दरवर्षी 1 एप्रिल रोजी भारतीय रिजर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या शुभेच्छा देत असतो, कारण रिजर्व्ह बँकेची स्थापना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ रूपी ह्या त्यांच्या ग्रंथावर झाली. आज रिजर्व बैंक ऑफ इंडिया हि ब्राम्हणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे. याचाच अर्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या साहित्यांचा वापर ब्राम्हणी व्यवस्था स्वतःच्या विकासासाठी करत असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केला. बुद्धिस्ट बँक भागधारक परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करण्याकरिता ते आज ठाण्यात आले होते. महागिरी कोळीवाडा, नागसेन नगर परिसरातील समाजबांधवांकरिता आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. पं.जवाहरलाल नेहरू बाग येथील वाल्मिकी सभागृहात आज १० डिसेंबर रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष बुधाजी वाढविंदे, ठाणे तालुका अध्यक्ष यशवंत बिरारे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मंगलाताई बिरारे, स्थानिक नगरसेवक सुनिल हंडोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब अबिडकरांचे अनुयाई केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महापरिनिर्वाणदिना पुरतेच शिल्लक राहिलेले आहेत. त्यासाठी आम्ही असे ठरविले आहे कि 'केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांवर काम केले पाहीजे. ह्याची सुरवात बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करण्यापासून करीत आहोत. आज गाव पातळी पासून ते देश पातळीपर्यंत बौद्धांची एकही बँक अस्तित्वात नाही. आंबेडकरी समुदाय त्यांच्या कष्टाचा पैसा हा ब्राह्मणी व्यस्थेने निर्माण केलेल्या बँकेमध्ये ठेवतो आणि आमच्या पैशांवर ब्राम्हणी बँका त्यांच्या स्वःताच्या व्यवस्था मजबूत करीत आहेत. त्यांच्या उद्योजकांना कर्ज देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देणे, गृह निर्माण कर्ज देणे हे सर्व आपल्या पैश्यांवर सुरु आहे. याकरिताच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती राजरत्न यांनी दिली.
एखादी राष्ट्रीयकृत बँक निर्माण करायची झाल्यास त्याला हजारो कोटी रुपयांचे अर्थ साहाय्य आवश्यक आहे. येवढे अर्थसहाय्य आपण उभे करू शकणार नाही, ह्याची खात्री असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहकार कायद्याची निर्मिती केली. जेणे करून आपण एकमेकांच्या सहकारातून आपले स्वतंत्र उद्योग-व्यवसाय सुरु करू शकु. ह्या सहकार चळवळीचा सर्वाधिक वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधकांनी त्यांच्या स्वतःच्या व्यवस्था (साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, सूत गिरण्या इत्यादी इत्यादी) उभ्या करण्यासाठी केला आणि आंबेडकरी जनतेला केवळ जयंती पुतळे आणि नामांतरामध्ये व्यस्त ठेवले.
ह्याच सहकार कायद्याचा वापर करून 'सारस्वत बँकेची निर्मिती 2.5 टक्के लोकांनी स्वतःची 'बँक' तयार करण्यासाठी केला आणि आज ती बैंक 58 देशात कार्यरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला हा कायदा त्यांच्या अनुयायांनी वापरून त्यांच्या स्वतःच्या व्यवस्था उभ्या कराव्या हा त्यांचा उद्देश होता, परंतु या कायद्याचा वापर नेमका त्यांच्याच विरोधकांनी करून घेतला. आणि म्हणून, ह्या कायद्याचा वापर करून बौद्धांची स्वतंत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँक निर्माण करण्याची आम्ही सुरु केली आहे.
