Top Post Ad

आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्राला संजीवनी


समाजाचे वर्तमानपत्र म्हणून समाजाकडून आर्थिक मदत घेऊन नंतर समाजालाच ठेंगा दाखवणाऱ्या मुजोर संपादकाविरोधात जाऊन स्वत:चं दैनिक वर्तमानपत्र सुरु करणारे.... खरं तर सम्राट पब्लिकेशन प्रा.लि.च्या माध्यमातून  हे वर्तमानपत्र समाजाच्या मालकीचं करण्याचं आश्वासन अनेक वेळा देऊनही अखेरपर्यंत वर्तमानपत्रावर स्वत:चीच मालकी ठेवली. परंतु त्याला चालवण्यासाठी अनेक अधिकारी वर्गांकडून प्रचंड निधी जमा केला. मात्र हा अधिकारी वर्ग जेव्हा वर्तमानपत्र कंपनीच्या नावावर व्हावे म्हणून आग्रही भूमिका घेऊ लागला. तेव्हा या मुजोर संपादकाने भायखळा येथून रात्रीत पळ काढला. 

 तेव्हा न डगमगता पुढाकार घेऊन शाम वेणेगावकरांनी कंपनीच्या सर्व मातब्बर मंडळींना विश्वासात घेऊन नविन वर्तमानपत्र सुरु केले. काही काळ शासन सम्राट म्हणून दुसऱ्या एका संपादकाचे वर्तमानपत्र कंपनीच्या माध्यमातून सुरु ठेवले. त्यानंतर स्वत:च विश्वसम्राट नावाचे वर्तमानपत्र रजिस्टर करून कंपनीच्या माध्यमातून चालवले. या कामी पुढाकार घेणारे आणि प्रसंगी भक्कमपणे उभे राहणारे शाम वेणेगावकर यांचे मुंबईत निधन झाले. विक्रोळी येथील आंबेडकर भवन मध्ये त्यांच्या श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम संपन्न झाला.   मा. खासदार भालचंद्र मुणगेकर, छनक शिर्के,  मुख्यमंत्रीचे संपादक राजाराम मस्के, पत्रकार महादू पवार, सुबोध शाक्यरत्न, नागेश मून आदीसह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. 

 विश्व सम्राट संपादक व युवा नेते नितीन मोरे यांनी आंबेडकरी चळवळीत वृत्तपत्राची कशी क्रांती झाली तसेच विश्व सम्राट या वृत्तपत्राला कसे मान्यता मिळवून दिले, त्याची खोलवर माहिती उपस्थितांना करून दिली, त्यानी वेणेगावकर यांच्या चळवळीतल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आंबेडकरी चळवळीतल्या अलीकडच्या काळामध्ये विश्व सम्राट या वृत्तपत्राने एक क्रांती घडवली होती. चळवळीतील बातम्या लेख तसेच प्रबोधनपर माहिती देण्यासाठी विश्व सम्राट या दैनिकाने मोलाची कामगिरी केली आहे. सुरुवातीला या दैनिकाचा प्रचंड खप होता. अगदी एक सक्षम पर्याय म्हणून हे दैनिक उभे राहिले होते. या दैनिकाला संजीवनी देण्याचं काम शाम वेणेगावकर यांनी केले ,असे प्रतिपादन  नितीन मोरे यांनी केले.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com