Top Post Ad

चैत्यभूमीवरील सुविधांचा भीम आर्मीने घेतला आढावा....


 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त देशातून अनुयायी चैत्याभूमिला येत असतात याही वर्षी 1 तारखे पासुनच अनुयायी शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत. परंतु आम्ही पाहणी केली असता फक्त 270 टॉयलेटच शिवाजी पार्क मध्ये आहेत, त्या टॉयलेट मध्ये 1 तारखेपासुन पाणीच नाही. विशेष म्हणजे महिलांची गैरसोय होत आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर आज चैत्यभूमी शिवाजी पार्क वर आले असता त्यांनी अनुयायी यांची भेट घेतली नाही त्यांनी जबरदस्तीने फक्त 10 अनुयायी यांना ब्लॅंकेट वाटप केले आणि मीडियाला बाईट देऊन निघून गेले आम्ही दीपक केसरकर यांना सांगितले की साहेब हजारोच्या संख्येने अनुयायी शिवाजी पार्क मध्ये 1 तारखे पासुन दाखल झाले आहेत त्यांना टॉयलेटला पाणी नाही, जेवन नाही त्याची सोय करावी तसेंच अनेक वर्षापासुन दादर रेल्वे स्टेशनला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करत आहोत, प्रत्येक वर्षी 6 डिसेंबरला महपरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रात शासकीय तसेंच खाजगी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी परंतु त्यांनी काहीही प्रतिसाथ दिला नाही अश्या पालक मंत्री आणि महानगर पालिका यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.याबाबत लवकरात लवकरच अनुयायी सोय करावी अन्यथा अनुयायी यांचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नसल्याचे मत भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणा-या अनुयायांसाठी मुंबई महापालिका विविध सुविधा पुरवण्यासाठी सज्ज झाली आहे. चैत्‍यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा आदी सोयी-सुविधा असतील. चैत्यभूमीवरील अभिवादन मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्‍यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देशाच्या कानाकोप-यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सोयी - सुविधेसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असते. येथे येणा-या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी शिवाजी पार्क येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवा-याची सोय म्‍हणून सदर परिसरातील महानगरपालिकेच्‍या ६ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या आहेत. 

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्‍यभूमी येथे करण्‍यात येते. यावर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सोमवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी होणार आहे. महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये 
 चैत्‍यभूमी येथे शामियाना व व्‍ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्‍यवस्‍था.
- चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा.
- १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा.
- छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व परिसरात पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.
- रांगेत असणा-या अनुयायांसाठी पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.
- पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था.
- पिण्‍याचे पाणी असणा-या टँकर्संचीही व्यवस्था.
- संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था.
- अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा.
- चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था.
- विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्‍टॉल्‍स्ची रचना.
- दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि चैत्‍यभूमी, शिवाजी पार्कजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष.
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
- स्‍काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवासाची व्‍यवस्‍था.
- मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्‍यवस्‍था.
- अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी परिसर येथे निदर्शक फुग्‍याची व्‍यवस्‍था.
- भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्‍यवस्‍था.
- तात्‍पुरत्‍या निवा-यांसह पुरेशा संख्येने फि‍रती शौचालये.
- स्‍नानगृहे व पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

तसेच  महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई परिसरातील व बाहेर गावावरून येणा-या अनुयायांसाठी ५ ते ७ डिसेंबर पर्यंत चैत्यभूमी फेरी ही विशेष बससेवा बेस्टच्या वतीनेे केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मंडप व उभारण्यात आलेल्या तंबूना वीज पुरवठा, दिव्यांच्या देखभालीसाठी एरियल लिफ्ट व वॉकीटॉकीने सुसज्ज असलेली पथके तैनात करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.  मुंबई परिसरातून तसेच बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते शिवाजीपार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता चैत्यभूमी फेरी या नावाने अतिरिक्त बसफे-या चालवल्या जाणार आहेत. तसेच बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातर्फे विविध ठिकाणी मार्गप्रकाश दिवे बसवण्यात येणार आहेत. चैत्यभूमी ते शिवाजीपार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज, दादासाहेब फाळके रोड व मादाम कामा रोड आदी ठिकाणी १५० वॅटचे ३५५ व २ केव्हीचे ४ अतिरिक्त दिवे बसविले जाणार आहेत. अखंडीत वीज पुरवठा ठेवण्याकरीता बेस्टकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

दादर स्थानकावरून चैत्यभूमीफेरी 
मुंबई परिसरातून तसेच बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते शिवाजीपार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता चैत्यभूमी फेरी या नावाने अतिरिक्त बसफे-या चालवल्या जाणार आहेत. ५ डिसेंबर दुपारी ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तीन बसेस तर ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ रात्री १० वाजेपर्यंत तसेच ७ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तीन बसेस चालवण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त सोमवारी, ५ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते मध्यरात्रीपर्यंत बसक्रमांक २००, २४१, ३५१ व ३५४ वर १० बसगाड्या चालवण्यात येतील. तर ६ डिसेंबर रोजी बसक्रमांक ४४०, सी-३३, १६४, २४१, सी ३०५, ३५१, ३५४, अे- ३८५ आणि सी ५२१ या बसमार्गावर एकूण ३५ जादा बसगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

– चैत्यभूमी, शिवाजीपार्क, दादर चौपाटी, राजगृह आंबेडकर कॉलेज, दादासाहेब फाळके रोड व मादाम कामा रोड आदी ठिकाणी अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे. – वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी ६२.५ के. व्हि ए क्षमतेचे जनरेटर्स – दादर चौपाटी, महापौर निवास व ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी ६ किलो वॅट क्षमतेच्या सर्च लाईट्स विशेष मनो-यावर बसवले जाणार – दिव्यांच्या देखभालीसाठी एरियल लिफ्ट व वॉकी टॉकीने सुसज्ज असलेली पक्षके तैनात  वीज पुरवठ्यासाठी राखीव पक्षकाची नेमणूक अशी चोख व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com