Top Post Ad

महात्मा फुले... सनातनी भट-बामणांचे कर्दनकाळ


   भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना असंघटीत कामगारांना संघटित करण्याची प्रेरणा देणारे आणि भारतात महिलांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यास सतत प्रेरणा देणारे ज्योतीराव गोविंदराव फुले म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले,ग्रामीण भागात आजही जोतीराव ज्योतीराव नाही तर ज्योतिबाच म्हटल्या जाते. भटा ब्राम्हणांनी मराठा मागासवर्गीय समाजात एक म्हण पेरून ठेवली आहे.ती म्हणजे "हाले डुले महात्मा फुले" माथाडी कामगारात विशेष कोल्हापूर, सांगली, सातारा,  पुणे, नगर जिल्ह्यातील कामगार मंडळी या म्हणीचा जास्त शब्द प्रयोग करतात. 
महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते हे त्यांना महात्मा फुले यांचा ऐतिहासिक इतिहास जास्त माहीत नाही.म्हणूनच ते असे म्हणतात.

जोतीराव गोविंदराव फुले  (जन्म ११ एप्रिल १८२७ - मृत्यू २८ नोव्हेंबर १८९०),  

महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते.  क्रांतिकारी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते,  थोरविचारवंत, जातिविरोधी   समाजसुधारक आणि सिद्धास्त लेखक  होते.  जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्यासाठी संघर्ष करणारे नेते होते. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये संघर्ष करून ऐतिहासिक कार्य निर्माण करून ठेवले आहे. त्यांना जाऊन २८ नोव्हेबर २०२२ ला १३२ वर्ष पूर्ण होणार आहेत. तरी ही स्री पुरुषातील शिक्षण,आचरण, संस्कार, कर्तव्य आणि जबाबदारीतील विषमता पाहून त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी सावित्रीमाई व ज्योतिबा फुले यांचा जीवन संघर्ष वाचला त्यांनाच त्यांची आठवण येते. ज्यांनी ते वाचले नाही त्यांना काहीच फरक पडत नाही. 


कोणता ही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होते.विषमता,असमानता अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमी लढणारा माणूस त्यावेळी सनातनी भटा ब्राम्हणांच्या हिट लिस्टवर होता. त्यामुळे त्यांना जागोजागी संकटाचा सामना करावा लागे.यावर त्यांनी बुद्धीचातुर्याने मात केली.आजच्या सारखी जीवघेणी नीतिमत्ता नसलेले हिंसाचारी लोक तेव्हा नव्हते,असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यावेळची परिस्थीती आम्ही वाचली आहे. पण आज लोकशाही असूनही प्रशासकीय व्यवस्थेतील मनुवादी किती हिंसक प्रवृतीचे आहेत.हे मागासवर्गीय समाजाच्या तरुणांना कशी वागणूक देतात.ते सोशल मीडियावर पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. मग ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन मुलीची शाळा काढून किती मोठा संघर्ष केला असेल यांची कल्पनाच केल्या जात नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही महापुरुष,महात्मे शोधून ही सापडणार नाहीत.काही शिक्षण सम्राट आहेत पण त्यांच्या कडून कोणताही आदर्श घेण्याच्या लायकीचे ते नाहीत.


           महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते. त्याच बरोबर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक जोतीराव फुले खूप लोकांना माहिती नाहीत.जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.जोतीरावांच्या उद्योगपती,कार्यकारी संचालक,अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. ख्यातनाम विचारवंत डॉ.रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे."  सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.