सहकार कायद्यानुसार, जर राष्ट्रीयकृत बँक तयार करायची असेल तर त्याची सुरवात जिल्ह्यापासून करण्यात यावी. हा सहकार कायदा असल्यामुळे कुणा एकाची मक्तेदारी होऊ नये याकरिता 18 वर्षावरील व्यक्तीला केवळ एक भाग (शेअर) देण्यात यावे. जिल्हा सहकारी पत संस्थेची मान्यता मिळविण्यासाठी एक कोटी रुपये आणि 4000 आगधारक (शेअरहोल्डर) ह्यांचे अर्ज हे जिल्हा प्रबंधकाला सुपूर्द करणे गरजेचे आहे. एक कोटी भांडवल भागिले चार हजार शेअरहोल्डर म्हणचे 2500 रुपयाचे शेअर प्रति शेअरहोल्डर अधिक 100 रुपये नोंदणी फी अधिक 10 रुपये अर्ज फी असे एकूण 2610 रुपये हे प्रति व्यक्ती जमा करणे गरजेचे आहे. ह्या 4000 लोकानी एक आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या 4000 लोकांच्या सहकारी पत संस्थेस नंबर कोटी रुपयापर्यंत भांडवल बँक चालविण्यासाठी देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "LOW AIM IS A CRIME" छोटे उद्देश्य उराशी बाळगणे हा खूप मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून आमचे उद्देश्य केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीत. एका जिल्हा पत संस्थेला जर संपूर्ण राज्यात कार्यरत व्हायचे असेल तर त्या पत संस्थेला पहिल्या तीन वर्षात त्यांची बँक / पत संस्था हि 'अ' नामांकन प्राप्त करणे गरजेचे असते. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे कि आम्ही ह्या बँकेस 'अ' नामांकन हमखास प्राप्त करून देऊ, तीन वर्षांनंतर ह्या पत संस्थेस इतर जिल्ह्यात कार्यरत होण्याची परवानगी प्राप्त होते. म्हणजेज तीन वर्षांत हि बैंक संपूर्ण राज्यभर पसरलेली असेल.
अश्याच पद्धतीने सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर ह्या बँकेस मल्टि स्टेट शेड्युलड बँकेची अहर्ता प्राप्त होते आणि हि बँक देशभर कार्य करु शकते. परंतु आमचे ध्येय देशभराकरिता देखील नाही. आज बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जगभर आहेत. मी स्वतः अनेक देशासोबत काम करीत आहे. हि संकल्पना विदेशातील आमच्या बांधवाना सांगितल्यानंतर सर्व उत्सुक आहेत. म्हणजेच ह्या बँकेच्या शाखा देश-विदेशात असतील आणि जसे वेग-वेगळ्या बँकेवर नियंत्रण ठेवण्याकरिता रिजर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली तसेच जिल्हा राज्य-राष्ट्र-परदेशातील बौद्धांच्या बँकेवर नियंत्रण ठेवण्याकरीता 'बुद्धिस्ट बैंक ऑफ इंडीया ची निर्मिती करण्यात येईल,
हे उद्देश अस्तित्वात उतरविण्याकरिता आणि जिल्हा पत संस्थेच्या स्थापनेकरिता त्या पहिल्या 4000 भागधारकांची आवश्यक्यता आहे. हि सहकार कायद्यानुसार स्थापन झालेली बैंक असल्यामुळे ह्या बँकेला झालेला सगळा फायदा डिविडेंड च्या स्वरुपात हा ह्या 4000 भागधारकांना समान वाटप करण्यात येईल. एवढेच नाही तर देश-विदेशातून जे प्रकल्प मी भारतात आणत आहे त्यात ह्या 4000 भागधारकांना व त्यांच्या परिवाराला प्राधान्य राहील. आपण नक्की बौद्धांच्या स्वतंत्र अर्थ व्यवस्था निर्माण करण्यास साथ द्याल अशी अपेक्षा यावेळी डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली.
