Top Post Ad

अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे काय?.

    आजची वाढलेली लोकसंख्या आणि जागतिक स्पर्धा हे मानवाला जीवघेणी ठरत आहे. मनुष्याच्या हव्यास आणि लोभासाठी स्वतःचे प्राण देखील गमावण्यास तयार होत आहे. त्यामध्ये रस्ता सुरक्षा किती महत्त्वाची आहे हा मुद्दा समोर येत आहे. वाढती वाहने आणि प्रदूषण,नको असलेली गर्दी,सर्वांचा एकत्र निवास या गोष्टी अक्षरशःमाणसाचा दम काढत आहेत.सर्व कामकाज आणि उद्योगामुळे शहरीकरणात वाढ होत आहे.याकारणाने तेथील लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.गावाकडील लोक देखील शहरात स्थलांतरित होत आहेत. दळणवळण आणि प्रवासासाठी वाहनांची संख्या वाढत आहे. रस्त्यावरून फिरणे कठीण  झाले आहे. याचा परिणामानेच रस्त्यावरील अपघाताची संख्येत वेगाने वाढ होत असून रस्ते अपघातात दगावल्याची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.  एक काळ असा होता की लोक वीस किलोमीटर पायी चालत जात येत होती. आज लोक दोन किलोमीटर अंतर चालत जात नाही.शहरी भागात मोठ्या प्रमाणात दळण वळणाची साधन उपलब्ध आहेत,पण खेड्यात आज ही रस्ते विकासा पासुन कोसो दूर आहेत.म्हणूनच गावी एक प्रसिद्ध म्हण आहे, "गांव तसे चांगले येशीला टांगले!." 

असे का म्हटल्या जाते तर गावांत जाणारे रस्ते हे खूप खराब असतात,म्हणजे गांव चांगले असेल तर गावातील माणसं ही दक्ष,चांगले असली पाहिजेत, आणि मानस दक्ष नसल्यामुळेच,चांगले नसल्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांना गांव वेशीवर टांगलेले वाटते.असेच अनेक गावे ग्रामीण भागात पाहण्यासाठी भेटतात.तेव्हा माझ्या सारख्या शहरात राहणाऱ्या पत्रकार,स्तंभ लेखक, कामगार नेता असा गावांत गेला की त्यांच्यातील शोध पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी जागी होते.मग त्या गावांतील सार्वजनिक समस्या जाणून
घेऊन असा लेख प्रपंच सुरू होतो. दोन दिवसात खुमगांव बुट्टी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या गावात चार वेळा रस्त्याने येणे जाणे केले. त्यावेळी रस्त्यावरील खड्डे पाहून त्रास सहन करून केलेला प्रवास सहन झाला नाही, मग गांवातील लोक किती दिवसापासून असा जीवघेणा प्रवास याच खड्ड्यातील रस्त्याने सहनशीलता ठेवून करता?.त्याविरोधात कुठेही तीव्र आंदोलन केल्या जात आहे का. 

      नांदुरा ते दहिवडी,केदार,बुर्ट्टी,खुमगांव,भिलवडी,धाडी,मामुलवाडी,जिगांव,ही गावे आहेत,खुमगांव हे रेल्वे स्टेशन असलेलं गांव हायवे नंबर सहा पासून पांच किलोमीटर अंतरावर आहेत.तर नांदुरा सोनज,दहिगाव,केदार ते डीघी हा एक समांतर रस्ता मजूर झाला आहे.त्याचे काही ठिकाणी काम कासव गतीने सुरु आहे. नांदुरा सोनज,दहिगाव ते खुमगांव हे अंतर फक्त आठ किलोमीटरवर आहे.पण गेली अनेक वर्षांपासून संत गाडगे महाराज विद्यालय ते खुमगांव सातशे चे हजार मीटर रास्त काही लोकांमुळे अडून पडला आहे, गावातील काही सदन शेतकरयांनी विद्यार्थांना जाण्या येण्यासाठी पायवाट दिली आहे. बहुसंख्य लोक मोटरसायकलने याच मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे वेळेची व डीजेल पेट्रोल ची बचत होते. अनेक वर्षापासून हा रास्त रखडून पडला आहे. त्यामुळे खुमगांवच्या आजूबाजूच्या पंधरा वीस गावातील लोकांना विशेष विद्यार्थ्यांनां शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.काम धंद्यासाठी जाणे येणे आवश्यक असतांना जाता येत नाही, शेतीतील भाजीपाला शहरात जाऊन विक्रीसाठी नेता येत नाही, कारण प्रवास खर्च व वेळ महत्वाचा असतो. त्यासाठीच रास्त चांगला असणे म्हणजेचं दळण वळणाची अतिशय आवश्यकता असते. तो नसल्यामुळे अनेक समस्या व संकटांना सामोरे जावे लागते.

