Top Post Ad

क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा


 भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे क्रांतीकारक म्हणून बिरसा मुंडा यांचा गौरव संपूर्ण देशात होतो ?. मात्र आपल्या समाजाचे ते नायक दुसऱ्यांचे ते..... यामुळे बिरसा मुंडा आदीवासी समाजातच सिमीत राहिले. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या इतिहासात हया आदिवासींच्या संग्रामास फार मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते. आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांचे बालपण आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्यांनी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला. परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुल येथे झाला परंतू तेथे धार्मीक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली. या काळात त्यांना इंग्रजांच्या काळया धोरणाचा फार तिरस्कार यायचा.

बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. यासाठी बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले.  जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. अशी जाहीर घोषणा केली. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने बिरसा मुंडास पकडून देणा-यास त्यावेळी 500 रूपये बक्षिस जाहीर केले. इतकेच नव्हे तर आपली सेना बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविली, या सेनेने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. 9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले. 3 फेब्रुवारी 1900 रोजी त्यांना इंग्रजांनी अटक केली होती. 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तेथे दरवर्षी जयंती निमित्त कार्यक्रम होतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com