दरवर्षी 1 एप्रिल रोजी भारतीय रिजर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या शुभेच्छा देत असतो, कारण रिजर्व्ह बँकेची स्थापना बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ रूपी ह्या त्यांच्या ग्रंथावर झाली. आज रिजर्व बैंक ऑफ इंडिया हि ब्राम्हणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे. याचाच अर्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या साहित्यांचा वापर ब्राम्हणी व्यवस्था स्वतःच्या विकासासाठी करत असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केला. बुद्धिस्ट बँकेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता ते आज ठाण्यात आले होते. महागिरी कोळीवाडा, नागसेन नगर परिसरातील समाजबांधवांकरिता आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. पं.जवाहरलाल नेहरू बाग येथील वाल्मिकी सभागृहात आज १० डिसेंबर रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी बुद्धिस्ट बँकेकरिता आवश्यक असलेली माहिती उपस्थितांनी दिली.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब अबिडकरांचे अनुयाई केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महापरिनिर्वाणदिना पुरतेच शिल्लक राहिलेले आहेत. त्यासाठी आम्ही असे ठरविले आहे कि 'केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांवर काम केले पाहीजे. ह्याची सुरवात बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करण्यापासून करीत आहोत. आज गाव पातळी पासून ते देश पातळीपर्यंत बौद्धांची एकही बँक अस्तित्वात नाही. आंबेडकरी समुदाय त्यांच्या कष्टाचा पैसा हा ब्राह्मणी व्यस्थेने निर्माण केलेल्या बँकेमध्ये ठेवतो आणि आमच्या पैशांवर ब्राम्हणी बँका त्यांच्या स्वःताच्या व्यवस्था मजबूत करीत आहेत. त्यांच्या उद्योजकांना कर्ज देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देणे, गृह निर्माण कर्ज देणे हे सर्व आपल्या पैश्यांवर सुरु आहे. याकरिताच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती राजरत्न यांनी दिली.
एखादी राष्ट्रीयकृत बँक निर्माण करायची झाल्यास त्याला हजारो कोटी रुपयांचे अर्थ साहाय्य आवश्यक आहे. येवढे अर्थसहाय्य आपण उभे करू शकणार नाही, ह्याची खात्री असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहकार कायद्याची निर्मिती केली. जेणे करून आपण एकमेकांच्या सहकारातून आपले स्वतंत्र उद्योग-व्यवसाय सुरु करू शकु. ह्या सहकार चळवळीचा सर्वाधिक वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधकांनी त्यांच्या स्वतःच्या व्यवस्था (साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, सूत गिरण्या इत्यादी इत्यादी) उभ्या करण्यासाठी केला आणि आंबेडकरी जनतेला केवळ जयंती पुतळे आणि नामांतरामध्ये व्यस्त ठेवले.
ह्याच सहकार कायद्याचा वापर करून 'सारस्वत बँकेची निर्मिती 2.5 टक्के लोकांनी स्वतःची 'बँक' तयार करण्यासाठी केला आणि आज ती बैंक 58 देशात कार्यरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला हा कायदा त्यांच्या अनुयायांनी वापरून त्यांच्या स्वतःच्या व्यवस्था उभ्या कराव्या हा त्यांचा उद्देश होता, परंतु या कायद्याचा वापर नेमका त्यांच्याच विरोधकांनी करून घेतला. आणि म्हणून, ह्या कायद्याचा वापर करून बौद्धांची स्वतंत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँक निर्माण करण्याची आम्ही सुरु केली आहे.
