Top Post Ad

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अंबाझरी येथील स्मारक उध्वस्त...


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अंबाझरी येथील,20 एकरातील स्मारक उद्वस्त करून,1 एक रुपया वार्षिक भाडे तत्वावर गरुड कंपनीला देणारे, आरोपी  पर्यटन मंत्री, महाराष्ट्र शासन, आयुक्त महानगरपालिका नागपूर, तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर, तहसीलदार नागपूर, नायब तहसीलदार नागपूर, मंडळ अधिकारी नागपूर, तलाठी अंबाझरी, व गरुड कंपनी वर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्यामुळे तात्काळ FIR दाखल झाले पाहिजे. तसेच आमदार यांनी लक्षवेधी  हिवाळी अधिवेशनात लावून, दोषींवर कारवाई करण्याची गरज असून  नागपूर येथील वकील मंडळी यांनी, तात्काळ जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूर येथील,अंबाझरी येथील  20 एकरातील स्मारक वरील आरोपी यांनी कटकारस्थान करून,संगणमत करून पाडले, त्याबाबत 20/12/2022 रोजी,आंबेडकरी जनतेचा भव्य मोर्चा विधानसभेवर निघाला. यामध्ये मा. सनदी अधिकारी किशोर गजभिये, आमदार नाना पटोले, आमदार अमोल मिटकरी, मा. आमदार जोगेंद्र कवाडे,आणि ईतर मान्यवर उपस्थित होते. याबाबत जेव्हा संपूर्ण मोर्चा व भाषणे लाईव्ह लाँड बुद्धा टि.वी.वर प्रसारित करण्यात आले, 

याबाबत वस्तुस्थिती जानुन घेतली तेव्हा वरील सर्व आरोपी दोषी दस्तऐवज पुराव्यासह आडळुन आली.म्हणून फौजदारी गुन्हास पात्र आहेत. ज्याअर्थी नागपूर शहरातील,महानगरपालिका हद्दीतील,मौजा अंबाझरी 943068 ULPIN 24147659190 तालुका नागपूर,शहर जिल्हा नागपूर स.न.1/1/1 आराजी 17-81 हे.आर.अर्थात 42-42 एकर जमीन नझुल सरकारच्या मालकीची होती. त्यापैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी,महानगरपालिका नागपूर यांनी 1956 मध्येच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी,दिनांक 14/आक्टोंबर/1956 ला धम्मदीक्षा  नागपूर घेऊन नागपूर शहराचे नाव संपूर्ण देश विदेशात अजरामर केले म्हणून नागपूर महानगरपालिकाने अंबाझरी येथील स.न.1/1/1/हे.आर 17-81अर्थात 42-42 एकर पैकी,20 एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दिली. व स्मारकही बांधून दिले,व उर्वरित तलाव आहे. मात्र यांची नोंद 1956 पासून 2022 पर्यतचा 7/12 नाही. वास्तविक हे काम तलाठी पासून महसूल अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे होते व आहे.त्यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि (नोंदवही तयार करणे,व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 यातील नियम 29 नुसार 7/12 वर नोंद घेने हे महसूल कर्मचारी/अधिकारी यांंचे काम होते.मात्र त्यांनी मागील 60 वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मौजा अंबाझरी येथील स.न.1/1/1 मध्ये नोंदच जानीवपुर्वक केली नाही. आणि जिल्हाधिकारी नागपूर,व इतर अधिकारी,चौकशी न करताच पर्यटन मंडळाच्या घशात घातली. हे वास्तव आहे. महाराष्ट्र पर्यटन विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 20/9/2017 आदेश पारीत करून ती संपूर्ण 42-42 एकर जागा 1एक रुपया वार्षिक लिजवर 30 वर्षासाठी आदेश पारीत केली. 

तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर यांनी,वस्तुस्थिती शहानिशा न करता,पर्यटन मंत्री यांचा आदेश क्र.प.का./नझुल,महाराष्ट्र पर्यटन विकास मंहामडळ,मर्यादित मोजनी अंती 17,1,662-698 चौ.मी.अर्थात 42-42 एकर जागा करन्यास  तलाठी आंबाझरी यांना दिले. दिनांक 7/2/2020 रोजी फेरफार क्रमांक 2556 नुसार तलाठी आंबाझरी यांनी ईतर अधिकारात मा.जिल्हाधिकारी नागपूर यांचा संदर्भ टाकून,मा.प.वि.म.मं.या नावानी  नोंदणी केली. ईतपर्यत 7/12 पुरावा आहे.