त्याच बरोबर ज्योतीराव फुले उत्तम बिल्डर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक होते हे आम्ही कधी वाचलेच नव्हते.पण हरी नरके सारख्यांनी ते जगासमोर मांडले परंतु त्यावर व्यापक चर्चा होतांना दिसत नाही. ज्योतीराव फुले यांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामे वस्तु आजही लक्षवेधी आहेत पण त्यांची पाहिजे त्या प्रकारे दाखल घेतल्या जात नाही.कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा कोणी बांधला?. कधी बांधला ?.या बाबत कोणी विचारत नाही.कारण या वर चर्चा सुरू झाल्यास आजच्या तरुणांना एक प्रेरणादायी सत्य इतिहास समोर येईल या भीतीने त्यावर चर्चाच होत नाही.म्हणूनच महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतीराव फुलेंना गुरुस्थानी मानायचेच अनेकांना आज भी काळजाला झोबंते.त्यामुळे बाबासाहेब फुलेनां गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आज ही फुलेंच्या विचारांशी प्रामाणिक राहुन उठता बसता त्यांच्या विचारला प्रतिमांना त्रिवार प्रणाम करतो.बाकी माळी ओबीसी समाजाच्या घरात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचा फोटो दिसणार नाही.आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे घरा घरातच नव्हे तर प्रत्येक शुभ कार्याला पत्रिकेवर महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असतात. 


आज देशात "मूह मे राम बगल मे सूरी" या रीतीने गांधीवादी,सावरकरवादी आणि मनुवादी वागतांना दिसतात. ज्योतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्य निर्मिती, स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे ऐतिहासिक काम करून ठेवले म्हणून आज त्यांची फळ आपण मुक्तपणे खातो.म्हणूनच महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते.


     जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले.त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कपडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती,कार्यकारी संचालक,अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले

‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. 

      महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचाराचा वारसा आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे त्याला मागासवर्गीय समाजाने खऱ्या अर्थाने साथ दिल्यास केंद्रात फुले शाहु आंबेडकर विचारांचे सरकार स्थापन होऊ शकते.मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तर भारतात या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ठेवली आहे. पण काही मागासवर्गीय समाजातील गुलामांनी त्याला सुरुंग लावला होता.शत्रू पक्षाच्या विचारधारेच्या नेत्यांना केवळ आर्थिक लाभा करीता संघटनेत सहभागी करून घेतल्यामुळे क्रांतिकारी विचारांचे कॅडर बेस संघटन मागे पडले आणि लीडर बेस लोक पुढे आले त्यामुळे पक्ष संघटनेवर परिणाम झाला.त्यांचे फळ आज उत्तर भारतीय जनता भोगत आहे.व्यक्ती पेक्षा संघटन मोठे असते संघटने पेक्षा विचारधारा मोठी असते.फुले शाहु आंबेडकर विचार हे सर्वान पेक्षा मोठे आहेत. क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले आहेत.त्यांची विचारांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर क्रांतिकारी परिवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही.आज देशात जी परिस्थिती आहे.तिचा गांभीर्याने विचार करण्यासाठी महापुरुषांची क्रांतिकारी विचारधाराच यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकते. 


महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त सर्व मागासवर्गीय समाजाने आपआपल्या समाजाच्या संघटनेचे वैचारिक आत्मचिंतन करून परीक्षण करणे आवश्यक आहे.आपण कामगार, कर्मचारी  अधिकारी, विद्यार्थी,  शिक्षक, प्राध्यापक, वकील,इंजिनियर, डॉक्टर, व्यवस्थापक,पत्रकार,साहित्यिक,संपादक आणि शेतकरी शेतमजूर व्यापारी म्हणून कोणत्या विचारधारेच्या पक्ष संघटना,संस्था,संघटना ट्रेड युनियनचे साधे सभासद आणि किर्याशील सभासद आहात. यांचे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहूमहाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक गुरु शिष्याच्या नात्याचा आपल्या डोळ्या समोर कोणता आदर्श आहे. गुरु शिष्याच्या महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांचे आत्मचिंतन आणि परीक्षण करावे असे जाहीर आवाहन करीत आहे.महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते.अशा क्रांतिकारी समाज परिवर्तन करणाऱ्या महात्मांच्या विचारांना व प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम.


सागर रामभाऊ तायडे,
९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई,









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com