सहकार कायद्यानुसार, जर राष्ट्रीयकृत बँक तयार करायची असेल तर त्याची सुरवात जिल्ह्यापासून करण्यात यावी. हा सहकार कायदा असल्यामुळे कुणा एकाची मक्तेदारी होऊ नये याकरिता 18 वर्षावरील व्यक्तीला केवळ एक भाग (शेअर) देण्यात यावे. जिल्हा सहकारी पत संस्थेची मान्यता मिळविण्यासाठी एक कोटी रुपये आणि 4000 आगधारक (शेअरहोल्डर) ह्यांचे अर्ज हे जिल्हा प्रबंधकाला सुपूर्द करणे गरजेचे आहे. एक कोटी भांडवल भागिले चार हजार शेअरहोल्डर म्हणचे 2500 रुपयाचे शेअर प्रति शेअरहोल्डर अधिक 100 रुपये नोंदणी फी अधिक 10 रुपये अर्ज फी असे एकूण 2610 रुपये हे प्रति व्यक्ती जमा करणे गरजेचे आहे. ह्या 4000 लोकानी एक आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या 4000 लोकांच्या सहकारी पत संस्थेस नंबर कोटी रुपयापर्यंत भांडवल बँक चालविण्यासाठी देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "LOW AIM IS A CRIME" छोटे उद्देश्य उराशी बाळगणे हा खूप मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून आमचे उद्देश्य केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीत. एका जिल्हा पत संस्थेला जर संपूर्ण राज्यात कार्यरत व्हायचे असेल तर त्या पत संस्थेला पहिल्या तीन वर्षात त्यांची बँक / पत संस्था हि 'अ' नामांकन प्राप्त करणे गरजेचे असते. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे कि आम्ही ह्या बँकेस 'अ' नामांकन हमखास प्राप्त करून देऊ, तीन वर्षांनंतर ह्या पत संस्थेस इतर जिल्ह्यात कार्यरत होण्याची परवानगी प्राप्त होते. म्हणजेज तीन वर्षांत हि बैंक संपूर्ण राज्यभर पसरलेली असेल.
अश्याच पद्धतीने सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर ह्या बँकेस मल्टि स्टेट शेड्युलड बँकेची अहर्ता प्राप्त होते आणि हि बँक देशभर कार्य करु शकते. परंतु आमचे ध्येय देशभराकरिता देखील नाही. आज बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जगभर आहेत. मी स्वतः अनेक देशासोबत काम करीत आहे. हि संकल्पना विदेशातील आमच्या बांधवाना सांगितल्यानंतर सर्व उत्सुक आहेत. म्हणजेच ह्या बँकेच्या शाखा देश-विदेशात असतील आणि जसे वेग-वेगळ्या बँकेवर नियंत्रण ठेवण्याकरिता रिजर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली तसेच जिल्हा राज्य-राष्ट्र-परदेशातील बौद्धांच्या बँकेवर नियंत्रण ठेवण्याकरीता 'बुद्धिस्ट बैंक ऑफ इंडीया ची निर्मिती करण्यात येईल,
हे उद्देश अस्तित्वात उतरविण्याकरिता आणि जिल्हा पत संस्थेच्या स्थापनेकरिता त्या पहिल्या 4000 भागधारकांची आवश्यक्यता आहे. हि सहकार कायद्यानुसार स्थापन झालेली बैंक असल्यामुळे ह्या बँकेला झालेला सगळा फायदा डिविडेंड च्या स्वरुपात हा ह्या 4000 भागधारकांना समान वाटप करण्यात येईल. एवढेच नाही तर देश-विदेशातून जे प्रकल्प मी भारतात आणत आहे त्यात ह्या 4000 भागधारकांना व त्यांच्या परिवाराला प्राधान्य राहील. आपण नक्की बौद्धांच्या स्वतंत्र अर्थ व्यवस्था निर्माण करण्यास साथ द्याल अशी अपेक्षा यावेळी डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन बौद्धजन पंचायत शाखा क्र. २४७, महात्मा फुले नगर, खारटन रोड, नागसेन नगर व महागिरी परिसरातील समस्त बौद्ध जनतेने केले होते. या कार्यक्रमाकरिता राहुल पवार ,किशोर बनकर ,अभय गायकवाड, किशोर कांबळे, लक्ष्मण मोते, अमोल गांगुर्डे, अजय पवार, गणेश कांबळे, महेंद्र शिंदे, राजेश साळवे महेंद्र कांबळे, मंगेश आडसुळे, सुरेश भोजनेआणि सुबोध श्याक्यरत्न यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या