त्यानंतर मा.प.वि.म.मं.यांनी गरुड या खाजगी कंपनीला बेकायदेशीर 99 वर्षासाठी दिले,त्या कंपनीने त्या 20 एकर जागेमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 50ते 60 वर्षाचे स्मारक बुलडोझर लावून उद्वस्त केले आहे. दिनांक 20/12/2022 रोजी भव्य आक्रोश मोर्चा आंबेडकरी समाजाचा विधानसभेवर निघाला. या मध्ये जे सरकार,व अधिकारी दोषी आहेत,त्यांचावर तात्काळ FIR दाखल करावे.  तसेच तात्काळ जनहित याचिका दाखल करून,गरुड कंपनीचे काम बंद करून,त्या जागेतून बाहेर काढावे.

आणि महाराष्ट्र शासनाने त्या जागेवर भव्य आणि दिव्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक नवीन तयार करून,मालकी हक्काने 7/12 करुन द्यावे. 

वरोरा शहरात,सरकारी जागा स.न.12/1 हे.आर.16-96 अर्थात 40 एकर पैकी, बौद्ध समाज बांधव बुद्ध भुमी म्हणून 5 एकर जागेवर अनेक वर्षांपासून,बहुउद्देशिय पंचशील मंडळ वरोरा,कार्तिक पोर्णिमेला कार्यक्रम घेत होते, मात्र  7/12 नावाने एक अक्षर सुद्धा कुठच नव्हते. मंडळाने समाजाकडून एक एक रूपया गोळा करून,सिमेंटचे पोल वालकंपाऊड करुन गाडले,मात्र वरोरा नगरपालिका यांनी फेकून तोडून टाकले होते.कारण 7/12 वर मंडळाचे नावच नव्हते.  जेव्हा मी तलाठी म्हणून 2002 मध्ये वरोरा शहरात आलो, सर्व जमीनीचा सर्वे केलो, आणि जे मला शेतात किंवा सरकारी जमीनीवर दिसले ते तलाठी यांचे अधिकार व कर्तव्य म्हणून लिहिले.

वरोरा येथील सरकारी जमीन स.न.12/1 मध्ये सुध्दा 2002 मध्ये बहुउद्देशिय पंचशील मंडळ वरोरा यांचा पंचशील झेंडा,कायमचे स्टेज आहे, बुद्ध विहार आहे,अशी नोंद 7/12 मध्ये जमीन करना-या कालम मध्ये पेनीने घेतली. आजही ती नोंद जशीचा तशीच कायम आहे.
माझ्या नावाने,तत्कालीन SDM ने कारवाई केली, पण मी अपर मुख्य सचिव,व तत्कालीन मुख्यमंत्री  चव्हाण साहेब यांना मुंबईला मंत्रालयात समजून सांगितले व त्यांनी मान्य केले.निलंबनाची कारवाई खारिज केली.

आज नगरपालिका वरोरा यांनी करोडो रुपये त्याच जागेवर मंजूर करून त्या ठिकाणी वालकंपाऊड झाले आहे,व भविष्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सुध्दा होनार आहे. या कामासाठी समाजातील एकाही व्यक्तीने,किंवा बहुउद्देशिय पंचशील मंडळाने पाठपुरावा मला केला नाही.ही शोकांतिका आहे. तरी मात्र  तलाठी म्हणून ,मी माझे अधिकार व कर्तव्य होते.ते मी पार पाडले. नागपूर येथील अंबाझरीचा तलाठी कडे समाज बांधव जाऊन स.न.1/1/1 वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन म्हणून 20 एकर जागेची नोंद 7/12 घेतली नाही. व तलाठी यांनी सुद्धा स्वतः सर्वे करून नोंद केली नाही. 

वस्तुस्थिती शाहनीशा न करता अंबाझरी येथील 20 एकर मध्ये असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक शासन,व अधिकारी,यांनी संगणमत, कटकारस्थान, करुन पाडल्यामुळे बौद्ध समाज बांधवांनी तात्काळ याची दखल घेऊन कायदेशीर कारवाईसाठी सज्ज व्हावे ही विनंती


विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर
मो.9850382426




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com