           दहा पंधरा गावांतील गरोदर माता भगिणीला बाळंतपणासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत दवाखान्यात नेण्याचे असेल तर भगवान भरोसे घराबाहेर पडावे लागते,तशीच परिस्थिती कोणाला अपघात झाला,ह्रदय विकारांचा झटका आला तर तात्काळ दवाखान्यात नेणे अशक्य होते,घरात पैसा अदला,टू व्हीलर गाडी तीन,चार चाकी गाडी उपलब्ध असतांना ही रस्त्या अभावी जवळच्या माणसांना वाचू शकत नाही.यांचे दुःख आणि गांभीर्य गावांतील ज्येष्ठ नागरिक,सुशिक्षित तरुण आणि शहाण्या माणसांना नाही असे लिहणे चुकीचे ठरणार नाही. कारण मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही.ही एकविसाव्या शतकात खेदाची गोष्ट आहे.
         खुमगांव आणि आजूबाजूच्या गावांतील तरुण सुशिक्षित बेरोजगारांनी बँकेचे कर्ज घेऊन रिक्षा काढली तर काहींनी शेती विकून रिक्षा काढली, रिक्षा चालक मालक झाले. पण रस्त्यावरील खड्यामुळे त्यांच्या गाडीचे स्पेयर पार्ट घासून उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त होत असतो. तसेच शरीराचे हात,पाय,कंबर,यांना खड्ड्यातून गाडी चालवतांना बसणारे धक्के बिमारी लाऊन आयुष्य कमी करत आहेत. आणि हे केवळ हायवे रोड वरून गावांत जाणारा रास्ता रोड काही ठिकाणी व्यवस्थीत नसल्यामुळे होत आहे.
    भुसावळ ते अकोला हा राष्ट्रीय महामार्ग नंबर सहा तयार होत असतांना आजूबाजूच्या गावाचा खेड्याचा विसर उच्च शिक्षित इंजिनिअर व प्रशासकीय विभागीय अधिकारी वर्गाला पडलेला दिसतो, कोलासर फाट्यावरून दहिवडी ते खुमगांव रस्त्याने अनेक गावांना जोडणारा एकमेव रास्ता असतांना हायेवर अकोला,शेगाव,खामगाव नांदुरा मार्गाने येणाऱ्या गाड्या उजवीकडे जाण्यासाठी कोणत्याही पर्याय उपलब्ध करून दिला नाही. किंवा कोणतीही तरतूद करण्यात आली नाही आज दिसत नाही.भविष्यात होईल यांची खात्री नाही. हायवेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यातून उजवीकडे दहिवडी,केदार खुमगांव जाणाऱ्या गाड्यानी हायवेवर कसे पार करावे?. म्हणून विचारावे असे वाटते की कार्यकारी अभियंता व प्रशासकीय विभागीय अधिकारी यांचे डोके ठिकाणावर आहे काय?.

        याविरोधात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलायला वेळ नाही. गावांत कोणत्याही सामाजिक बांधिलकी ठेवणाऱ्या पुरोगामी विचारांच्या संघटना स्थापन झाल्या नाहीत.असल्या तरी त्यांना एक गाव बारा भांडगळी नको असतात. त्यामुळे गावांतील अतिशय आवश्यक असलेल्या रस्त्याकडे कोणाचे लक्ष केंद्रित होत नाही. यासाठी सर्व रिक्षा चालक मालकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे असे प्रसिद्ध स्तंभ लेखक,साहित्यिक कामगार नेते सागर तायडे यांनी शंकर खराटे रिक्षा चालक मालक यांना सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता,प्रशासकीय विभागीय अधिकारी, तहशिलदार  यांच्याकडे दाद मांगीतली पाहिजे. त्याला खुमगांवच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य करावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com