ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सन 2015 मध्ये दिलेल्या ठाणे भुषण, ठाणे गौरव, ठाणे गुणिजन या पुरस्काराबाबतची माहिती सुभाष ठोंबरे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली असता ठामपा माहिती व जनसंपर्क विभागाचे तत्कालीन जन माहिती अधिकारी संदिप माळवी यांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे सुभाष ठोंबरे यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांचेकडे प्रथम अपील दाखल केले होते.
ठामपाने गुन्हेगार व जकात चोरांना दिलेल्या पुरस्काराची माहिती दडविण्यासाठी दि.16/02/2016 रोजीच्या प्रथम अपीलाच्या सुनावणी मध्ये सुभाष ठोंबरे यांना 1)ठामपाचे अतिरिक्त आयुक्त-1 .संदिप माळवी,2) अंगरक्षक -अप्पासाहेब कांबळे, 3) राजेंद्र गांगुर्डे, 4) सुरक्षारक्षक -विलास हसबे, 5) दिनेश भडांगे, 6) शिपाई - गौतम खरात यांनी शिवीगाळी करून जबर मारहाण करून बरगड्या फ्रॅक्चर केल्या मारहाण करताना खिशातील पैसे काढून घेतले , गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली व ठोंबरे यांना जबरदस्तीने डांबून ठेवले या सर्व प्रकारास 7) तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी मुक संमती दिली आणि बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर करून सदर घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा पुरावा नष्ट केला याबाबत सुभाष ठोंबरे यांनी नौपाडा पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि.नं. l 62/2018 भादवि कलम 392, 325, 341, 143, 147, 323, 504, 506(2), 201 प्रमाणे संदीप माळवी, अशोक रणखांब , अप्पासाहेब कांबळे, राजेंद्र गांगुर्डे, विलास हसबे, दिनेश भडांगे व गौतम खरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी मा.न्यायालयात कोर्ट केस नं. 314/2022 प्रमाणे फौजदारी खटला (चार्जशीट) दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी चालु आहे.
सदर खटल्याच्या सुनावणीस आरोपी 1) संदीप माळवी,2) अशोक रणखांब, 3)अप्पासाहेब कांबळे, 4)राजेंद्र गांगुर्डे, 5)विलास हसबे, 6)दिनेश भडांगे, 7)गौतम खरात हजर रहात नसल्यामुळे सर्व आरोपींच्या विरुध्द मा.न्यायालयाने वॉरंट काढलेले आहे.
0 टिप्पण्या