Top Post Ad

... तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही - उद्धव ठाकरे



 सध्या देशातील वातावरण बरेच बदलले आहे. सध्याचा वाद हा धर्मातील असून हा धर्म म्हणजे एक आहे तो म्हणजे संत परंपरा आणि दुसरा म्हणजे वैदिक धर्म यातील आहे. संत परंपरेत लोकशाही आहे तर वैदिक धर्मात हुकुमशाही आहे. एकाबाजूला विधवांचे मुंडन आहे तर दुसऱ्या बाजूला विधवांचा पुर्नविवाह आहे. त्यामुळे सध्या सुरु आहे ते या पध्दतीने सुरु आहे. संतपरंपरेत लोकशाही असल्याने ती सर्वसमावेशक आहे. मात्र वैदिक परंपरेत तसे नाही. त्यामुळे आपल्याला निवडावे लागेल की आपणाला मतदार म्हणून लोकशाही हवी की हुकूमशाही हवी अशी विचारणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच या दोन्ही धर्मातीत असलेली जी काही व्यवस्था आहे ती इन्बिल्ड असून ती व्यवस्थाच त्या त्या गोष्टींचे रक्षण करत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, मी आणि प्रकाशजी आम्ही बोलत नाही असे नाही. आम्ही बोलत असतो अधून मधून भेटतही असतो. मात्र त्यांना भेटायचं म्हणलं की पुरेसा वेळ लागतो. त्यांना भेटलं की माहिती आणि ज्ञानाच्या खजिन्याचं दार उघडं होतं.  आज मंचावर पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलोय असे सांगायला विसरले नाहीत. देशात दडपशाहीचे वातावरण वाढले असताना आपण लोकांना जागृत करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही , असे परखड मत व्यक्त करून एकत्र येण्याचे आवाहन ठाकरे यांनी अॅड. आंबेडकर यांना केले. “आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रकाशजी, आपल्याला हे काम करावंच लागेल. नुसतं लोकांना जागं करुन उपयोग नाही. आपण जर काही करणार नसू तर लोकं झोपली तर झोपू द्या, त्यांचा निद्रानाश तरी नको करुयात. जागं करुन सोडणार असू मग ते न केलेलं बरं,  पण आपण ते करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी केले.


‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचा लोकार्पण समारंभ आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात  पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले होते.  त्यावेळी दोन्ही नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

आपल्या भाषणात अॅ़ड. आंबेडकर पुढे म्हणाले,  सध्याचा वाद हा दोन धर्मातील नाही. अनेक म्हणतात मुस्लिम धर्मामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही आहे. जशी ती मुस्लिम धर्मात आहे तशी ती वैदिक धर्मातही आहे. मात्र वैदिक धर्मापासून वेगळा असलेल्या संत पंरपरेत मात्र हुकूमशाही नाही. देशात लोकशाही आहे. मात्र आता ती हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आता सारे प्रयत्न होताना दिसत असल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. आज दोघेही आम्ही एकाच मंचावर असलो तरी राजकिय भूमिका काय घ्यायची आहे ती घेऊ. पण इथून पुढील काळात फक्त राजकिय पक्षांनी भूमिका घेऊन नाही भागणार तर मतदार म्हणून तुम्हाला आणि सर्वांनाच ठरवावे लागेल की, आपल्याला हुकूमशाही हवी आहे की लोकशाही. लोकशाही जर स्विकारली तर हा जो आपला समाज आहे त्या समाजातील छोट्या छोट्या घटकांना सत्तेत सहभाग नोंदविता येईल आणि तो सत्ता उपभोगेल असे मतही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून आम्ही अध्यक्षीय राजवट आणू म्हणून काहीजण बोलत आहेत. मात्र अध्यक्षीय राजवटीच्या माध्यमातून एकप्रकारची हुकूमशाहीच ते आणू पहात आहेत. मात्र अध्यक्षीय राजवट आणून हा जो समाज आहे ज्या समाजात छोटे छोटे घटक आहे ते सत्तेच्या लाभापासून वंचित राहतील आणि त्याचा फटका आपणा सर्वांनाच बसेल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

