वंचित आघाडीचे कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई अध्यक्ष अबुल हसन ,वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच त्यांचे काही खासदार यांच्याबरोबर दोन बैठका झालेल्या आहेत. त्यात युतीसंबंधी सकारात्मक चर्चा झालेली आहे .शिवसेना नेते सुभाष देसाई हे बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यामध्ये दोन बैठका झाल्या असून युतीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले .महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्यासोबत निवडणुका लढवायच्या की फक्त वंचित आघाडी शिवसेना यांच्यासोबत निवडणुका लढवायच्या हा निर्णय शिवसेनेकडून कळवण्यात आल्यानंतर पुढील राजकीय चर्चा होईल, असेही रेखा ठाकूर यांनी सांगितले.
पनवेलचा माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आंबेडकर कुटुंबावर केलेली विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटल्या. वंचित आघाडीने या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे .गायकवाड यांचे हे वक्तव्य आंबेडकर कुटुंबावरच नव्हे तर आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे कटकारस्थान दिसत आहे, या विषयावर समाजात तेढ निर्माण होऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने जगदीश गायकवाड यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी ,अशी मागणी रेखा ठाकूर यांनी केले आहे. पनवेलमध्ये गायकवाड यांच्या विरोधामध्ये वंचित आघाडी कडून मोर्चा आयोजित करण्यात आला असून त्यांच्या अटकेची अवैद्य जमीन व्यवहारात संबंधी तक्रारी करण्यात येणार असल्याची माहितीही संघटने कडून देण्यात आली.
पत्रकार- महादू पवार 9867906135
0 टिप्पण्या