बाबासाहेबांचे वडील रामजी हे सुभेदार असल्याने इंग्रजांनी कैद्यासाठी बांधलेल्या त्या चाळीतील दोन खोल्या सुभेदारांना वापरण्यासाठी दिल्या होत्या. याच दोन खोल्यात सुभेदार रामजी यांनी आपल्या कुटुंबाचा प्रपंच थाटला होता. येथेच 1913 ला त्यांचे निधन झाले. ठिकाणाचे महत्त्व याच ठिकाणी 17 डिसेंबर 1919 ला कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी 2500 रुपयाची आर्थिक देणगी सुद्धा दिली होती.या ठिकाणी राहूनच बाबासाहेबांनी एम ए,पी एचडी, पासून तर बॅरिस्टर पर्यंतच्या सर्व पदव्या मिळवल्या. येथेच प्राध्यापकाची ड्युटी,हायकोर्टाची वकिली,यशवंत चा जन्म,राजरत्न चा जन्म व मृत्यू, माणगाव परिषद,नागपूरची बहिष्कृत परिषद,मुंबई विधिमंडळावर निवड,महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह,मनुस्मृति दहन,सायमन कमीशनवर नियुक्तीनाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, गोलमेज परिषदेचे निमंत्रण, पुणे करार, वडील, भाऊ, बहीण,मुलांचे,निधन आदि सर्व घटनांची साक्ष ही परळ ची बी आय टी चाळ आहे.
जब्बार पटेल निर्मित बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटात शाहू महाराज बाबासाहेबांच्या घरी घोडागाडीने आल्याचा प्रसंग दाखविण्यात आला आहे तो याच ठिकाणचा.यावेळी बाबासाहेब आंबेडकरां सोबत त्यांच्या जीवन संगिनी मातोश्री रमाई यांनी आपली संपूर्ण हयात बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या व संघर्षाच्या दरम्यान आपल्या परिवाराच्या पालन पोसण्यासाठी घालविली. याच ठिकाणी त्यांच्या मुलांची निधने झाली. फेब्रुवारी 1934 नंतर बाबासाहेबांनी आपला निवास दादर च्या हिंदु कॉलनीतील राजगृहात हलविला, त्यानंतर लगेच 27 मे 1935 ला रमाई चे निधन झाले.मागील काही वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा निवासस्थान समिती मुंबई -12 च्या माध्यमातून मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते शंकर लोखंडे परेल,दासरी कृष्णमूर्ती वरळी,आकीफ दफेदार,सूर्यकांत खरात,संजय पवार,अमोल निकाळजेअफरोज मलिक दरवर्षी 4 डिसेंबरला निवासस्थान परिसरात बाबासाहेबांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम घेतल्या जातो दिवसेंदिवस इथे गर्दी वाढत आहे. हल्ली या ठिकाणी बाबासाहेबांचे नातेवाईक राहतात.
मुख्यमंत्र्यांची भेट कोविड काळात 6 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन घाई गडबडीत राष्ट्रीय स्मारक घोषित केले. त्यामुळे शासकीय प्रशासकीय स्तरावर याची चर्चा अधिक होऊ लागली. मागील दोन वर्ष वर्षे covid काळात गेल्यामुळे आंबेडकरी अनुयायी मुंबईला जाण्यापासून वंचित राहिले. परंतु यावर्षी लाखोंच्या संख्येने ते मुंबईच्या चैत्यभूमीला दादरच्या राजगृहाला आंबेडकर भवनाला व प्रेरणा निवास स्थानाला भेटी देतील.
बाबासाहेबांचे प्रेरणा निवासस्थान दादर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस उजवीकडे अर्धा किलोमीटर अंतरावर गोकुलदास पास्ता रोडवर डॉ आंबेडकर भवन, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व तिथूनच डॉक्टर आंबेडकर मार्गाने पुढे वीस मिनिटे पायी गेल्यावर मडके बुवा चौकात उजवीकडे परळ चा दामोदर हॉल (जोशी विद्या संकुल) शेजारच्या विठ्ठल चव्हाण रोडवर ही बी आय टी चाळ परळ येथे आहे.येथे दरवर्षी 4 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा निवासस्थान समिती मुंबई च्या माध्यमातून मानवंदना देण्याचा कार्यक्रम नियमित असतो यावर्षी सुध्दा आहे. बहुजन चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेण्यासाठी या निवासस्थानी भेट द्यावी.
- उत्तम शेवडे (9421800219) नागपूर
- मीडिया प्रभारी महाराष्ट्र प्रदेश बसपा
0 टिप्पण्या