Top Post Ad

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने माघार का घेतली?


 अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने माघार का घेतली याचा दीर्घ खुलासा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे व माननीय शरद पवार यांच्या पत्रांचा हवाला देऊन केलेला आहे. खरे तर यापूर्वीच्या महाराष्ट्रातील तीन विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सोलापूर कोल्हापूर व देगलूर येथे मृत आमदारानंतर सुद्धा भाजपा ने आपले उमेदवार दिले व निवडणूक लढविली. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सभ्यपणा याच्या गप्पा म्हणजे निव्वळ राजकीय स्वार्थाला लिपापोतीची झालर लावण्यासारखे आहे.  खरे तर महाराष्ट्रात या निवडणूक निमित्ताने भारतीय जनता पार्टी खिंडीमध्ये सापडलेला होती . परंतु काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीला पुढे करून भारतीय जनता पार्टीने स्वतःसाठी सेफ पॅसेज निर्माण करून या निवडणुकीतून सुटका करून घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीला खिंडीमध्ये गाठण्याची व चारी मुंड्या चीत करण्याची संधी महाराष्ट्राने दवडली. ही बाब नक्कीच खेदजनक आहे. यानिमित्ताने राज्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा एक ऐतिहासिक नामी संधी दवडली व शिवसैनिकांना भारतीय जनता पार्टीला आपल्या शिंगावर घेण्याची संधीच प्राप्त होऊ दिली नाही.

काही वर्षांपूर्वी बांद्रा पूर्व पोटनिवडणूकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मातोश्रीच्या अंगणातच सेना विरुद्ध राणे या पोटनिवडणूकीतल्या संघर्षाची पुन्हा आठवण करुन या निवडणुकीमुळे निर्माण झाली होती. तोच प्रकार या निवडणुकीच्या दरम्यान दिसत होता. अंधेरी आणि राणेंऐवजी सेनेसमोर आहे शिंदे आणि भाजपचं आव्हान होतं. सेनेतली सर्वात मोठी बंडखोरी आणि त्यानंतरच्या सत्तांतरापाठोपाठ नव्या सरकारबद्दल जनमत नेमकं काय सांगतंय याची चाचणी या पोटनिवडणूकीत होणार होती. या पोटनिवडणूकीकरता शिवसेना पक्षाचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण मिळावं म्हणून शिंदेंनी जंग जंग पछाडलं. याचा परिणाम असा झाला की, अखेर धनुष्यबाण गोठलं आणि शिंदेंच्या हाती ढाल तलवार आली...पण, निवडणुकीत आपला उमेदवारच उभा न करण्याचा फतवा भाजपकडून आल्याने त्यांना या निवडणूकीत  तलवार चालवायला संधी नव्हती.  केवळ ढाल घेऊन भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं लागणार होतं. ठाकरे गटाच्या उमेदवार रुजुता लटकेंना शिंदे गटात ओढण्याच्या प्रयत्नांची चर्चा असो किंवा रुजुता लटकेंविरोधात नुकतीच दाखल झालेली भ्रष्टाचाराची तक्रार असो यामागे शिंदे गटाचा हात होता अशी राजकिय वर्तृळात चर्चा आहे...त्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकण्यापेक्षाही ठाकरे गटाचा उमेदवार पडणं हे शिंदेंसाठी जास्त महत्वाचं या इर्षेनेच ही निवडणूकीकडे पाहिलं जात होतं.

सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर वर्षा बंगला सोडतांना सहानुभूतीची मोठी लाट उद्धव ठाकरेंच्या बाजुनं होती...तशीच लाट या पोटनिवडणूकीतही दिसु लागली होती. सेना फुटली तरी सेना संपु देणार नाही हा निर्धार उद्धव ठाकरें  खरा करुन दाखण्यासाठी तत्पर झाले होते. कारण ही पोटनिवडणूक शिवसेना ठाकरे गटाकरता पक्षाचं भविष्य ठरवणारी आहे. मुंबई भाजपची जबाबदारी आता आशिष शेलारांकडे आहे..महापालिका निवडणूकीकरता भाजपचे मुंबईतील रणनितीकार म्हणूनही त्यांच्याच कडे पाहिलं जातंय...राजकिय उलथापालथी आणि सध्याचं वातावरण पहाता आशिष शेलारांकरता अंधेरी पोटनिवडणूकीतला विजय भाजपकडे खेचून आणणं अनिवार्य ठरतंय. मात्र जनरेटा पाहून विरोधकाचं मनोधैर्याचे खच्चीकरण झाले आणि मग पुन्हा नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट लिहिल्या गेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिचा वारसाचा दाखला देत थेट भाजपला पत्र लिहिलं आणि पटेल यांची उमेदवारी माघार घेण्यास सांगितलं. की त्यांच्याकडून ते करवून घेतलं हे मात्र गुलदस्त्यातच. कारण जिथे सांस्कृतिकतेचा अंगिकार होता तिथे निवडणूक अर्ज भरण्यावेळीच तो का आठवला नाही. आम्ही जिंकणारच या वल्गना कशाला? तर एवढा विश्वास होता तर कुणाचं ऐकून लगेच उमेदवार मागे घेण्यात काय हाशील. इकडून लगेच  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यानीही याबाबत भाजपचे कान टोचले. या सर्वांना निवडणुकीचे अर्ज भरताना हे असलं काही आठवलं नाही. असो तरीही फडणवीस आणि शेलार यांनी केंद्रीय नेतृत्वाचा दाखला देत  टाळण्याचा प्रयत्न केला पण अखेर जनरेटा पाहता पटेल यांची माघार घेण्यातच मोठेपणा असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि उमेदवारी मागे घेतली 

यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्षाला वेगळे वळण मिळालं. तरीही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना  `51 टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही रणांगणात असून, वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आम्ही 100 टक्के निवडणूक जिंकणार होतो. परंतु पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे हा विचार करण्यात आला. यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतला आहे. ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.  मुरजी पटेल अपक्ष लढतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले  `मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपाचा उमेदवार होतो तो पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही. ते भाजपाचे आणि युतीचे  उमेदवार  होते .  त्यामुळे त्यांना पक्षाचा निर्णय बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र  यामुळे मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मुरजी पटेल यांचे अंधेरी एमआयडीसी परिसरात असलेल्या 'जीवन ज्योत कार्यालया'बाहेर मोठ्या संख्येने भाजप समर्थक कार्यकर्ते जमा झाले आणि भाजप आणि शिवसेने विरोधात घोषणाबाजी केली.  

पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, मात्र त्यानंतर  झालेल्या बैठकीत अचानक माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि हे नाट्य संपुष्टात आले. असे असले तरी भाजपने अंधेरीची ही जागा आता आपल्या नावावर करून ठेवली आहे. मुळात ही जागा शिवसेनेची. या जागेवर शिंदेगटाचा हक्क मात्र पोटनिवडणुकीच्या माध्यमातून भाजपने आपला हेतू साध्य करून ठेवला आहे. ही जागा येणाऱ्या निवडणुकीत भाजपचीच राहील हे आता नक्की. मग बाळासाहेबांची शिवसेना काय करणार...?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com