भारतीयांना एकतेच्या सूत्रात कोणती संस्था बांधताहे ?


    शेजारी शेजारी देशांत सीमावाद, दहशतवाद, वर्ण, जात, धर्म, भाषा, संस्कृती यावरून वाद उफाळून जगात अराजकता व अशांती बळावू नये. प्रत्येक देश यथोचित प्रगती पथावर अग्रेसर रहावा. कोणीही कोणाचे हेवेदावे न करता प्रेम, बंधुभाव वृद्धिंगत व्हावे, म्हणून दरवर्षी २० डिसेंबर हा जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधतेतील एकतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा केला जावू लागला. 

    मानव एकता म्हणजे मानवी ऐक्य अर्थात माणसांमाणसात एकजुट असणे होय. लोकांना एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या समाजात एकता आणि बांधीलकीची मानसिक भावना निर्माण करणार्‍या सामायिक हितसंबंधांची व उद्देशांची जाणीव म्हणून एकता परिभाषित केली जाते. यूएन- राष्ट्र संघ संस्था म्हणते की एकता ही संकल्पना नेहमीच संस्थेचा एक परिभाषित भाग आहे. युनायटेड नेशन्सच्या मते, “संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीमुळे शांतता, मानवी हक्क, सामाजिक व आर्थिक विकास यांना चालना देण्यासाठी जगातील लोक आणि राष्ट्रे एकत्र आकर्षित झाली. संघटनेची स्थापना तिच्या सदस्यांमधील ऐक्य आणि सुसंवादाच्या मूलभूत तत्त्वावर करण्यात आली, जी सामूहिक सुरक्षिततेच्या संकल्पनेतून व्यक्त केली गेली. ती आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सदस्यांच्या एकतेवर अवलंबून आहे. यापूर्वीच आध्यात्मिक विचारधारा प्रवाहित करणारे संत निरंकारी मिशनचे मानव एकता, विश्वशांती, विश्वबंधुत्व हे उपक्रम यशस्वीरित्या राबविले व अजूनही राबवतच आहे. 

मिशनचे युगदृष्टा सद्गुरू संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराजांनी विश्वबंधुत्वासाठी मानवामानवात ऐक्य निर्माण व्हावे, यासाठी समजावितात- 

    "मानव के कर्मों से धरती बसती और उजड़ती हैं|
     मानव के कर्मों से दुनिया बनती और बिगड़ती हैं|
     समदृष्टि समभाव से जीना सबको जब आ जायेगा|
     प्यार ही बरसेगा हर सू फिर वैर नज़र न आयेगा|
      सन्तमति को धारण करके सुन्दर हम व्यवहार करें|
      कहे 'हरदेव' मिलवर्तन से सुखमय कुल संसार करें|"
(सम्पूर्ण हरदेव बाणी: पद - २३५: ओळ क्र.१, २, ७, ८, ९ व १०)

     आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस हा शाश्वत विकास अजेंडावर आधारित आहे, जो स्वतःच लोकांना गरीबी, भूक आणि रोग यासारख्या दुर्बल पैलूंमधून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करतो. मिलेनियम डिक्लेरेशनच्या अनुषंगाने एकवीसव्या शतकातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे एक मूलभूत मूल्य म्हणून एकता ओळखली जाते; ज्याच्या अंतर्गत ज्यांना कमीत कमी आणि ज्यांना सर्वात जास्त फायदा होतो, त्यांना मदतही होते. विज्ञानाच्या बळावर मानवाने अगणित प्रगती साधली आहे. सुखचैनीच्या वस्तू, यंत्रे, अवजारे तयार केलेल्या आहेत. काबाडकष्ट, शारीरिक श्रम करणे कमी झाले आहे. चंद्र व मंगळावर स्वारी करून तेथील वातावरणाचा शोध घेतला व तेथे तो आपले वास्तव्य- संसार थाटण्याच्या बेतात आहे. तरीही तो अशांत व बेचैन आहे. त्यासाठी त्यावर उतारा सांगतात, तो म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाचा! 

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात-
     "शांती सुखाचे मारग बरवे!       आपण तरोनि दुजा तारावे!!
     तोडिल पाश यमाचा, यमाचा!    भक्ती विन उद्धार नाही कुणाचा!!"
     आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाचे महत्त्व असे- विविधतेत एकता दाखवण्यासाठी

विविध सरकारांना आंतरराष्ट्रीय करारांची आठवण करून देणे, लोकांना एकतेचे महत्त्व पटवून देणे, शाश्वत विकासासाठी लोकांना व सरकारांना प्रेरित करणे, गरिबी निर्मूलनासाठी नवीन मार्ग शोधणे, लोकांना गरिबी, भूक, रोग यांसारख्या समस्यांमधून बाहेर काढणे. हे जरी खरे असले, तरी मानवाने तयार केलेल्या विनाशकारी शस्त्रास्त्रे, शक्तीशाली बॉम्ब, आधुनिक औजारे यांचा दुरुपयोग करून तो इतर देशासह स्वतःचाही आत्मघात करू शकतो. जगाला पुनःश्च महायुद्धाच्या खाईत ढकलू शकतो. यांवर प्रतिबंध यावा, हाही उद्देश आहे. 

संत निरंकारी मिशनचे महान ग्रंथकार संतश्रेष्ठ शहंशाह अवतारसिंहजी महाराज विश्व मानव एकतेची गरज विषद करताना सांगतात-
   "अज साइंस ते साइंसदारानां बड़े बड़े बणाये बम्ब|
    इक्को बम्ब नाल दुनियां मर जाये ऐसे ऐसे आये बम्ब|
    मुरदे नूं जो जिन्दगी बख्शे मुरशद बणाई ए|
    कहे अवतार मैं मरदे मरदे इस तों जिन्दगी पाई ए|"
(सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र. ३४०: ओळ क्र.१, २, ५, व ६)

     दरवर्षी हा दिवस देशांदेशात आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस  साजरा करतात. असा जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश्य असा, की लोकांच्या विविधतेमधील एकतेचे महत्त्व स्पष्ट करत जागरूकता पसरविणे होय. हेल्प फॉर ह्यूमेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेने भारतीयांनाही एकतेच्या सूत्रात बांधण्यास पुढाकार घेतला आहे. दि.२२डिसेंबर २००५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने मानव एकता संदर्भात एक निर्णय घेत दरवर्षी २० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस घोषित करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २००२मध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी युएनडीपीचा जागतिक एकता कोष स्थापन करण्यात आला आहे. नवीन शाश्वत विकास उद्दीष्टे- एसडीजी पूर्णपणे लोक आणि ग्रहावर केंद्रित आहे, ज्यात मानवाधिकारांना पाठबळ दिले जात आहे. हे शक्य होण्यास संतश्रेष्ठ हरदेवसिंहजी महाराज बजावतात-

    "मानवास मानव प्रिय असावा!

     एकमेकांचा आधार बनावा!!" दारिद्र्य, उपासमार आणि रोगराई यामधून लोकांना बाहेर काढण्याच्या निर्धारासाठी वैश्विक भागीदारीने समर्थित आहे. त्यादृष्टीने जागतिक सहकार्य आणि एकात्मतेची पायाभरणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगभरात आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा करतात.

!! जागतिक मानव एकता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

 

  • अलककार- कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
  • रामनगर, गडचिरोली. मधुभाष- ७७७५०४१०८६.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1