२ डिसेंबर ते ३ डिसेंबर १९८४ रोजी इतिहासात घडलेली सर्वात मोठी दुर्घटना घडली.ज्या दुर्घटनेचे परिणाम आजही भोपाळ येथील नागरिक भोगत आहेत.भोपाळ वायु दुर्घटना ही उद्योगजगतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना गणली जाते.२ डिसेंबर १९८४ रोजी भोपळमध्ये युनियन कार्बाईड कंपनीमधून मिथाईल आयसो सायनेट या वायूची गळती झाली होती.या दिवसाची आठवण म्हणून यादिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून पाळला जातो.२ डिसेंबर १९८४ च्या रात्री भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेची आठवण, विशेषतः औद्योगिक क्षेत्राला राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, म्हणून हा दिवस भारतात पाळला जातो.या वायुगळतीमुळे अगणित लोकांचा मृत्यू झाला.त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस देशभर साजरा केला जातो.प्रदूषण ही समस्या केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगाला प्रदूषणाने वेढले आहे.
भारतात भोपाळ येथे जगातील सर्वात मोठी वायु गळती झाली.त्यामुळे अनेक नागरिक दगावले.असंख्य जखमी झाले.प्रदूषण म्हणजे निसर्गातील हवा, पाणी यामध्ये वातावरणांत अशुद्ध होते. ज्याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतो. मध्यप्रदेशातील भोपाळ येथील वायु गळतीचे दुष्परिणाम तेवढ्यातच थांबले नाहीत. तर त्या परिसरातील वातावरण अनेक वर्षे प्रदूषित होते व आजही थोडा- बहुत त्याचा परिणाम दिसून येतो. गेल्या अनेक वर्षांपासून जन्माला येणारे अपत्य शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात अपंगत्व असलेले जन्म घेते. त्यामुळे हा वायु किती जहरी असेल याची कल्पना येते.
प्रदुषित वातावरणामुळे सतत काही तरी आजार येथील नागरिकांना होत असे.मानवाची शरीर प्रकृती व्यवस्थित असेल तर तो इतर कामे अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो.त्यामुळे हवा, पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.वातावरणातील प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा आजार, श्वास घेण्यात त्रास,डोळ्यांचे आजार आणि या सर्वांचा परिणाम मेंदूवर होतो.त्यामुळे पर्यावरण प्रदुषित होण्यापासून संरक्षण करणे काळाची गरज आहे.नद्या,वन प्रदेश यांचा भूभाग दिवसेंदिवस कमी होत आहे.याला सर्वस्वी मानवजात जबाबदार आहे.मानवाचे वागणे फक्त निसर्गाकडून ओरबाडून घेणं असेल तर निसर्ग मानवावर कोपल्याशिवाय राहणार नाही.प्रदूषण नियंत्रण हा विषय केवळ केवळ एक व्यक्ती किंवा राष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून जागतिक पातळीवर याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे.
मात्र, जागतिक पातळीवर विकसित देशांनी याकडे सपशेल डोळेझाक केली असल्याचे दिसते.कारण, जागतिक पर्यावरण परिषदेत भारतासारख्या राष्ट्राने हा विषय चर्चिला होता.त्यामुळे विकसित देशांनी अविकसित राष्ट्रांना विकासासाठी पर्यावरणीय मदत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विकसनशील राष्ट्रांनी एकत्रित येणे आवश्यक आहे.औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी करोडोंचा निधी असतो पण, प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी हात आखडता घेतला जातो.परंतू,थोड्या निष्काळजीपणामुळे प्रदूषण नियंत्रण ठेवण्याकडे पाठ फिरवली जाते.सर्वात जास्त प्रदूषण हे औद्योगिकीकरणामुळे होते यात दूमत नाही.हवा, पाणी, जमीन यांचे प्रदूषण उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात होते.परंतू, औद्योगिक क्षेत्रात झाडं लावली तर हवा स्वच्छ राहील ज्यामुळे कामगारांची क्रय शक्ती वाढेल. औद्योगिक प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना किंवा नियम केले जात असले तरी, औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण दिसते.राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा प्रदूषणावर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या तर मिळविता येईल. मानवाने विकास साधला पाहिजे किंबहुना परिवर्तन हे नैसर्गिक आहे.मानव हा निसर्गाचा अंश आहे.त्यामुळे पर्यावरणापासून तो वेगळा होऊ शकत नाही.पण, काही चैनीच्या बाबींसाठी निसर्गाशी दोन हात करत असेल तर आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत आहोत. याची जाणीव असावी.त्यामुळे औद्योगिक प्रदूषण हे सर्वात घातक असल्याने त्यावर नियंत्रण मिळवले तर टिकू.कारण,
मध्य प्रदेशातील भोपाळ येथील औद्योगिक दुर्घटना ही डोळ्यात अंजन घालणारी आहे.याचे परिणाम अजूनही आहेत.तेथील परिसरातील जमीन अजूनही पिकत नाही.त्यामुळे औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण आवश्यक आहे. कारखान्यांमधून, कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसारखे विषारी पदार्थ आणि वायू वातावरणात जाळून बाहेर टाकले जातात. कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन सूर्यापासून किरणे शोषून घेतात आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम ग्रहाच्या तापमानावर होतो.यामुळे जागतिक तापमानवाढ होण्यास मदत होत आहे.ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढणे, पृथ्वीच्या तापमानात वाढ, विविध प्राणी प्रजाती नष्ट होण्याचा धोका, त्सुनामी, चक्रीवादळ, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ आणि बर्फाच्या टोप्या वितळणे.याचा परिणाम मानवावर होतो. कारखान्यातील प्रदूषणाचा केवळ आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो.त्यामुळे औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी औद्योगिक घराण्यांनी आणि सरकारांनी पुढे आले तर शक्य आहे. कारण, देशातील दिल्ली असेल किंवा अन्य महानगरे असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे.
- पदमाकर उखळीकर ,
९९७५१८८९१२.
0 टिप्पण्या