमुर्ती देखील त्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले . २५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगूनहून आणलेल्या मुर्तीची प्रतिष्ठापना बाबासाहेबांच्या हस्ते पुण्यातील देहूरोड येथील देवळात करण्यात आली . सुमारे चाळीस हजार लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला संबोधित करताना बाबासाहेब म्हणाले ," कमळाला पाली भाषेत पांडुरंग असे म्हणतात . पंढरपूर येथे बौद्ध धम्माचे देवालय होते हे मी सिध्द करून देईन . "
भारतातुन बौद्ध धम्माचा विलय झाल्यानंतर भारतात झालेली हि पहिली बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना .असा हा अनमोल ऐतिहासिक प्रसंग .
१९२७ साली २५ डिसेंबरलाच रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे पाण्यालाही आग लाऊन मानवमुक्तीच्या लढाईचे जेथे रणशिंग फुंकले त्या चवदार तळ्याच्या आणि जवळच अणाऱ्या बुद्ध लेण्यांच्या साक्षीने मनुस्मृती जाळली . तत्कालीन हिंदू समाजाला विषम व्यवस्था आणि त्यांच्या गुलामगीरीला कारण ठरणाऱ्या मनुस्मृतीची जाणीव देऊन मनुस्मृती दहनास प्रोत्साहन देऊन कार्यरत केले . मानसा मानसात भेद करणाऱ्या , तमाम स्त्रियांना अपमानित आणि गुलामीच जीनं जगायला लावणाऱ्या , छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या , शिवाजी महाराजांना अपमानित करणाऱ्या मनुस्मृतीच दहन करुन भारत देशातील मनुच्या कायद्याला , विषमतेला , मनुवादाला ,जातीव्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुंग लावला .
२५ डिसेंबर ऐतिहासिक दीवस . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीयांच्या दुःखाचं मुळ कारण ठरणारी मनुस्मृती जाळली आणि दुःखाचं अस्तित्व मान्य करून दुःख निवारणाचा , दुःख मुक्तीचा समता , स्वातंत्र , न्याय आणि विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना तथा अडीज हजार वर्षांनंतर बुद्ध विचारांची प्रतिष्ठापना भारत देशात पुनश्च करून तमाम भारतीयांवर महान उपकारच केले आहेत . भारत देशाची राज्यघटना समता , स्वातंत्र , न्याय आणि बंधुत्व या चतुःसुत्रीवरच आधारलेली आहे . याबाबत बाबासाहेब खुलासा करतात मी हे तत्त्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांतीतुन घेतले नसुन माझ्या तत्वज्ञानाच अधिष्ठान भगवान बुद्धांच्या धम्मात आहे . भारत देशाची गौरवशाली परंपरा बौद्ध धम्माच्या सांस्कृतिक प्रतिकांनीच विषद होउ शकते . बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान असल्याचे आपण जगाला सांगु शकतो . हे संविधान निर्मितीच्या वेळी ईतिहासाची जान असणाऱ्या सन्माननीय संविधान सभेतील सदस्यांनी मान्य केले . स्वतंत्र भारताच्या राजभवनात देखील धम्मचक्र परिवर्तनाय हा घोष आणि बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापित झालेली आहे . आज २५ डिसेंबर या ऐतिहासिक पवित्र दिनी भारतीय समाजाने आणि राज्यकर्त्यांनी हि महान सांस्कृतिक परंपरा निरंतर संवर्धित करावी हिच नम्रभावे सदिच्छा
सुरेंद्र खरात ; अभियान प्रमुख
सांस्कृतिक प्रदुषणमुक्ती अभियान
२५ डिसेंबर २०२०


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com