८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताचे
प्रधान
मंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केला.
नोटबंदी म्हणजे रात्री १२ नंतर ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील.हा निर्णय जाहीर झाला तेव्हा आम्ही रात्री ९.२५ वाजताची स्वराज एक्सप्रेस १२४७२ नवी दिल्ली वरून निघणार होती.पण सर्वच गाड्या एक ते दिड तास उशिराने धावत होत्या त्यामुळेच स्वराज्य १०.४५ वाजता स्टेशनवर आली आणि प्रवास सुरु होता.११.२० ला मथुरा जंक्शन येणार होते.पण गाडी लेट असल्यामुळे ती १२ ४० ला पोचली आम्ही खाण्यासाठी काही जेवण घेतले त्याला ५०० ची नोट दिली तर त्याने सांगितले हे नोट आज रात्री बारा नंतर बंद झाली.आमच्या दोघाकडे ५०० च्याच नोटा होत्या माझ्याकडे ७० रुपये आणि रविकडे एकशे तीस रुपये होते.यातच एक दिवस एकरात्र काढवी लागणार होती.पिण्याचे पाणी घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.अशा परिस्थितीत मनाची शांतता भंग पावली.ती आज ८ नोव्हेंबर २०२२ ला ही भंगलेल्या अवस्थेत आहे. आर्थिकदृष्ट्या प्रत्येक व्यक्तिकडे "शांतता" ही असलीच पाहिजे.आज ती अनेकाकडे नाही.हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते.परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात,तर जगलेली असतात.माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार,शक्तीनुसार जीवन जगत असला,तरी निसर्गाने ठरवलेला शेवट आणि सत्ताधारी पक्षाने घेतलेला निर्णय हा त्याला स्विकारावाच लागतो.त्यातच माणसांच्या मनाची शांतता?.भंग पावते किंवा नष्ट होते.आता नोट बंदीच्या परिणामावर कोणीच बोलत,लिहित नाही.चर्चा नाही.दोन हजाराची नोट निघाली तेव्हा तिच्या आत असलेल्या चिपची चर्चा खूप होत होती.कोणी साठा केला किंवा जमीन खाली वीस फुट खाली दोन हजाराच्या नोटा लपवून ठेवल्या तरी त्या पकडल्या जाणार अशी चर्चा त्यावेळी होती.त्यावेळी देशातील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबेल अशी माणसांच्या मनाची शांतात होती.तरी सुद्धा आज असंतोष कुठे ही दिसत नाही.
सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक आणि आर्थिक जीवनात ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखु नका, तुमच्या पेक्षा जास्त कुवत असुनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो याची जाणीव ठेवा."शांतता ही का महत्त्वाची असते?.आज काल आपण पाहतो,देशातील राजकीय सत्तापरिवर्तनामुळे काही माणसे लहान - लहान गोष्टींवर खुप चिडचिड करत असतात.वैचारिक विचारधारेमुळे राजकीय बदल हे प्रत्येक माणसांच्या जीवनात आलेल्या मुलभूत संकटांवर त्यांना मात करता येत नाही.त्यांचा तोंड बांधून मुका मार खावा लागत आहे.त्यामुळे ती माणसे स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असतात. नोटबंदी भ्रष्टाचार संपविण्यासाठी होती.त्यातूनच बेरोजगारी महागाई वाढली हे सत्य असले तरी त्यावर भाष्य करायचे नाही.मन शांत ठेऊन जे दिसते तेच सत्य आहे हे स्वीकारून मनाची शांतात ठेवा.तुम्ही जर स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असाल, तर तुम्ही दुसऱ्याचे मन दुखवत आहात.हे विसरून चालणार नाही.विना कारण दुसऱ्यांचे मन दुखवून स्वतःचे कधीच चांगले होत नाही. जो माणूस स्वतःचा सुखा पेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करतो. तोच जीवनात एक व्यक्ती म्हणून जगु शकतो.ज्या माणसाच्या जीवनात दररोज अनेक संकटे येतात, तरी पण तो माणूस नेहमी चांगल्या मार्गाने चालत असतो.तोच जीवनात संकटांवर मात करून पुढे जाऊ शकतो.पण जो माणूस नेहमी दुसऱ्यांचे वाईट चित्तो तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही.
माणसाने नेहेमी शांतता राखावी.किती हि मोठे संकटे आली तरी जो माणूस कोणालाही दोष न देता.स्वता: त्या संकटांन वर मात करतो.तो जीवनात अनेक संकटांशी सामना करतो तोच जीवनात एक चांगल व्यक्ती महत्त्व मिळवु शकतो.जीवनात संकटे हि नेहमीच येत असतात जो माणूस शांत राहून सुद्धा संकटांवर मात करतो.त्याला यश मिळाले असे समजायला हरकत नाही.जो व्यक्ती संकटे आली म्हणून जीवन थांबवितो तो जीवनात तेथेच थांबतो.आणि थांबला तो संपला असे न होता कोरोना काळात जो थांबला तोच जगण्यात यशस्वी झाला.असे झाले होते.
माणूस हा डोक्यात मेंदू असणारा मानव आहे. प्रत्येकाच्या मेंदूचा आकार कमी जास्त असतो.त्यामुळेच तो विचार करून बोलू शकतो.त्याला सकारत्मक विज्ञानवादी विचारांचे महापुरुष,संत,प्रतिक मिळाले तर त्यांच्याकडून तो निश्चित चांगली प्रेरणा घेऊ शकतो.आणि नकारत्मक विचारांचे अज्ञान अंधश्रद्धा सांगणारे प्रतीके मिळाली तर तो कधी प्रश्न विचारू शकत नाही.जे आहे,जे सांगितले,लिहले ते सर्वच सत्य आहे हे त्याला मान्य करावे लागते.म्हणूनच प्रत्येक माणसांची प्रेरणा ही वेगळीच असते.प्रत्येकाच एक वेगळच व्यक्ती महत्त्व या जगात आहे. प्रत्येकांची संकटे ही वेगळी असतात. त्यांने त्याचावर कशी मात केली.ही एक तुमच्यासाठी खुप मोठी प्रेरणा असले.ते म्हणतात ना,जो माणूस शांततेचा काळात जास्त घाम गाळतो, तो युध्दाच्या ठिकाणी कमी रक्त सांडतो.त्याच प्रमाणे आपण सुद्धा कमी वयात जास्त घाम गाळला पाहिजे,म्हणजे पुढील आयुष्य हे सुंदर जगता येईल.
माणसांच्या नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात.पाहणे,आवडणे,हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत.परंतु,सर्वात कठीण पाचवी पायरी आहे.ती म्हणजे "निभावणे" ज्ञान म्हणजे तुम्ही काय करु शकता याचे "भान" असणे.आणि शहाणपण म्हणजे कधी काय करु नये याचे "ज्ञान" असणे दुसऱ्याचे चांगल (भलं) करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते.तर फक्त मनात चांगली "भावना" असावी लागते.सुखाचे अनेक भागीदार आपणांस भेटतील परंतु दु:खाचा एक "साक्षीदार" भेटायला सुध्दा नशीब लागते असे म्हणतात.म्हणूनच माणसांच्या मनाची शांतता.ही विचारावर अवलंबून आहे.नोटबंदी,भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई आणि मनाची शांतता.राजसत्ता धर्मसत्ता आणि मनाची शांतता कुठे कधी नात जुळवावे हे शेवटी माणसांच्या हातात आहे.कि विचारात हे कोणी ठरवावे.
सागर रामभाऊ तायडे ,
९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
0 टिप्पण्या