700 वर्षांपूर्वी वारी सुरु झाली ती सुद्धा एक बंड आहे. संतांनी संगितलेले की आम्ही वेगळ्या पद्धतीने राहणार. यासाठी केलेली ही एक व्यवस्था होती. धर्माने सांगितलेली आणि संतांनी सांगितलेली आणि वैदिक धर्माने सांगितलेली सामाजिक व्यवस्था याचा टकराव झाल्याने भांडणे होत असतात, असे ते म्हणाले. सेक्युलर हा शब्द घटनेमध्ये कुठेही मांडलेला नाही. तुम्ही त्याला बंदिस्त करु शकत नाही. कारण पिढी जशी बदलली जाते तसे सर्वच बदलत जाते. आपले विरोधक आहेत ते लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. लोकशाही पाहिजे की हुकूमशाही पाहिजे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. प्रत्येक मतदार स्वतःचे मत ठरवत नाही. तोपर्यंत इथे असलेली व्यवस्था शांततेने जगू देईल असे वाटत नाही, असेही आंबेडकर म्हणाले. 

"मनुस्मृती हे विष आहे असं प्रबोधनकारांनी म्हटलं होतं. देशाच्या गुलामगिरीचं कारण हे मनुस्मृतीमध्ये आहे असं त्यांनी मह्टलं होतं. त्यांनी मनुस्मृतीला पाॅयजन म्हटलंय. प्रबोधनकारांनी मनुस्मृतीला दोष दिलं. हे असं विष आहे की माणसाला कळत नाही की आपण विष पितोय. ते प्यायला नंतर बळी माणसाचा जातो, पण त्याचबरोबर देशाचाही जातो. जेवढ्या लवकर आपण या विष पाषाणातून बाहेर पडू तेवढं अधिकाअधिक लवकर आपण या देशाला उभं करु शकतो.  हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर आपण नेहमी वर्णन करतो की हा गुलामीचा इतिहास. मी असं मानतो की, गुलामी एकाच वर्गाची आहे. उरलेले त्यामध्ये भरडले गेले. राजेशाही संकल्पना क्षत्रियांची होती. लढण्याची संकल्पना क्षत्रियांची होती. म्हणून एकदा क्षत्रिय हारला की उरलेले सगळे हारले. कारण शस्त्र घेण्याचा अधिकारच इतरांना नव्हता. याला छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ अपवाद आहे. म्हणून आम्ही मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की नव्याने काहीतरी उभे करणार आहोत?, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशात दोन परंपरा आहेत एक म्हणजे वैदिक आणि दुसरी संत परंपरा, वैदिक परंपरेत दडपशाही आहे. सध्या धार्मिक दडपशाहीचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. पण आपल्या राज्यातील संतांची परंपरा याला अपवाद आहे. त्यांनी सुरू केलेली वारी ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. वारीत जाणारा माणूस हा त्या दडपशाहीचा बळी ठरणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आपण आता सर्वांना हिंदू हा शब्द वापरायला लागलो. पण यामध्ये दोन विचारसरणी आहे. एक वैदीक परंपरा आणि दुसरी संतांची परंपरा आहे. यांचं वर्णवन करायचं झालं तर एकीकडे विद्वावेचं मुंडन आणि दुसरीकडे तिचा पुनर्विवाह आहे. संतांची ही दोन वेगवेगळी विचारसरणी आहे. नेमकी आम्हाला कुठली पाहिजे? हा आता काळाचा प्रश्न आहे, असं मी मानतो. प्रबोधनकारांच्या लिखाणाचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला धक्का बसेल. त्यांनी सगळ्या वैदिक परंपरेवर आसूड मारला आहे. भवितव्याचा विचार करायचा असेल तर धर्म सार्वजनिक कसा होईल, याची मांडणी केलीय.”

