Top Post Ad

" मी स्वतःला विकण्यासाठी जन्माला आलेलो नाही. "- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


एकदा प्रसिद्ध उद्योगपती जी. डी. बिर्ला यांचे मोठे बंधू जुगलकिशोर बिर्ला ३१ मार्च १९५० रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याना भेटण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी आले होते. काही दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेबानी मद्रास येथे गैर ब्राम्हणांच्या एका जाहीर सभेत प्रचंड जनसमुदायापुढे भाषण करताना भगवत गीतेवर जोरदार टीका केली होती. पेरियार इ. वी. रामास्वामी हे या सभेचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब व पेरियार इ. वी. रामास्वामी यानी भगवत गीतेवर केलेली टीका देशातील सर्वच प्रमुख वर्तमानपत्रानी छापली होती. त्याच अनुषंगाने जुगलकिशोर बिर्ला डॉ. बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते.

 डॉ. बाबासाहेबानी त्यांचे स्वागत केले. जुगलकिशोर बिर्ला डॉ. बाबासाहेबाना म्हणाले, " भगवतगीता हा हिंदूचा पवित्र धर्मग्रंथ आहे. तुम्ही अलीकडेच या हिंदुना पूजनीय असलेल्या ग्रंथावर जी टीका केली आहे त्यामुळे समस्त हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तुम्ही त्यावर पुनर्विचार करावा. मी आपणास अस्पृश्यता निर्मुलन कार्यासाठी दहा लाख रूपयाची ( ₹ १०,००,०००/- ) मदत करायला तयार आहे. अट एकच आपण भगवत गीतेवर केलेली टीका मागे घ्यावी."

 जुगलकिशोर बिर्ला यांचे म्हणणे डॉ. बाबासाहेबांनी शांतपणे ऐकून घेतले. नंतर एक स्मितहास्य करीत ते जुगलकिशोर याना म्हणाले, " भगवतगीता हा हिंदूचा धार्मिक ग्रंथ नाही तर ते राजकारणावरील एक पुस्तक आहे. यात जाति- वर्णव्यवस्था याशिवाय कोणताही उपदेश केलेला नाही. हे पुस्तक लिहिण्यामागील उद्देश म्हणजे पुजारी वर्गाला दरबारात अधिकार प्रदान करणे होय. जोवर हे राजकारण या विषयावरील हे पुस्तक वाचले जाईल, त्याची महती गाईली जाईल तोवर हिंदु धर्मात समानता स्थापन होऊ शकत नाही. 

भगवतगीता या पुस्तकातील सांख्य, कर्म व ज्ञान यांचे अर्थ पथभ्रष्टता दर्शक आहेत. गीतेतील कर्म सिध्दांत हा देशहिताच्या दृष्टीने धोकादायक आहे. या पुस्तकात नवीन असे काहीच नाही. यात अध्यात्माचा उपदेश केलेला नाही तर एका मोठ्या जनसमुदायाला अज्ञानी व गुलाम ठेवण्याचे राजकारण यात आहे. यात अनुयायांना असा उपदेश केलेला आहे की समरसतेशी संबंधित अज्ञानी लोकांच्या बुध्दीला अस्थिर ठेवू नका. भगवतगीतेनुसार वर्ग ( वर्ण ) दुसरे काही नसून केवळ ' जात ' आहे."

 बिर्ला यानी देऊ केलेल्या दहा लाख रुपयाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, " मी स्वतःला विकण्यासाठी जन्माला आलेलो नाही. " मी भगवतगीतेवर टीका केली त्याचे कारण हा ग्रंथ समाजाला चुकीचा संदेश देत आला आहे. यातील सर्व अध्याय तिरस्कार व घृणेने भरलेले आहेत. कृष्णाने अध्याय ९.३२ मध्ये असे म्हटले आहे की, "मनुष्याला त्याचा व्यवसाय हा त्याने मागील जन्मी केलेल्या पापमय कृत्याच्या फलस्वरूप मिळतो."

जुगलकिशोर बिर्ला यानी याविषयी आपणास काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यावर बाबासाहेबानी त्यांना गीतेतील अनेक श्लोक हे अर्थासह स्पष्ट करून सांगितले, हा ग्रंथ धार्मिक नसून राजकीय आहे, त्यातील विचार हे सामाजिक समता व सामाजिक न्यायाच्या विरूद्ध आहेत हे ही तपशिलासह स्पष्ट करून सांगितले. डॉ. बाबासाहेबांचे गीतेवरील भाष्य ऐकून जुगलकिशोर बिर्ला अवाक झाले. शेवटी डॉ. बाबासाहेब म्हणाले, " आजपर्यंत मला कुणीही विकत घेऊ शकलेले नाही आणि माझ्या हिंदुधर्माबद्दल असलेल्या दृष्टिकोणात कधीही बदल होणार नाही."

 डॉ. बाबासाहेबांची विद्वत्ता पाहून जुगलकिशोर बिर्ला थक्क झाले. देशाला लोकशाही प्रजासत्ताक संविधान प्रदान केल्याबद्दल त्यानी डॉ. बाबासाहेबांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली व ते बाहेर पडले.


  • संदर्भ : बाबासाहेब डाॅ.आंबेडकर...कुछ स्मृतियां, कुछ अनुभव
  • लेखक : शंकरानंद शास्त्री.
  • टीप : मूळ पुस्तक हिंदीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com