.अनिमित जमा राशी अधिनियम प्रतिबंधक कायदा -2019 buds act-2019 अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया चालवून मैत्रेय समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी कारवाई करावी, वर्षा सत्पाळकर व अन्य मैत्रेय संचालकांना त्वरित अटक करणे,मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांची स्वतंत्र न्यायप्रक्रिया चालविणे, मैत्रेय उद्योग प्रकरणाची सीबीआय चौकशी करणे,जर महाराष्ट्र शासनाने असे होत नसेल तर मैत्रेय उद्योग समूहाची संपत्ती शासनाकडे असल्याने शासनानेच गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे पैसे देणे,आदि मागण्याला घेऊन हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी विधानसभेवर" बांगड्या घाला मोर्चा "नेऊन जबरदस्त प्रदर्शन केले. या मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन लक्षवेधून घेतले.
मोर्चाचे नेतृत्व किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केले.मोर्चाची तीव्रता बघून पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराजे देसाई यांना याविषयाची माहिती असल्यामुळे लोकाधिकार परिषदेच्या शिष्टमंडळाला त्यांनी बोलवून घेतले व सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावण्याची मागणी करण्यात आली.अधिवेशन संपल्यानंतर लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक लावून देण्याचे आश्वासन ना.शंभुराजे देशाची यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवेदन यावेळी शंभूराजे देसाई यांच्ययाकडे देण्यात आले. यशवंत स्टेडियम वरून विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चाचे टेकडी रोड जवळ सभेत रूपांतर झाले. त्या सभेचे संचालन दुलाराम मांढरे यांनी केले व मायाताई पेंदोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या