आपण महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांना मानत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांना आता मानायला लागलो. पण या तीनही माणसांनी धर्म नाकारला नाही. फुलेंनी सत्य शोधक समाजाचा पुरस्कार केला. महात्मा गांधींनी वर्णाश्रमाचा केला, तर बाबासाहेबांनी बुद्धांचा पुरस्कार केला. धर्म हा आवश्यक आहे, असं त्यांनी मानलं. पण धर्माच्याअधीन राहून त्यांनी काही करता येईल का म्हटलं का? तर नाही. त्यांचं धर्माशी भांडण नव्हतं. तर सामाजिक व्यवस्थेशी भांडण होतं. त्यांनी सुधारणा काय झाल्या पाहिजेत याची मांडणी केली. त्यांनी सणांवर टीका केली नाही. आपण राष्ट्र म्हणू उभे का राहिलो नाही, असा विचार केला तर आपण समता आणि बंधूभावाचा बळी दिलाय. जात ही नावाची व्यवस्था सुद्धा एक देश आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पूर्ण केंद्र सरकारने काप याचा शिक्षण द्यावं अशी परिस्थिती आहे.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, त्यांना आता सगळंच हवं आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयालयावरही त्यांनी बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना सगळंच बुडाखाली घ्यायचं आहे असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावत प्रकाशजी आपल्या दोघांना मिळून आता ही गोष्ट करावी लागेल असे सांगत अप्रत्यक्षरित्या आगामी निवडणूकीच्या निमित्ताने साद प्रकाश आंबेडकर यांना साद घातली. त्यांना येनकेन प्रकारे सत्ता हवी आहे. हे हवंय ते हवयं आणि सगळंच हवंय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहेत. मात्र या ७५ वर्षात राज्यघटनेवर आधारीत किती कारभार केला आणि किती केला नाही हे तपासून बघायची वेळ आली आहे. आता तर देशात राज्यघटना सोडूनच राज्य कारभार सुरु असल्याची टीकाही त्यांनी मोदी सरकारचे नाव न घेता केली. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे हताश होऊन बसले असते तर आज जी काही परिस्थिती आहे ती आपण पाह्यली नसती. त्यांनी धाडस दाखविले म्हणून या समाजाला प्रगतीची दारे उघडी झाली. समाज जागृत झाला. शिवसेनेतही अनेक शाखाप्रमुख आहेत, आमदार आहे, मंत्री झाले पण कधी या सर्वांना त्यांची जात कोणती असा प्रश्न विचारला गेला नाही असेही स्पष्ट केले.

प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही दोघांचे नातू इथे बोलत आहोत. काही आजोबा बोलत आहेत. मग वाट दाखविणाऱ्यांना आदर्श मानायचे की वाट लावणाऱ्यांना मानायचे, हा प्रश्न पडला आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना नाव न घेता लगावला. घटनेचा उल्लेख केला जातो. त्यात राज्य आणि केंद्राला समान अधिकार दिल्याचे ते म्हणाले होते. दोन तीन बाबी सोडल्या तर हे अधिकार राज्यांनाही दिले आहेत. परंतू ते आज दिसत नाहीत. वाटेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, ही माणसे लायक नाहीत. ह्यांना खाली पाय ओढून खेचले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. डॉ.बाबासाहेबांनी अस्पृश्यतेची चटके सहन केले तर प्रबोधनकारांनी ते पाह्यले म्हणून ते समाजाचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रबोधनकार यांनी चुकीच्या गोष्टीवर नेहमीच आसूड ओढले. त्यामुळेच अनेक चुकीच्या गोष्टी उजेडात आल्या ते तसलं हिंदूत्व आमचं नाही असा पुर्नरूच्चार त्यांनी केला.प्रबोधनकार आता या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुन्हा लोकांमध्ये आले आहेत. त्यामुळे ते वाचता वाचता अनेकांना प्रबोधनकार भेटतील. माझं उलटं आहे आधी भेटत राहिले अनं आता भेटता भेटता वाचत राहिलो असा प्रकार माझ्याबाबत घडल्याचेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com